गुंतता हृदय हे…जब्त_ए_इश्क..10

आधीच्या भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त_ए_इश्क- 9

शनाया समोर बसलेल्या समर कडें एकटक पाहत होती… होताच तो लेडी किलर 😜
एकदम डॅशिंग आणि हँडसम…
मनातल्या मनात शनाया नि समरला कसं पटवता येईल याचा प्लॅन आखायला सुरुवात केली..
याला डायरेक्ट बिझनेस डेट ला विचारावं का? या विचारात ती असतानाच समर ला एक कॉल आला.. आणि त्याच्या चेहेऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा उमलली..

त्यानं तो कॉल घेण्यासाठी तिची परवानगी मागितली आणि तो क्षणात उठून गेला..
बोल गं… समर म्हणाला…
पलीकडून एक सुस्कारा… हुश्श..
काय झालं?
अरे तू बंगलोर ला पोचलास का?
हो पोचलो… आणि मेसेज ही केला होता तुला.. मिळाला नाही का?
I am sorry… कॉल करायचा राहून गेला..
हम्म्म्म… बर ऐक… बाबा आहेत समोर त्यांना बोलायचं होतं.. सखी नि फोन बाबांकडे दिला..
हॅल्लो बाबा… समर… बोला ना
अरे तू आता कामात आहेस का? बाबांना खरंतर त्याच्या घरच्यांबद्दल जाणून घ्यायच होतं…
बाबा… मी आता एका मिटिंग मधे आहें उद्या बोलतो.. चालेल ना?
हो हो .. ठेवतो बाय.. म्हणत त्यांनी कॉल कट केला..
सखी नि पुन्हा एकदा हुश्श्य केलं आणि ती बेडरूम मधे निघून गेली…
***

इकडे समर नि पुन्हा मेसेज केला तिला.. काय झालंय… बाबांना काय बोलायचंय?
आता सखी पुढे एकचं पर्याय होता आणि ते म्हणजे समर ला सगळं सत्य सांगायचं..
तिने पुन्हा कॉल केला.. त्यानं झटक्यात उचलला…
समर आता नक्की बोलू शकतो आपण? सखी ने ठाम पणे विचारलं..
हो डिअर.. तुझ्यासाठी मी मोकळा आहें बोल…
नाही तसं नाही… तू कुठे तरी एकटा बसू शकशील आशा ठिकाणी जाशील का प्लीज? तिच्या आवाजातली चिंता तिला लपवता येत नव्हती..
एक मिनिट… म्हणत तो पुन्हा शनाया समोर आला… सॉरी मिस शनाया… मला आपली आजची मिटिंग इथेचं कॉल ऑफ करावी लागतिये… आपण उद्या पुन्हा वेळ ठरवून भेटूयात… Its फॅमिली कॉल… बाय..
शनाया आतून जाम चिडली होती पण आता उपाय नव्हता.. तिने उसनं हसू चेहेऱ्यावर आणलं आणि त्याला निरोप दिला…

*****
समर नि तातडीनं ऑफिस गाठलं.. ऑफिसला पोचे पर्यंत तो आणि सखी नॉर्मल गप्पा मारत होते… फायनली तो त्याच्या केबिन मधे आला आणि त्यानी मुद्द्याला हात घातला…
आता बोल सखी… काय सांगणार होतीस?
समर..
मी काही गोष्टी मुद्दाम तुला सुरवातीला सांगितल्या नव्हत्या कारण जसा तू भेटलास तसेच इतर काहीजण अचानक पुन्हा भूतकाळातून या वर्तमान काळाच्या पटावर आले आहेत..
समर मी सखी..
म्हणजेच तुझ्या बेस्ट फ्रेंड विहान ची धाकटी बहीण…
What 😳?? समर नि किंचाळून विचारलं
हो.. पण प्लीज शांत रहा… ऐक..
विहान फार पूर्वीच घर सोडून गेला होता.. अचानक तो तुझ्यामुळे तो माझ्या संपर्कात आला.. आणि मग सुरु झाला एक वेगळाच गेम..
I know तुला हे ऐकून शॉक बसला असेल पण अजून एक सत्य आहें.. माझे बाबा तुझ्या वडिलांचे बिझनेस रायव्हल आहेत…
आणि जेव्हा आपल्या कुटुंबाला आपलं नातं कळेल.. तेव्हा ते कितपत आवडेल यात शंका आहें..
थांब… विहान बद्दल तुझ्या मनात विचार येत असतील तर घाई करू नकोस… तो लॉयल आहें तुमच्याप्रति… पण निशांतनि आम्हाला खूप मोठ्ठया loss मधे ढकललयं… आणि तोच रिकव्हर करायला मला इतके दिवस गप्प बसाव लागलं..
या सगळ्या गोष्टी इतक्या वेगाने घडल्या की तुला भेटूनही सांगता आल्या नाहीत.
I am sorry.. पण तुला फसवण हा माझा हेतू नाहीये.. आणि म्हणूनच दोन्ही डील मधे माझा फायदा होत असूनही मी तुझ्या कंपनीचे हित बघितलं..

एकाएकी सखीचा गळा दाटून आला.. समर नी तिला शांत व्हायला सांगितलं आणि हे ही आश्वासन दिलं की यापुढे तो तिच्यासोबत असेल..

आज किती दिवसांनी ती दोघं मोकळ्या मनानं गप्पा मारत होती..

****

निशांत सतत शनाया ला संपर्क करायचा प्रयत्न करत होता पण तिचा काहीच रिप्लाय आला नाही.. इतक्यात त्याची असिस्टंट त्याच्या पर्सनल अकाउंट ची फाईल घेऊन आली..4 क्रेडिट कार्ड्स ओव्हरलिमिट झाली होती,  शनाया च्या नावानी मोठी रक्कम ट्रान्सफर झाली होती.. आणि नवा दणका शर्मा नी दिला फोन करून…
मागे फिसकटलेल्या डील ची नुकसान भरपाई कम्पनी ने नोटीस पाठवून मागवली होती.
डोक्याला हात लावायची पाळी आली होती त्याच्या वर.. बंगलोर ला सखीला दुखावलं होतं त्यामुळे आता तिला ही भेटता येत नव्हतं.. आणि त्यात हे डील हातातून गेल्याच शल्य… शनाया ही डिच देऊन निघून गेलेली..
*******

समर नी सखीचा कॉल झाल्यावर विहान ला कॉल लावला त्याला ही तो त्यांच्या ग्रुप मधे असल्याबद्दल आश्वस्त केल… सगळं जुळून आलं असतानाच परत त्याला शनाया नी कॉल केला. पण यावेळी तिने घरी बोलावलं त्याला…

#काय होईल शनाया च्या घरी?
#निशांत काय प्लॅन करेल?

#क्रमशः
©मनस्वी

पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त ए इश्क…11- शेवटचा भाग

Image by efes from Pixabay

3 thoughts on “गुंतता हृदय हे…जब्त_ए_इश्क..10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!