कधी रे येशील तू जिवलगा- ५

ती पुन्हा पार्टीत परतली.. आणि आजी जवळ डिश घेऊन उभी राहिली… पार्टी आता रंगत होती.. आणि अचानक नील आणि त्याचे आई बाबा समोरे आले.. आजी मामा मामी.. ह्यांची जुजबी चौकशी… सखी अन  नील ची ओळखपरेड झाली… आणि नील च्या बाबांनी आजी कडे सखीला मागणी घातली… सखी तिच्याच विचारात.. तिला ऐकू ही आलं नाही… मामा नी सखी ला हाक मारली.. अगं ! लक्ष कुठाय? … अं .. हो.. काय मामा? म्हणत ती गोंधळून बघू लागली.. अगं नील चे बाबा म्हणतायत.. आमची सून होशील का? … काय?.. आत्ता.. मी काय बोलू?.. सॉरी काका.. पण माझं शिक्षण चालू आहे आणि हा निर्णय असा कसा घेऊ… आई बाबांशी पण काहीच बोलणं नाही झालंय ना.. प्लीज मी नंतर कळवते…
सगळं एका दमात बोलून ती घाईनं निघून गेली… आणि इथेच सगळ्यांना ती लाजून पळाली अस वाटून पुढची बोलणी करायला येतो.. असा पेंडसेंनी.. सखीच्या  वडिलांसाठी  निरोप दिला.. मामा आणि आजी जाम खुष होते… पोरीनं नाव काढलं.. चांगलं सासर मिळालं.. पण मामी ला मात्र काहीतरी गोम आहे असा संशय आला..

ती पुन्हा पार्टीत परतली.. आणि आजी जवळ डिश घेऊन उभी राहिली… पार्टी आता रंगत होती.. आणि अचानक नील आणि त्याचे आई बाबा समोरे आले.. आजी मामा मामी.. ह्यांची जुजबी चौकशी… सखी अन  नील ची ओळखपरेड झाली… आणि नील च्या बाबांनी आजी कडे सखीला मागणी घातली… सखी तिच्याच विचारात.. तिला ऐकू ही आलं नाही… मामा नी सखी ला हाक मारली.. अगं ! लक्ष कुठाय? … अं .. हो.. काय मामा? म्हणत ती गोंधळून बघू लागली.. अगं नील चे बाबा म्हणतायत.. आमची सून होशील का? … काय?.. आत्ता.. मी काय बोलू?.. सॉरी काका.. पण माझं शिक्षण चालू आहे आणि हा निर्णय असा कसा घेऊ… आई बाबांशी पण काहीच बोलणं नाही झालंय ना.. प्लीज मी नंतर कळवते…
सगळं एका दमात बोलून ती घाईनं निघून गेली… आणि इथेच सगळ्यांना ती लाजून पळाली अस वाटून पुढची बोलणी करायला येतो.. असा पेंडसेंनी.. सखीच्या  वडिलांसाठी  निरोप दिला.. मामा आणि आजी जाम खुष होते… पोरीनं नाव का संशय आला..
सगळे घरी परतले.. सखी ला निशूचे 5 मिस कॉल दिसले..तिनं कॉल लावला… निशू आधीच जाम चिडलेली त्यात हा सगळा घडला प्रसंग ऐकून वैतागलीच… ताबडतोब निघून ये म्हणाली… सखी न ही तीच ऐकलं आणि ऑनलाईन बस तिकीट बुक करून मगच आजीला सांगितलं.. मी उद्याच जातीये.. कॉलेज मधे महत्वाची परीक्षा आहे आणि तिचं वेळापत्रक आलय..फार खोलात न शिरता तिला परवानगी मिळाली.

इकडे सुज्याला ही चैन पडेना… त्यानी ही झाला प्रकार आईला कळवला.. आणि तो ही दुसऱ्या दिवशी सकाळीच  निघायचं म्हणून लवकर झोपला… आता सकाळी  6ची बस तिनं गाठली आणि सुज्या कार नी निघून गेला.. तिला कॉल मेसेज करायचं धाडस त्याच्यात नव्हतं आणि त्याला काय वाटत असेल या विचारात तिनं ही कळवलं नाही..

