गुंतता हृदय हे…कोडं प्रेमाचं- भाग १

सेंट थॉमस शाळेचे आवार अगदी फुलून आले होते . मुलांच्या चेहेऱ्यावर कमालीचा आनंद होता . मागील एक वर्षांपासून ज्याचा बागुलबुवा मानगुटीवर बसला होता ती आठवी  ICSC बोर्डाची परीक्षा चक्क संपली होती .

हर्ष नि तर पेपर चा बोळा केला आणि हे s s भिरकावला फुटबॉल सारखा .

आता मस्त विडिओ गेम्स , ऍडवेंचर टूर्स , movis ..मज्जा .

” ए चम्या , कुठे निघालास घाईघाईत ?” हर्ष नि विचारले

” अरे ,  आमचं गाव आहेना , जामपूर ,तिथे जायचंय .काका ,आत्या ,सगळे मिळून ”

हर्ष नि विचार केला , आपले पण आहे की गाव ..सोनपूर …बाबा किती वेळा म्हणाले परीक्षा संपली की जा म्हणून .

तिथे पणजोबांनी बांधलेलं मोठ्ठ घर आहे . आता तिथे आजी ,रखमा काकू आणि हेरंब काका रहातात . तेच शेत पण बघतात . पण छोट्या गावात राहणे ? So boarig !!!

टीवल्या बावल्या करत हर्ष घरी आला . खूप धिंगाणा घातला घरात ..मोठयाने इंग्लिश गाणे , जस्टीन बिबर अन काय काय .

मॉम चा फोन आला .

…हे प्रिन्स , how was the exam ?

…..nice mom !! तू केव्हा येणार ?

….आज जास्त काम नाहीये . पाच पर्यंत येते , मग चायनीज ..काय ?

…love you mom !!

संध्याकाळी आई आली .

…. ह s s र्ष !! फ्री बर्ड हा ? चिन्मय ला किंवा रश्मी ला  का नाही बोलवलस ?

…..रश्मी फॅमिली सोबत movie ला जातेय आणि चम्या त्याच्या जामपूर ला जातोय .how बोअरींग !!

…सगळंच कसं रे कंटाळवाणं वाटतं तुम्हाला . आम्ही पहा बरं ,छोट्या छोट्या गोष्टीत केवढा आनंद घेतो .

बरं चायनीज खायला जायचं न ?

हर्ष चे बाबा इंडोनेशिया त होते .तो आणि आई इथे भारतात मुंबईत ..

..हर्ष , आजी तुझी खूप आठवण काढते रे . तिला नाही जमत इथे यायला .तुला सुट्टी आहे , आपलं शेत आहे तिथे , जाऊन येतोस का ?

…grow up मॉम!!! मी तिथे जाऊन काय करणार ? तिथे इंटरनेट ,वाय फाय  काहीच नसेल ..no way dude .

…अरे बघ तर खरं , शेत कसं असतं , गावात काय काय असतं , तिथले लोक किती कमी रिसौरसेस मध्ये किती खुश असतात ..तेवढाच चेंज ! आणि नेट कॅफे आहे तिथे एक हां !!

….ओके मम्मी , पण फक्त दोनच दिवस हं .

…..कदम काकांना घेऊन जाऊ , मग  मला ड्रायव्हिंग चे टेन्शन नाही .मी पण अनेक वर्षात गेले नाहीये .

…..पण दोनच दिवस ह मॉम !!

…हो रे बाबा !! मला पण सुट्टी कुठाय

खूप उत्साहात रोहिणीने , हर्ष च्या आईने सगळी तयारी केली ,आणि दोघे निघाले . रस्त्यात कदम काकांची गाणी … किशोर कुमाचे गाणे खूपच छान गायचे काका .

…..मॉम, हे गाणे तुला माहिती आहेत ?

…. म्हणजे काय ? अरे तो काळ गाजवला रे ह्या किशोर ,लता ,आशा ,रफी …यांनी .

…..थांब मी U Tube वर ऐकवतो , काका ,गाडीचं ब्लु टूथ ऑन करा

….हर्ष , जुनं ते वाईट अशी आधीच कल्पना करता तुम्ही मुलं .मग ओरिजनल क्लासिक ,अभिजात सगळं सुटतं रे .

….आमचं music  काय वाईट आहे का ?

….आम्ही कुठे म्हणतो ? फक्त ते जुनं देखील ऐकावं इतकंच

रस्त्यात दोन्ही बाजूने शेत होते . उन्हाळ्यात निघालेले धान्य साठवले होते मोठ्या मोठया कणग्या मध्ये .

……हे काय आहे मॉम ?

……हे  धान्य साठवायचे कोठार आहे .बघ किती सुरेख लिंपून टाकतात शेणाने  .

….wow ..इगलू सारखं वाटतंय .

गाडी हवेली समोर येऊन थांबली .एवढे मोठ्ठे घर हर्ष ने बघितलेच नव्हते .

आजी उत्साहात बाहेर आली . राखमाबाई ने तुकडा ओवाळून टाकला .

….या धाकले मालक .

….कमोंन यार , मी काय मालकए ?

सगळे हसले .

आजीने हर्ष ला सगळे घर फिरून दाखवले ..बापरे केवढं अंगण …

कवढाले मोठ्ठे मोठ्ठे शिसवी पलंग !! मोठे मोठे दरवाजे ..भिंतीवर जुने मोठाले पेंटिंग्ज ..

हर्ष ला वाटलं त्यापेक्षा खूपच सुंदर होतं सगळं . ह्यापूर्वी तो सोनपुर ला आला तेव्हा खूप लहान होता . आता हे सगळं एन्जॉय करण्याचं वय होतं .

