कधी रे येशील तू जिवलगा- शेवटचा भाग

आधीच्या भागाची लिंक- कधी रे येशील तू जिवलगा-  7

स्पर्धा आता जवळ यायला लागली होती.. आणि त्याची तयारीही जोरात चालू होती.. तरीही काहीतरी कमी पडतंय असं सुज्याला सतत वाटत होतं आणि ती कमतरता होती सपोर्ट ची… सखी हवी होती… त्याला… आत्ता त्याच्याबरोबर… पण सखीला कसं आणणार इथे??..
सृजनच  स्वगत नकळत त्याच्या डायरीत उमटलं.. आणि आणि त्याच्या सराव पूर्वी तो ती डायरी टेबलवर विसरून गेला .. जेव्हा अभी घरात आला त्याने सहज डायरी चाळली…  त्यानी.. सखी आणि निशू साठी तिकीट बुक करायला घेतली… सखीचा पासपोर्ट नुकताच आला होता..तिला NGO कडून जायला मिळेल अशी वेडी आशा होती…  आणि म्हणूनच  तात्काळ मधे पासपोर्ट काढला होता… त्यानं तिकीटस  निशू ला मेल केली..
आणि व्हीजा साठी इन्व्हिटेशन पाठवलं.. तिथे त्याने निशू ला फोन करून सुजा च्या मनातलं सांगितलं आणि सखी इथे हवी आहे याचीही कल्पना दिली…. लगोलग निशु कामाला लागली… ती जामच उत्साहात होती… फायनली तिच्या लाडक्या मैत्रिणीची लव्ह स्टोरी मार्गी लागताना दिसत होती… पण  मोठी अडचण होती… आई बाबा… सखीचे!     काय आणि कसं सांगावं… तिनं पटकन आईला  फोन केला… सखी सुज्या ह्यांच्या बद्दल ती आईशी बोलली  आणि मग आईच्या मदतीनं तिनं सखीच्या आई बाबांच मन वळवायचं ठरवलं..आता तिने सखीच्या आई बाबांना फोन केला आणि सखीला तिच्याच  NGO च्या इव्हेंट साठी पाठवायची परवानगी मिळवली तसच सोबतीला निशूललाही  पाठवतोय असं सांगितलं…. बऱ्याच प्रयत्नानंतर ते तयार झाले.. तस ही त्यांना सखीच्या आनंदापुढे काहीच महत्वाचं नव्हतं… त्यात कोंडून घेणं प्रकरण ताजचं होतं…

आता काहीच आठवड्यात सुज्या भेटणार म्हणून सखी खुश होती… फक्त अट एकच… सुज्या ला सांगायचं नाही… आणि मन मारून ती कबूल झाली… व्हिजा.. तयारी शॉपिंग ह्यात दिवस कसे गेले कळलंच नाही…

आणि तो दिवस उगवला… निशू आणि सखी ला सोडायला निशुची आई आणि सखी चे आई बाबा आले होते… इव्हेंट फक्त 4 दिवसाचा होता… त्यामुळे 10 दिवसाच्या शॉर्ट ट्रीपचीच परवानगी मिळाली होती…

मधल्या काळात सुज्याचा फिजिकल आणि मेंटल फिटनेस उत्तम वाढला होता… त्याचे विचार.. मानसिकता आता पुरुष तत्वात पक्की मुरत होती… त्याचा न्यूनगंड ही कमी झाला होता… बऱ्याच थेरपीज मुळे आता त्याचं त्यालाच जाणवत होतं… कि तो सखी कडे एक पुरुष म्हणूनच आकर्षित झालाय.. आणि ती त्याला त्याची जोडीदार म्हणून हवीये… आयुष्यभरासाठी… पण आता…त्याला तिला पटवून द्यायचं होतं… त्याच प्रेम…

मधल्या काळात Ngo  बरोबर काम केल्यामुळे सखीला ट्रान्सजेन्डर बद्दल बरीच शास्त्रोक्त माहिती मिळाली होती.. आणि सृजन ला तिनं मनोमन स्वीकारलं होतं…

