गीताई

‘घाई करू नकोस.
पुन्हा एकदा विचार कर.
तासभर ऊशीरा आलीस तरी चालेल.
आत्ता कुठं तुझ्या करिअरची सुरवात आहे…
परेफ्क्शनिस्ट आहेस.
नवीन गोष्टी पटकन् शिकून घेतेस.
हार्डवर्कर आहेस.
टॅलेन्ट आहे तुझ्याकडे.
डोन्ट वेस्ट ईट.
करिअर ग्राफ सहज वाढता राहील तुझा.
ब्रेक कशाला लावतेस त्याला..
आॅफ कोर्स, ईटस् युवर चाॅईस.
घाई नाही.
दोन दिवस शांतपणे विचार कर.
टेक युवर ओन टाईम.
बाय द वे..
हॅप्पी बर्थ डे !
विश यू हॅप्पी, हेल्दी अॅन्ड प्राॅस्परस फ्युचर लाईफ..’
बाॅस ईज आॅलवेज ए बाॅस.
आज नाही.
बाॅसमधे तिला बाबा दिसला तिचा.
एक पल के लिये…
ती गोंधळली.
डोळ्यातला आसवांचा नायगारा कोसळण्याच्या बेतात.
तीनं खोल श्वास घेतला.
दिलसे ऊद्याचा विचार केला.
कल ,आज और कल.
तिघंही एकदम डोळ्यासमोर ऊभे ठाकले.
नॅनोसेकंदात स्वतःलाच साद घातली.
‘हो..’
हेच ऊत्तर मिळालं.
अभ्भी नही तो कभ्भी नही.
” थँक्स ए लाॅट सर.
तुम्ही खूप सांभाळून घेतलंत आत्तापर्यंत.
माझं ठरलंय.
ईटस् माय फायनल डिसीजन.
साॅरी सर.”
बाॅसनं आगतिकने खांदे ऊडवले.
दोन्ही हात हातात घेऊन हळूच दाबले.
अगदी तिच्या बाबासारखेच.
“बेस्ट लक सुपर माॅम.
युवर चाईल्ड ईज दी मोस्ट लकीयेस्ट डाॅटर ईन दी वर्ल्ड.
ईन्जाॅय दी एव्हरी मोमेंट आॅफ युवर लाईफ हिअरआफ्टर.”
तिनंही सगळे एटिकेटस् स्प्रिंगरोलसारखे गुंडाळले.
मनापासून बाॅसच्या पाय पडली.
बाॅसने भरभरून आशीर्वाद दिले.
जाताजाता आॅफीशियल फाॅरमॅलिटीज कम्प्लीट करून देण्याची रिक्वेस्ट केली.
ती बाॅसच्या केबीनबाहेर आली.
मागे वळून बघताना…
ईथली ती पाच सहा वर्ष आठवली.
आता मागे फिरायचं नाही.
चॅप्टर ईज क्लोज्ड नाऊ.
मनातले अश्रू तिने डोळ्यात ऊतरू दिले नाहीत.
पुन्हा चेहरा हसला केला.
स्मायली.
अॅज ऑलवेज.
ऑफिसचा शेवटचा दिवस तिला रडून ओला करायचा नव्हता.
लंचटाईमला नुस्ता कल्ला.
तिच्या कलीग्जनी केक आणला होता.
केक, काॅफी.
बर्थ डे साँग.
तिनंही पिझ्झा मागवला.
गिफ्टागिफ्टी झाली.
मजा आ गया.
तिनं हळूच सांगितलं.
“टुडे ईज माय लास्ट डे हिअर.
आय हॅव रिझाईन्ड.”
जोर का झटका ,
जोर से च लगा.
सगळे शाॅक्ड.
” पागल है तू..’
“तेरी सासू माँ है ना, वो संभालेगी बच्ची को…”
“बाद में पछतायेगी”
‘तुझ्या लेकीला काय कळणार यातलं?
मोठी झाली की सगळं विसरून जाईल.
शून्य किंमत असते आईबापाची आजकालच्या पोरांना..’
न मागता मिळालेल्या सल्ल्यांचा टपोरा बोके तिनं आनंदानं स्विकारला.
