पाऊस.. भाग २..
” अं..हो..हो..
संतोष एकदम भानावर आला.
तोच अचानक पाऊस सुरू झाला.तसा जोयाने आपला नकाब पुन्हा तोंडावर घेतला.
तिने आईंना हळूच आत बसविले बाबांना पण ‘ काळजी घ्या तुम्ही पण बाबा ” म्हणाली.
” हो पोरी.जा तु आत. पावसात भिजत आहेस.आजारी पडशील.जातो आम्ही.आणि हो घरी ये.आई वडिलांना घेऊन” बाबा म्हणाले.
तशी जोया पावसात भिजत आत दवाखान्यात पळाली आणि तेथूनच बाय आई म्हणाली.
घरी आल्यावर आईला तिच्या खोलीत संतोषने नेले.आणि गाडीतून आणलेल्या सगळ्या वस्तू नीट ठेवू लागला.जसजसे तो वस्तू उचलून ठेवत होता तसतसे त्यावर नकळत पडलेले पावसाचे थेंब अलवार त्याच्या हाताला स्पर्श करत होते.जसे स्पर्श होईल तसे त्याला जोयाचा सुंदर नकाबामागील चेहरा आणि तो गडबडीने पुन्हा चेहऱ्यावर ओढून घेणारी जोया आठवू लागली.त्याच्या मनात एक वेगळीच चलबिचल सुरू झाली.
रात्री आई सांगेल तसे संतोषने वरण भात मेथीची भाजी केली.आई वडिलांना दुध गरम करून औषधे देऊन संतोष आपल्या खोलीत जाऊन शांतपणे पलंगावर पडला.काही केल्या त्याला झोप लागेना.एकसारखे त्याला जोयाचा गोड आवाज आणि तिचा सुंदर चेहरा दिसू लागला.
सकाळी तो लवकरच उठला.आईं बाबांना आईने सांगितले तसे पोहे करून दिले.
” आई आज मी आॅफिसला जातो.वरण भात कुकरमध्ये लावतो.तुम्ही खा.मी संध्याकाळी लवकर येईन घरी”
” हो हो तु जा बाळा.आणि हो कुकर नको लावू मी मावशीला बोलावले आहे येतील त्या लवकर.आजपासुन स्वैपाक पण करा म्हटले आहे.मी जरा बरी होई पर्यंत”.
” बरं केलं आई.
चल मी निघतो वेळ होतं आहे”
…..
….कधी एकदा आॅफिस सुटेल आणि मी जोयाला भेटतो असे संतोषला झाले.तो लवकरच बाहेर पडला आणि दवाखान्यात गेला.पण तिथे जोया नव्हतीच.
त्याने आत नर्सकडे चौकशी केली.ती म्हणाली आज जोया लवकरच घरी गेली.
संतोषचा एकदम मुड आॅफ झाला.तो नर्वस झाला.
तसाच उदास होऊन घरी आला तर त्याला एक ओळखीचा सुगंध वास आला.
” अरे संतोष जरा लवकर आला असतास तर .जोया भेटली असती तुला.आत्ताच जरा वेळ झाला गेली ती” बाबांनीं संतोषला बघुन बोलले.
” अं..
….ओ…
..हो…आज जरा काम जास्त होते.इतके दिवस गेलो नाही न त्यामुळे.” असे म्हटला खरे पण आतुन खंत वाटत होती.
जेवण झाल्यावर तो आपल्या खोलीमध्ये गेला.फोन हातात होता.काय करावे.जोयाला फोन करावे कि नको.ही वेळ नाही रात्र झाली आहे.बरे वाटत नाही या वेळी फोन करावे म्हणजे.
असे मनात तो विचार करत होता तोच त्याचा फोन वाजला.
आणि तो आनंदी आणि आश्र्चर्यचकित झाला.जोयाचा फोन आला होता.
अगदी गडबडीने त्याने फोन उचलला” हैलो..
….’ हैलो..म्हणजे.साॅरी या वेळी फोन केला.”
” अरे यात सॉरी काय.बोला काय म्हणता.कशा आहात”
” हो मी आहे बरी.आले होते मी आज तुमच्या घरी.”