सखी आणि निशू एअरपोर्ट ला पोचल्या…ठरल्याप्रमाणे अभि त्यांना घ्यायला आला होता … ते थेट इव्हेंट च्या ठिकाणीच मुक्काम करणार होते…

सृजन च्या रूम मधे तो एकटाच बसला होता .. अभि चा फोन आला .. चल जरा बाहेर ये… एक सरप्राईज आहे ….. त्यानं रूम चा दरवाजा उघडला… आणि समोर… सखी… हातात गुलाबांचा बुके घेऊन… खूप सहज समोर आली ती… डेनिम डार्क ब्लु जीन्स.. ब्लॅक लेदर जॅकेट.. फिरंगी अप्सरा जणु … सुज्या ब्लँक… नक्की हीच आलीये कि आपण स्वप्न बघतोय…. बेस्ट ऑफ लक !! सखी नं हात पुढे केला… उं.. हमम हो… म्हणत त्यानं ही हात हातात घेतला… पण 10 सेकंद होउनही हात सोडत नव्हता… निशू नी मग हात पुढे केला आणि मधेच म्हणाली… अरे मला पण wish करायचंय… सखी झालं का तुझं?  सखी गोड लाजली.. अलगद हात सोडवत मागे झाली.. या क्षणी सुज्या ला निशूचा जरा रागच आला होता.. पण निशू नसती तर सखी ही आज इथे येऊ शकली नसती.. हे जाणवून त्यानं जरा रागाला आवर घातला…
निहाल??  तो कुठाय?  का नाही आला? ..
अरे तो त्याच्या कामासाठी हैद्राबाद ला गेलाय.. पण त्यानं ही तुला best wishes दिल्या आहेत.. उद्या करेल तो फोन..
मग सगळेच रेस्तरॉ मधे आले… सखी आल्यामुळे सुज्या प्रचंड खुश होता… आजवरच्या सगळ्या इथल्या गोष्टी तो तिला डिटेल मधे सांगत होता…
त्याची अंगकाठी ही सुधारली होती आणि तो जाणवण्या इतपत masculine दिसत होता… एक रुबाबदार… राजबिंडा सृजन… तिच्याच काय… तमाम पोरींच्या स्वप्नातला राजकुमारच जणु !. आता जरा आराम करा म्हणत अभिनं त्या दोघींना त्यांच्या रूम मधे पिटाळलं… आणि स्वतः सृजन च्या बरोबर  वॉक साठी बाहेर आला..
त्यानं थेट विचारल… सुज्या सखी आवडते तुला??
हो… मग बोलला का नाहीस आधी?.. मी… मी घाबरत होतो…
का?  आणि इतक्या गोड़ मुलीनं तुला प्रोपोज केलं हे पण नाही सांगावस वाटलं??  हीच का रे दोस्ती?..
अभि !! यार तुझ्या पासून लपवायचं नव्हतं… पण तुला माहितीये माझा भूतकाळ… मी घाबरत होतो… तिला मी जसा आहे तसा आवडीन कि नाही?..  मी ट्रान्स मॅन आहे हे  सत्य ती स्वीकारेल कि नाही… आणि सगळ्यात महत्वाचे… मुळात मला तिच्या बद्दल वाटणाऱ्या भावना ह्या स्त्री सुलभ आहेत कि पुरुष सुलभ??  मी स्वतः च अडकून पडलो होतो रे या द्विधा अवस्थेत…

गेले काही दिवस इथल्या थेरपीज मुळे मला माझंच असं जाणवलंय की मी सखीशी एखाद्या नॉर्मल पुरुषासारखा जोडीदार म्हणून वावरू शकतो… एक पत्नी म्हणून तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो… सुदैवाने माझ्या मेडिकल टेस्ट्स ही नॉर्मल आहेत… आणि आज जेव्हा तिला भेटलो ना… तेव्हा जास्त जाणवलं.. कि हिच्या शिवाय मी दुसऱ्या मुलीचा विचार ही करु शकत नाही ..
अभि नं त्याला मिठी मारली… इतक्या दिवसांचा मनावरचा ताण आज संपला होता.. सुज्या मिठीत शिरून कोकरा सारखा रडत होता… आणि सखी ला कायमच गमावलाय हे दुःख अभिला सलत होतं त्यामुळे त्याचे ही डोळे नकळत पाणावले…

