श्रीरंग…. 3
आधीच्या भागाची लिंक- श्रीरंग.. 2
आम्ही घरी आलो..
नेहमीप्रमाणे आई बाबा सगळे बोलत होते, विचारत होते…
पण मला ना आख्ख जग जणु ‘पुष्पक ‘सारखं भासत होतं .
जेवायला बसले आवरूनं तर समोर तु दिसलास …
अय्या. .
काहीही व्हायला लागलंय ..
बाकी कुणाच्या नसलं तरी माझं हरवून जाणं आत्तू नी बरोबर ओळखलं…
माझी लिली आत्या… वय 65, दिसायला देखणी केतकी रंगाची, त्या सुब्बलक्ष्मी आहेत ना… अगदि तश्शी… नाकात चमकी पण .. पण अतोनात कष्ट अगदी लहानपणापासून अकाली म्हातारी झालेली आणि यजमान गेल्यावर मुलबाळ नसल्याने आमच्याकडेच येऊन राहिली होती …
.त्या कातिल नजरेनं मला रात्रभर छळलं… डोळे मिटले की तोच चेहरा… तें डोळे… अर्रे… काय ताप आहे… 🙄
मग अचानक आठवलं . आपल्याकडे नंबर आहे की 😜😜
मीच मेसेज केला…
Hii…
बराच वेळ गेला रिप्लाय नाही 🤨😐
मग ट्यूब पेटली .. आपण एकमेकांना नंबर नाही दिलाय … तो कसा ओळखेल?? 🙄
पुन्हा मेसेज केला… hii मी राधा… आज तुम्ही मला मदत केलीत त्या बद्दल thank u..
पुन्हा काही वेळ गेला . तरी रिप्लाय नाही…
मग मात्र मला जरा रागच आला…
काय हे वागणं?
निदान welcome ओके काहीतरी रिप्लाय दयावा..
रात्रीचे 11 वाजून गेले होते…
सगळीकडे सामसूम…
आणि त्या सोशल अँप वर.. माझं बोट नेमकं रेकॉर्डिंग वर आणि माझं स्वगत चालूच ..
“कित्ती छळावं माणसानं… आधीच हा डोळ्यासमोरून हलत नाहीये.. आणि आता मेसेज पाठवले तर रिप्लाय पण नाही…
अरे.. काय माणूस आहे हा… दुष्ट कुठला…”
आणि नकळत तो मेसेज पाठवला सुद्धा गेला…
मी हीं निजून गेले… त्याच्या स्वप्नात …
….
सकाळी उशीरा उठले ..
मग निवांत आवरलं… तेवढ्यात माझी घट्ट मैत्रिण निशा आली…
चल आवर .. जायचंय…
आँ… कुठे??
तिनं आजूबाजूला पाहिलं…
आणि माझ्या जवळ आली…
गधडे… काल जों घोळ घातला आहेस ना तोच निस्तरायचाय…
मी 🙄🙄…
मी कधी घातला घोळ…??? 🙄🙄
तरी पटकन आवरून आले आणि मग आम्ही बाहेर पडलो..
आता तरी बोल .. मी वैतागून विचारलं .
कालचा त्याच्यावरचा राग धुमसत होताच 😜
तिनं पुन्हा देवळापाशी आणलं …
आणि मला जरा आवाज चढवून विचारलं…
काल काय घडलं?
मी सगळं सांगितलं….
अगदी नंबर कसा घेतला तें पण 😜.
आणि रात्री मेसेज केला तें पण…
पुढे?. तिनं पुन्हा विचारलं
पुढे काही नाही 🙄…झोपले….
इतक्यात मागून आवाज आला…
सॉरी….
या दुष्ट माणसाकडून…
काल पावसात मी हीं नंतर बराच वेळ अडकलो…
घरी उशीरा आलो..
आणि फोन चार्जिंग ला लावून निजलो…
त्यामुळे रिप्लाय नाही केला …
आता राग गेला असेल तरच येतो समोर 😜…
मी शॉक….
ह्याला कसं कळलं?
आणि तो समोर आला …
माझंच रेकॉर्डिंग मला ऐकवलं….
अर्थात तो पर्यंत निशा तिथून लांब गेली होती
मग जवळ येतं म्हणाला…
पुन्हा एक बॉक्स ..
त्यात कालची जुनी तुटकी चप्पल दुरुस्त करून आणलेली…
मी हीं हसून thank u म्हणाले ..
तर गाडीवर बसत म्हणाला कसा…
ऐका ना 5 रुपये द्याना… 🤣🤣
त्या मोचीला द्यायचेत ….
ई… दुष्ट कुठला…
आणि त्यानं मुद्दाम गाणं पाठवलं मेसेज वर
पाच रुपैय्या… बारा आना ssssss
मारेगा भैय्या sssss ना ना ना ना sss…
आता तुम्हीच सांगा कसं रुसायचं या वेडू वर 🙄🙄😜😍
क्रमश:
©®मनस्वी
पुढील भागाची लिंक- श्रीरंग… 4
Image by Free-Photos from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Nice
Thank you😊
Pingback: श्रीरंग… 4 – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Thank you🌹