” हो हो बाबांनी सांगितले मला”
” हो का.तर मी यासाठी फोन केला कि तुमच्या घरी त्या कामवाल्या मावशी येतात न ज्या स्वैपाक पण करतात तर त्यांचे जेवण करणे अगदी गलिच्छ आहे.आईंना असले जेवण देणे म्हणजे समजते न तुम्हाला.त्या बाई स्वच्छतेच्या बाबतीत एकदम बेकार आहेत.बाबांना पण असले जेवण नकोच.तुम्ही दुसरी बाई ठेवा स्वैपाक करायला.या धुणे भांडी करायला ठिक आहेत.म्हणजे गैरसमज नको मी आज पाहीले यांना किती घाण हातांनीं जेवण बनवले बाप रे”
” नाही नाही गैरसमज कसला.आता मोठी बहीण येत आहे दोन दिवसांत मग ती करेल स्वैपाक”
” बरे झाले ताई येत आहेत.आईंना पण सोबत होईल.एकट्या बसतात वेळ जात नाही.बाबा पण आपल्या कामात असतात”
” हो न.”
” चला माझी काळजी मिटली.ठेवते फोन.गुड नाईट”
जोयाने फोन ठेवला खरा पण संतोषच्या हातात फोन होताच.तो एकसारखे फोन कडे बघत होता.
डोळ्यात जोयाचा चेहराच दिसत होता.
….” चल आई निघतो मी” म्हणत संतोष बाहेर पडणार तोच जोया आली.त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
” अरे निघालात तुम्ही.मी आईंना खिचडी आणि वरण करून आणले आहे.आणि बाबांना वांगे,मेथीची भाजी,भाकरी खास अम्मीने पाठविले आहे”
” अरे बापरे एवढे कशाला.
तुम्हाला त्रास कशाला करुन घेता.दोन दिवसांत ताई येतेच न”
” असु दे ओ यात काय त्रास.जे घरात बनते तेच आणले आहे.आणि शाकाहारी म्हणजे इजी कुकींग.
संतोष आॅफिसला गेला.जोया पण डब्बा देऊन दवाखान्याला गेली.
” मुलगीला खुप छान संस्कार दिले आहेत तिच्या आई वडिलांनी” बाबांनी आईंना म्हटले.
” हो न” आई म्हटली.
दुपारी संतोषने जोयाला फोन केला.दोघांनीं खुप गप्पा केल्या.
ताई आली तसे घरचे वातावरण बदलले.
ताईचा हसमुख स्वभाव.खळखळून हसणे.सारखी बडबड करणे.घरात एक लहान बाळ आले असेच झाले.
आईपण मुलीच्या येण्याने सुखावली.
इकडे संतोष जोयाचे रोज फोनवर संभाषण होऊ लागले.दोघे रोज तासंतास बोलत होते.कधी कधी संतोष तिला दवाखान्यात भेटायला जाऊ लागला.
या भेटी आणि फोनवरील संभाषण याने प्रेमाचे रुप कधी धारण केले हे दोघांनाही कळले नाही.
आता तर हे दोघे एकमेकांच्या शिवाय जगूच शकत नव्हते.
आज जोयाचा वाढदिवस होता.
” आज तुझा दिवस आहे जोया.सांग तुला काय हवंय” संतोष म्हणाला
” मला न जन्मभरासाठी साथ हवीय तुझी. माझ्या सुखात, दुःखात तु माझ्या सोबत असावा.मी तुझी सावली बनून राहेन”
” हो दिले वचन तुला”
इथपर्यंत तर ठिक आहे पण आता दोघांसमोर एकच यक्ष प्रश्न आपापल्या घरात लग्नाबद्दल बोलायचे तर कसे आणि कोण?
दोघांनीही रात्रभर विचार केला दोघांनांहीं आपल्या बाबतीत बोलणारी व्यक्ती म्हणजे ताई हेच एकमेव मार्ग दिसला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ” ताई आज दुपारी जरा बाहेर जायचे आहे तु तयार रहा मी येतो तुला न्यायला” म्हणत संतोष बाहेर पडला.
” काय रे…
कोठे..
कशाला..जायचे..
गेला वाटत .एक धड सांगत नाही बरोबर” म्हणत ताई आईजवळ गेली.
……..
…… कॉफी शॉप मध्ये ताई, संतोष बसले.
” अरे काय काम आहे.कोठे जायचे काही सांगशील का” ताईने विचारले
” अगं हो हो सांगतो तुला किती प्रश्र्न करशील.घे आधी कॉफी पी” असे म्हणत संतोषने ताईला आपल्या प्रेमाविषयी सगळे सांगितले.पण जोयाचे नाव सांगितले नाही.
ताई जोरजोरात हसू लागली” अरे संतोष तु आणि प्रेमात.
कोण रे वेडी तुझ्या प्रेमात पडली’
” येईल ती आता
हो आलीच “
” कोण रे कोठे आहे.मला तर दिसत नाही”
” ही काय समोरच उभी आहे”
” अरे ही….
…..ही तर…
…..ज….
…..जोया न रे…
….अरे ही…
… मुस्लिम रे…
…ताईला एकदम आश्र्चर्याचा धक्का बसला.
