गुंतता हृदय हे…सफर

सफर…

जिंदगी एक सुहाना सफर है…

नवी कोरी गाडी…

व्हॅलेंटाईन डे चं निमित्त…

मेलं, आपलं कसलं आलंय व्हॅलेंटाईन…

पाच वर्षे झाली लग्नाला…

असं काहीसं मनात धुसफूसत मी आधल्या दिवशी झोपी गेले…

पण रात्री बारा वाजता मला चारशे चाळीसचा झटका लागल्यासारखा झटका लागला…

कारण ह्यांनी मला झोपेतून उठवून व्हॅलेंटाईन विषेस दिल्या…

पहाटे लवकर उठायचंय आपल्याला…

का?

चलो महाबळेश्वर…

अहो आश्चर्यम्…

झालेल्या आनंदाने मला झोपच लागत नव्हती…

कशीबशी लागली नंतर…

गजर झाला…

गजर बंद करून पाच मिनिटे झोपायचा प्रश्नच नव्हता…

पटकन उठले, ह्यांना उठवलं…

आवरलं…

मिशन महाबळेश्वर…

गुलाबी थंडी…

बाजूला ड्रायव्हिंगची अवीट गोडी असणारा नवरा…

म्हणूनच मी म्हटलं..सुहाना सफर…

निघता निघता सहा वाजले…

मुंबई गोवा हायवे…

जाऊदे जोरात…

मधेच अद्रक मारके चाय झालेला…

आहोंचा एक्सलेटरवर जोरदार पाय…

सटाक् सटाक् ओव्हरटेक…

ओव्हरटेक नाही जमली की फुरफूर व्हायची…

मला काळजी…

त्यांना मात्र नो फिकीर…

त्यांना आवरताना माझ्या नाकात नऊ यायचे…

बट ओके..वुई वेर एन्जॉईंग द माहोल…

आता नाश्त्याची वेळ…

गरमागरम मिसळ…

सोने पे सुहागा…

दोघेही फुल्ली चार्जड…

गाडी नव्याने वेग घेऊ लागली…

महाबळेश्वर जवळ येतच होतं…

गाडीतला ए सी बंद…

खिडक्या सताट उघड्या झाल्या…

गाडीत येणारी वाऱ्याची झुळूक…

आणि आमच्या मनात प्रेमाची…

घाटात धुक्याची चादर…

पार्किंग लाईट चालू…

वळणांवर पिप्पीsssssssप…

फायनली…

फायनली मॅप्रो गार्डन दिसलं…

याचसाठी केला होता अट्टाहास…

गाडी पार्कड ऍट मॅप्रो गार्डन…

दोघंही गाडीतून उतरलो…

एकमेकांचा हात हातात घेतला…

लग्नापूर्वीचे दिवस आठवले…

मन अगदी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी झालं…

फिलिंग कूल ऍट महाबळेश्वर…

माझ्या कूल ड्यूड बरोबर कूल सेल्फी…

आता…

आता मोबाईल खिशात…

एन्जॉईंग मॅप्रो…

एन्जॉईंग मझामा चॉकलेट्स…

दोनेक तासाने निघालो…

काही पॉईंट्स बघितले…

प्रत्येक पॉईंटची लग्नापूर्वीची आठवण जागी झाली…

तेव्हा लायसन नव्हतं, आता आहे…

एवढाच काय तो फरक…

महाबळेश्वर मनात आणि डोळ्यात साठत होतं…

आमचं प्रेम द्विगुणीत होत होतं…

कॉर्न चॅट…

गरमागरम बुट्टा…

शेवटी वेण्णा लेक…

बोटिंग…

मग मकई फ्रँकी…

मकई पकोडा…

संध्याकाळचे पाच…

परतीची सफर सुरू होणार थोड्या वेळाने…

पाय आणि मन दोन्हीही जड…

पर्याय नाही…

उद्यापासून रुटीन चालू होणार…

अनफरगेटेबल व्हॅलेंटाईन डे…

सेंट परसेन्ट एन्जॉईड…………………

Image by efes from Pixabay 

Ashwini Athavale

Ashwini Athavale

स्वतः बद्दलची माहिती- अलिबाग, रायगड येथे JSM महाविद्यालयात प्राध्यापिका. वाचन, लेखनाची आवड आहे. हलक्याफुलक्या कथा, आत्मचरित्र लिहायला आवडतं.

One thought on “गुंतता हृदय हे…सफर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!