गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ६

आधीच्या भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ५

सखी आणि समर कॅफेत बसलेले आहेत..
समर तिला न्याहाळत म्हणाला..

सखी..
आज सकाळी इथे पोचल्यापासूनच तुझी आठवण येत होती कॉल ही केले तुला.. पण तू घेतलाच नाहीस कॉल..
तसं केसांची एक बट कानामागे सारत सखी हसली..
तिचं ते मधाळ हसू म्हणजे समर साठी फीस्ट होती.. तो पक्का प्रेमात पडला होता तिच्या आणि आता हळू हळू तिला ही तो आवडतोय हे जाणवू लागलं होतं…

बोल ना… त्यानं परत विचारलं..
अरे खरचं जाम कामात होते आणि फोन सायलंट होता म्हणून नाही लक्षात आला..
पण आता आहे की तुझ्यासमोर..
आता बोल… काय सांगायचं होतं एवढं..?

काही नाही सहजच… त्याला तरी नेमकं कुठं सुचत होतं?
हो का मग ही कॉफ़ी डेट सहजच ना? तिने खडा मारून पाहिला ..
हो.. म्हणजे नाही.. म्हणजे… आता आपण फ्रेंड्स आहोत ना.. म्हणून… बाजू सावरत तो म्हणाला.
खरंच?? तिने पुन्हा मुद्दाम त्याला डिवचलं
हो ग राणी…. खरंच.. आणि तिला राणी म्हणून गेलो हे कळून त्यानं जीभ चावली..
ती मात्र गोड लाजली..
आता पश्चिमे ची लालिमा सखीच्या गालावर उमटली होती..
चला निघूयात.. म्हणत सखी उठली..
तसं समर नि तिचा हात धरला..

थांब ना… एवढ्यात निघालीस?
समर साहेब जरा घड्याळ पहा.. सात वाजत आलेत.. बाबा ही घरी वाट पाहत असतील..
आणि बाय दि वे मी 3तास गप्पा मारतीये तुझ्याशी… तरी पोट भरलं नाही?
यावर एक कातिल स्माईल देत समर म्हणाला.. आयुष्यभर ऐकू शकतो तुला..
पुरे … चल जाऊ दे मला..
म्हणजे मला घरी नाही बोलावणार?? बरं जातो मी परत.. तसं ही फ्लाइट उद्याच आहें.आज हॉटेल जिंदाबाद… नाराजीचा सूर दाखवत समर म्हणाला…
सखी न क्षणभर पाहिलं आणि मग म्हणाली…
असा आहे होय प्लॅन…
बर… मग पुढच्या वेळी ये डिनर ला माझ्याकडे…        त्याला डोळा मारत सखी म्हणाली..
हेय… म्हणजे आज तू मला घरी नेणार होतीस..?

****

तांज मधे जे टेबल सजत होतं ते खास विहान साठी…
आणि ही डिनर डेट होती त्याच्या गर्लफ्रेंड कडून…
** शनाया निगम**
फॅशन इंडस्ट्री मधला उभरता सितारा..
वेगवेगळ्या ब्रँड च्या डिझाईन्स तिच्या कडून अँप्रोव्ह होत होत्या…
विशेषतः सेलिब्रिटी वेडींग… ह्यात तर तिचा हातखंडा होता.
बरोबर 8 वाजता तिची कार विहान ला घेऊन ताज च्या पोर्च मधे शिरली.. Valet parking साठी गाडी देऊन ती दोघं उतरली आणि रूफ टॉप रेस्तो च्या लिफ्ट मधे शिरली..
इतक्यात विहान ला एक कॉल आला आणि त्या कॅप्सूल लिफ्ट मधे फोनवर बोलता बोलता तो वळला..
त्याची पाठ आहें हे बघून शनाया नि कुणाला तरी कॉल केला..
त्याचं वेळी समोरच्या कॅप्सूल लिफ्ट मधून एक व्यक्ती खाली जाताना काहीतरी खूण करून गेली..
शनाया त्या व्यक्तीला प्रतिसाद देतीये असं जाणवून विहान नि झटकन मागे वळून पाहिलं पण त्याला ती व्यक्ती नेमकी कोण आहे ते नाही कळू शकलं..
शनाया नि मुद्दाम प्रश्नार्थक पाहिलं आणि विहान नि ही ‘काही नाही’ असं मानेनेच खुणावलं..

****
#शनाया नी कुणाला खुणावलं?
#डील कॅन्सल झाल्याबद्दल निशांत काय रिऍक्ट करेल?
#सखी आणि समर चं नातं तिच्या बाबांच्या लक्षात येईल?
क्रमश :
मनस्वी

Image by efes from Pixabay

5 thoughts on “गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ६

    • February 26, 2021 at 10:11 am
      Permalink

      😍thanks a lot

      Reply
      • February 27, 2021 at 7:07 pm
        Permalink

        Interesting.. next part?

        Reply
  • March 1, 2021 at 12:50 pm
    Permalink

    Farach interesting hot chalaki ahe story….keep it up!

    Reply
  • April 14, 2021 at 3:45 pm
    Permalink

    भाग 7 कधी येणार ?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!