इकडे पोचल्यावर अभि चा पुन्हा कॉल आला.. आणि सृजन नी त्याला सविस्तर मेल करतो सांगत वेळ मारून नेली..  आता त्याला हे अभि शी बोलाव… त्याला सांगावं असं वाटू  लागलं… अभि.. अभिजित हर्षे .. एक दिलखुलास माणूस… अमेरिकेत गेली 7 वर्ष राहूनही मनानी मात्र मुंबईत रमणारा… प्रचंड लोकसंग्रह आणि माणसं वाचायचा छंद..  खूपच जॉली आणि म्हणूनच कायम मैत्रिणींच्या गराड्यात.. एक सहवेदना जपणारा.. समंजस मित्र… सृजन ला 4 वर्ष सिनियर..  आणि 12 वी  नंतर अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणारा.. त्याचा शाळा मित्र.. खरंतर शेजारी होता त्याचा.. पण एकाच शाळेतही एकत्र जाण येणं.. म्हणून मग ती मैत्री जास्त घट्ट…  सुज्या साठी सदैव तत्पर असलेला.. सुज्याचा एकमेव बेस्ट फ्रेंड्…  हा तसा निमगोरा.. पिंगट  डोळ्यांचा.. फ्रेंच कट ठेवणारा आणि मुळात व्यायामाची आवड असणारा.. त्यामुळेचं बॉडी बिल्डर सारखी  पिळदार देहयष्टी होती .
सुज्या नी मेल पाठवली रात्री…  … आणि इकडे..  अभि ची गुड मॉर्निंग सुरु झाली… मेल मधे त्याने ट्रान्सजेन्डर विषयी बरेच प्रश्न विचारले होते.. उदा.   त्यांना पुरुषतत्व तयार होताना होणारे त्रास.. आजार… काही व्यायाम आणि आहारातले बदल?
आणि मुळात प्रजनन क्षमता… ह्यावर काही उपाय योजना?..
अभि ह्या प्रश्नानी जरा सावध झाला… सुज्या हे का विचारतोय?

म्हणजे नेमकं हेच का जाणून घ्यायचय ह्याला… बच्चम जी… दाल में  कुछ काला हैं !… म्हणत त्यानं एकेक प्रश्नाला उत्तर लिहायला सुरुवात केली.. सृजन च्या केस मधे त्याला शारीरिक सुख देता येणार होतं पण प्रजनन शक्य नव्हतं..  पण हे सगळं अभि त्याला मेल वर न लिहिता.. प्रत्यक्ष भेटूनच बोलू.. म्हणत त्यानं मेल delete केली  आणि त्याची परीक्षा संपली कि तो लगेच भारतात येतोय असा मेसेज सुज्याला टाकला… आता 2 आठवड्यात तो परतणार होता.. इकडे भारतात अभि च  विमान उतरलं आणि तिकडे..
निशू ला तिच्या आत्या कडे सिंगापूरला जावं लागणार होतं.. तिच्या आत्याला आता नातवंड होणार होतं आणि निशू आत्या होणार होती… म्हणून मग आत्यानी निशूला बोलावून  घेतलं आणि सखी तिला सोडायला एअरपोर्ट ला आली..
सखीला एअरपोर्ट वरून बाहेर पडत कॅब मधे बसताना पाहून अभि नं ही ड्राइव्हर ला गाडी तिच्या मागे घ्यायला सांगितली…

अभि आणि सखी एकमेकांना ओळखत नव्हते.. पण सखी होतीच इतकी रेखीव आणि मोहक कि अभि ला ही तिची भुरळ पडली…  वेळ होताच हातात..  मग पत्ता काढायला काय हरकत आहे असा विचार करून तो तिचा पाठलाग करू लागला..

आता सखी.. सुज्यापासून शरीरानं आणि काहीशी मनानं ही लांब गेली होती.. मधल्या काळात त्यांनी एकमेकांना कुठलाच संपर्क केला नाही.. पण सखीनं आता ट्रान्सजेंडर विषयी माहिती काढायला सुरुवात केली… मुंबईत अशा काही केसेस रजिस्टर आहेत का?  कुठल्या हॉस्पिटल मधे ही सर्जरी होते.. हा डेटा गोळा करायला सुरुवात केली.. सुज्या मात्र तिच्या विरहात झुरत होता.. आता निशू ही नव्हती तिचे अपडेटस कळवायला..

आज रेडिओ वर जुन्या मराठी गाण्यांची मैफल लागली होती…

दिवसामागून दिवस चालले… ऋतू मागुनी ऋतू…
कधी रे येशील.. तू… जिवलगा… कधी रे… येशील तू..

आज एकाच वेळी हे गाणं चार जीव  ऐकत होते आणि गुणगुणत ही होते… आपापल्या जिवलगा साठी..

सृजन… सखी साठी..
सखी… सृजन साठी
नील आणि अभि.. सखी साठी…

# काय होईल जेव्हा अभि ला कळेल.. सृजन सखीत गुंतलाय…
आणि सृजन ला कळेल… सखी… अभ्याला आवडलीये…
कोण बाजी मारणार?.. अन  मुळात सखी काय निर्णय घेणार?..
क्रमश:

Image by Gerd Altmann from Pixabay 

One thought on “कधी रे येशील तू जिवलगा- ५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!