स्पर्धा एकूण 4 दिवस चालू होती… आज शेवटचा
दिवस उजाडला… सखीनं पुन्हा एकदा ऑल द बेस्ट म्हटलं.. मात्र यावेळी सुज्यानी चक्क तिला मिठीत घेतल..
तिच्या कपाळावर ओठ टेकवत… थँक यु … म्हणून तो स्पर्धेला उतरला… स्विमिन्ग रनिंग वेट लिफ्टिंग याच बरोबर एक स्पेशल हर्डल रेस डिझाईन केली होती.. ज्यात त्याला 4 लोकांचा टीम लीडर बनून छोटे छोटे सामने खेळायचे होते.. निर्णय क्षमता.. या वेळी पणाला लागणार होती…
एक एक करत त्याची टीम स्पर्धा जिंकत होती…
आणि नेमक्या मोक्याच्या क्षणी त्याचा एक मेम्बर जखमी झाला आणि त्याच्या टीम चा दुसरा क्रमांक आला.. तरी ही निराश न होता यांनी स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं…
सखी उत्स्फूर्तपणे त्याला प्रोत्साहन देत होती आणि पाणावलेल्या डोळ्यांनी अभि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहात होता… स्पर्धा संपली… निकाल जाहीर झाले… आणि सृजन नं त्यानं कमावलेली मेडल्स घेऊन सखी कडे धावत आला… त्यानं तिला त्या स्टेडियम च्या मध्यभागी आणलं… एक माइक हातात घेतला… आणि सगळी मेडल्स तिच्या गळ्यात घातली… गुडघ्यावर खाली बसला… आणि त्या तमाम पब्लिक समोर तिला म्हणाला… सखी… i really love u from bottom of my heart… will u marry me?…
सगळीकडे पिन ड्रॉप शांतता… सखीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले… ती ही खाली बसली… आणि त्याच्या मिठीत शिरत म्हणाली… yes!…i will..
टाळ्यांचा कडकडाट… बघणारे सगळेच ह्या गोड क्षणांनी भारावून गेले… खऱ्या अर्थी आज स्पर्धेचा उद्देश सफल झाला होता . पुनर्वसन… नव्हे सामाजिक मान्यता मिळत होती… सृजन सारख्या ट्रान्सजेन्डर ला.. आपल्या समाजात…  आणि ते ही त्याच पहिलं वहिल प्रेम…

निशू धावत आली आणि सखीला मिठी मारत म्हणाली… ह्या सगळ्याच श्रेय… अभि ला… त्यानच तुम्हाला आज एकत्र आणलय… अरे..
पण हा अभि कुठाय…?  सगळीकडे शोधूनही तो कुठेच दिसला नाही… त्याचा  फोन ही बंद येत होता…
आणि जेव्हा हे सगळे रूम वर परत आले… तेव्हा त्यांच्यासाठी अजून एक सरप्राईज वाट पाहात होतं..

अभि नं सखीच्या आणि सृजनच्या आई वडिलांना ही या दोघांबद्दल सांगितलं… सृजन च्या भूतकाळासह… आणि आता तो कसा नॉर्मल आयुष्य जगू शकतो हे ही समजावून सांगितलं… शेवटी दोन्ही घरातून होकार मिळवत त्यांनी आज सगळ्यांना एकत्र आणलं…

सखी आणि सृजन ला जवळ घेत दोघांनी आशीर्वाद दिले…
*********
कधी कधी स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून दुसऱ्याच्या भावना जपणारा मित्र.. अभि…
लग्नाला नकार मिळूनही समजूतदारपणे बाजूला होणारा नील
आणि स्वतः च्या न्यूनगंडावर मात करत स्वतः च प्रेम मिळवणारा सृजन… सगळेच हिरो ठरले…
आणि शेवट.. गोड झाला.. *********
समाप्त..

Image by Gerd Altmann from Pixabay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!