” हो ताई.आमचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे.आणि आम्ही लग्न करणार आहोत.”
” शक्य नाही.हे लग्न होणार नाही.अरे मुर्ख आहात का तुम्ही दोघे.”
” नाही ताई तु मदत केली तर शक्य होईल.आई बाबांना तु सांग.जोयाच्या अम्मी अब्बुंना सांगण्याचे काम त्यांचें डॉ.मित्र करतील.प्लिज ताई”
” नाही रे बाबा.अरे आई आताच तर बरी झाली आहे तु हा शॉक देऊ नको तिला.”
” नाही ताई.तसे जोया आईला खूप आवडते.तिने तिच्या मनात घर केले आहे.एखादे वेळी जोयाचा फोन आला नाही तर ती स्वत: तिला फोन करून विचारपूस करते.आणि बाबां पण हिला आपल्या मुली सारखेच समजतात.”
” अरे संतोष हे सगळे खरे आहे पण ते इथपर्यंत ठिक आहे पण तु एकदम लग्नाचे बोलतो हे कसे शक्य आहे?
उगीच मला या बेडीत अडकवू नकोस.मी आता एक महीनाभर आहे नंतर मी जाईन.पण या मुळे माझे माहेर मला बंद होईल रे”
” नाही ताई …
…मी जेव्हा आई बाबा समोर बोलेन तेव्हा तु माझ्या सोबत उभी रहा.
आणि हो जर आईंनें काही त्रास करून घेतला तर मी हा विषय तिथेच थांबविन.
पण…
…पण मी लग्न करणार तर जोया बरोबर नाही तर आजन्म अविवाहित राहीन”
आता ताई समोर कोडेच.
…काय करावे.
तशी जोया ताईला ही आवडत होती.एक मैत्रिण,एक संस्कारीत मुलगी,एक सुंदर शिक्षित मुलगी.तिच्यामध्ये अवगुण शोधुन ही सापडणार नाहीत अशी सर्वगुणसंपन्न मुलगी.पण….
….पण ती मुस्लिम .
हे कसे शक्य होणार.
…. इकडे जोयाच्या घरी.
तिच्या वडिलांचें डॉ.मित्र घरी आले.
” अरे, आप..अस्सलाम व आलैकुम.
…आईये भाईजान”
जोयाची अम्मीनें म्हटले.
” वालैकुम अस्सलाम.”
कोठे आमचे मित्र.ईद का चांद हुआ हैं”
” हो ,आता परिक्षा जवळ आली आहे न मग शाळेत जरा जास्त वेळ लागतो.आणि घरी येऊन पण काही शाळेचे काम करत बसतात.”
” अच्छा”
तोच आतुन जोयाचे अब्बु बाहेर आले.दोघें मित्र आनंदानें एकमेकांना भेटले.
” काय बाबा आज रस्ता चुकलास.चक्क कृष्ण सुदाम्याच्या घरी.अहोभाग्य आमचे”. जोयाचे अब्बु आपल्या मित्राला म्हणाले.
” बसा बोलत तुम्ही दोघे मी चहापाण्याचे बघते” म्हणत जोयाची अम्मी आत गेली.
” अरे समीर…
जोयाबद्दल काही विचार केला की नाही.अरे मुलगी मोठी झाली आहे तिच्या लग्नाचा विचार केला की नाही.”
” हो रे सांगितले आहे मी आमच्या नात्यात एकाला.तो चांगली स्थळे सुचवितो”
” अरे तुला तेच तर सांगण्या साठी आलो आहे.हे बघ गैरसमज करून घेऊ नको.जोया जशी तुझी मुलगी तशीच माझी देखील आहे.मी तिला लहान पणापासून अंगा खांद्यावर खेळविली आहे.तिचे बरे वाईट मला पण तुझ्या इतकेच महत्त्वाचे.
तर….
…. शांतपणे ऐकून घे.
….जोयाचे एका मुलावर जिवापाड प्रेम आहे.मुलगा मला माहित आहे.चांगल्या घरचा आहे.शिकलेला, नोकरी करतो आणि मेन म्हणजे दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात”
” कोण आहे? काय आडनाव.
आमच्या घराण्यात बसतो का?
आई वडील कुठले.नाही म्हणजे पुढे आम्हाला नातेवाईकांत कमी पणा नको रे.तुला तर आमच्या नातेवाईकांविषयी माहीत आहे न”
” हो रे..
…सांगतो ऐक…
…मुलग्याचे नाव …
…संतोष…”
” काय….’
# क्रमशः…
Image by Jiří Rotrekl from Pixabay
- घटस्थापना.. - July 29, 2021
- सुहासिनी - June 15, 2021
- कन्या दान - May 8, 2021