मागच्या अंगणात खूप छान बाग होती . पेरू , जांभूळ ,सीताफळाची झाडं होती . फळ नव्हते पण उन्हाळा असला तरी छान दाट सावली होती . दहा बारा संत्र पण लागले होते .

एका बाजूला मोगरा घमघमत होता ….

हर्ष ला वेड लागायची पाळी आली .

आई आणि आजी आत जेवणाची तयारी करत होत्या ,इतक्यात टप्प कन काहीतरी पडलं . ती विटी दांडूची विटी होती . भिंती पलीकडे मागे मोठी मोकळी जागा होती ,तिकडून आली होती .

त्याने कुतूहलाने उचलली ,आणि जोरात कुणीतरी ओरडले

” आता याच्यावर डाव !!!”

त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर  उंच भिंतीवर बिना आधाराची एक मुलगी उभी होती .

” ओह No !! Get Down यार !!”

” ती विटी फेक इकडे ,आणि मागच्या दराने ये बाहेर .तुझ्यावर डाव आहे ”

त्याला कळालेच नाही .

तोपर्यंत आणखी पाच सात तोंडं उगवले भिंतीला .

” ए बाहेर ये ना ” तीच झाशीची राणी बोलली .

हर्ष बाहेर गेला . एवढया उंच भिंतीवर ही पोरं चढलीच कशी ? त्याला वाटले . लगेच सगळ्यांनी धपाधप उद्या टाकल्या .

” चल ..डाव घे ”

” म्हणजे ? ”

सगळे पोरं हसले .

” तूच का हर्ष ?” ..तीच

” हो .तुला कसं माहीत ?”

” हवेली नानी कडे कुणी येणार असलं की सगळ्या सोनपुर मध्ये कळतं .

आपले हेरंब काका आहेत न ,रेडियो सोनपुर ”

आता मात्र हर्ष ला खूप हसू आलं .

सगळयांनि ओळख सांगितली . कालू ,

टप्प्या , मुकुल्या , चिंगी , सावू …

” आणि मी गौरी !! ” तीच चुनचूणीत ..

दोन घट्ट वेण्या , छानसा फ्रॉक ,सावळी पण तरतरीत .

बाकी पोरात स्टायलिश हर्ष उठून दिसत होता .

“””गौरी गौरी शेणाची गौरी “”‘ सगळ्यांनी एकच गलका केला . गौरी ने तिथली कामटी उचलली आणि त्यांच्या मागे धावायला लागली .

हर्ष ला इतकी मजा वाटली .

कोवळ्या वयाचे सारे , लगेच हर्ष त्यांच्यात  सामावला .

हेरंब काका आले अन हर्ष ला जेवायला घेऊन गेले .

” जा घरी पोरांनो .जेवा आणि गुमान बसा  जरा . सुट्ट्या लागल्यात मग कांय बंदर झालेत सगळे ”

लगेच पोरांनी   हुप्प ,हुप्प आवाज केले .

हर्ष ला हे फार फार नवीन होतं .

दुपारी उशिरा   तो बाहेर पडला . दोन्ही बाजूला घरं , केळीच्या , नारळीच्या बागा , लाल रस्ते ..चित्रात होतं पाहिलेलं ..,प्रत्यक्षात गाव इतकं wow असेल असं वाटलं नव्हतं त्याला .

” ए हर्ष !!! ” गौरी ने हाक मारली . तो आजूबाजूला बघत होता .

” अरे वर बघ वर !! ‘” ती सुपारीच्या झाडावर चढली होती .

” No !! Its too much yaar . ए गौरी ,तू जमिनीवर चालतच नाहीस का ?  Avenger आहेस का ?”

” काय आहे ? हे बघ शिवी नाही द्यायची हा , सुपारी फेकून मारीन ”

” कुठाय सुपारी ?”

” काय यडं आहे  रे हे !! अरे मी सुपारी च्या झाडावर आहे . आत्ता तू काय म्हटलं मला ?”

” तू खाली ये आधी ,मग सांगतो .”

दोरीचे फासे अडकवत ती सरसर खाली आली  ,आणि धपाकन त्याच्या समोर उडी मारली .

” बोल ,काय म्हणालास ?”

” आग ,सुपर पॉवर वाला ,म्हणजे खूप ताकद वाला  अवेनजर म्हणालो ”

” अस्सं ”

मग गौरी नि अंधार पडे पर्यंत त्याला अख्ख गाव फिरवलं .

विहीर ,मोट ,बैल ,खळ , पाटाचं पाणी ..

हर्ष अगदी हरवून गेला .

हे सगळं किती छान , मोकळं मोकळं आहे ..शांत …

दोन दिवस कसे गेले त्याला कळलेच नाही .

क्रमश:

Image by efes from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

7 thoughts on “गुंतता हृदय हे…कोडं प्रेमाचं- भाग १

  • February 26, 2021 at 4:41 am
    Permalink

    Waw…. खूपच सुंदर…. सोनगांव अगदी डोळ्यासमोर उभ राहिल…. मस्तच 👌👌👌

    Reply
  • February 26, 2021 at 12:26 pm
    Permalink

    धन्यवाद

    Reply
  • February 26, 2021 at 12:28 pm
    Permalink

    कमाल सुरेख
    आवडलं

    Reply
    • February 26, 2021 at 2:46 pm
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • February 26, 2021 at 2:05 pm
    Permalink

    कथेचा पुढचा पार्ट वाचायला आवडेल

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!