साडेपाचला तिनं आॅफीस सोडलं.
साडेसहाला घरी.
दारात तिची गोडुली वाटेकडे डोळे लावून बसलेली.
तुरूतुरू चालणारी.
बोब्ब बोलणारी सोनपरी..
ती आल्याबरोबर चिकटलीच तिला.
कानात शिरून गोड गोड हॅप्पी बर्थ डे केलं.
गालावर गोड पापा.
तीन साल की सोनपरी.
दिवसभर अडवलेला डॅम फुटलाच शेवटी.
परी कावरीबावरी.
ममा का रडत्येय ?
परीच्या ईवलाशा हातांचा वायपर.
सावर रे, आवर रे..
घरी जय्यत तयारी.
आईंनी खास गोडाचा शिरा केलेला.
बाबांनी रसगुल्ले आणलेले.
नवरोबा कधी नव्हे ते घरी हजर.
त्यानं आणलेली नवी कोरी साडी.
केक,गजरा..
ती पटकन् तयार झाली.
नवी साडी नेसून.,
गजरा माळून..
आईंनी औक्षण केलं.
ती आईबाबांच्या पाया पडली. 
जुग जुग जीयो..
भरभरून आशीर्वाद मिळाले.
नबरोबाने केकचा तुकडा भरवला.
ईटस् सेल्फी टाईम.
अचानक तिची अनाऊन्समेंट.
” आई ,बाबा, रवी..
मी रिझाईन केलंय.”
भिंती कान टवकारून ऐकू लागल्या. 
दोन मिनटं.
कुणीच काही बोलेना…
पिनड्राॅपवाला सायलेन्स.
एकदम बाबांनी टाळ्या वाजवल्या.
नवरोबानेही हसमुख अंगठा दाखविला.
दिलसे…
आईंनी तर बोटं मोडून दृष्टच काढली.
‘ सई, आम्ही होतो की.
आम्ही सांभाळलं असतं की परीला..”.
घर आनंदानं भरून गेलेलं.
फिल्म डीव्हीजनचं एकता का वृक्ष आठवतंय…?
टिंग टिंग डी, टिडींग टी डिंग.
मन ऊधाण वार्याचे.
घर आनंदानं डोलूही लागलं.
तीचं सगळं टेन्शन ऊतरलं.
आँखे पुन्हा गुस्ताखीयाँ करू लागले.
पर ईस बार खुशी के आँसू..
रवीनं एक रोशगुल्ला भरवला तिला.
बाबांनी परीच्या कानात चंमत ग सांगितली.
” बर का परिराणी, 
ममानी खूप मोठी रिटर्न गिफ्ट दिलीय तुला.
तिच्या बर्थडेच्या दिवशी…”
‘ कुठ्ठी गिफ्ट ?’
‘ मोठ्ठी झालीस की कळेल तुला.
ममाला थँक्स म्हणायचं. 
आणि गोड पापा दे तिला..’
परी सईच्या कुशीत.
ममा हळूच तिच्या कानात शिरते.
” ऊद्यापासून तुला नर्सरीमधे सोडायला मी आणि आबा दोघं येणार…
ममा तुला शंभो घालणार.
पावडर लावणार.
आवडेल का परीला ?”
परी सुसाट..
गाऊ लागली.
नाचायलाच लागली.
अवघ्या घराची ‘गीताई’ झाली.
हॅप्पीवाला बर्थ डे ममा !

Image by Jose Antonio Alba from Pixabay  

Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

2 thoughts on “गीताई

  • April 10, 2021 at 3:25 am
    Permalink

    केवळ अप्रतिम! I could relate..🙂👍

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!