श्रीरंग..6

आधीच्या भागाची लिंक- श्रीरंग… 5

वाट पाहून मी कंटाळले.. आत्तू ला जाऊन तास उलटला होता..
मग पुन्हा एकदा हेडफोन घालून गाणी ऐकत बसले…
गाणं तरी काय लागावं 🙄..
बावरा मनं देखने चला एक सपना ..
आणि मेसेज आला…
आत्याबाईंना घराजवळ ड्रॉप करणार होतो.. पण ऐकत नव्हत्या..
So त्या निघाल्या आहेत चालत..

बरं… पण बोलणं काय झालं?? मी गॅस वर..
रिप्लाय?? हा का करेना…
काही नाही… भेटू.. त्याचा अति थंड रिप्लाय आला
अरे आता एवढं झाल्यावर मला आत्तू कशी सोडेल 🙄??
बघू .. अजूनही निवांतच… हा 🙄🙄
अस्सा रा ssss गं येतो ना या पुरुषांचा…
घडाघडा बोलतं नाहीत… घुमे कुठले 🙄🙄
ओके. नको सांगुस… मी नाही येणार भेटायला
चिडलेच मी… 😡😠
अगं खरंच विशेष काहीच बोलली नाही ती.. चिडू नको शोना… 😘
झालं… हे शोना म्हटलं की आम्ही पाघळायचं का 🙄 मी ठाम
खरंतर risky रिप्लाय 😜😜
हा चिडला… रुसला तर… असं हीं मनात येऊन गेलं..
पण जाऊदे .. आता अत्तुला विचारायचं…
आणि तेवढ्यात ती दिसली… आत जाऊन गार पाणी घेऊन आले..
ती बसली… पाणी घेतलं.. मग हातपाय धुवायला निघून गेली आत..
मी हीं कोकम सरबत घेऊन आले…  आत्तू…
काय झालं?..  काय म्हणाला तो?
तिने माझ्याकडे रोखून पाहिलं… तसं मी परत सावरून म्हणाले .. म्हणजे  तें? 😜🤭🤭🙄
कळतील’ रंग ‘ लवकरच… ह्या  श्री ‘रंगाचे ‘ .. तिच्या एकेका अक्षरावरचा जोर पाहून मला टेन्शन च येतं होतं…
मी फार विषय न वाढवता… मैत्रिणीकडे गेले… अशा वेळी सखींच बरी… 🙄🙄🤣

तर ती हीं भाव खाऊ… आज तुटक बोलत होती…  काय राग तर म्हणे गच्चीतली गम्मत मला का नाही सांगितली 🙄🙄🙄

घ्या कुणाचं काय तर कुणाचं काय 🙄🙄🙈
मग तिनेचं त्याला फोन लावला…  भेटायला बोलावलं… तो आला सुदधा…
आणि समोर येताच माझ्याजवळ येऊन म्हणाला…
जर घरचे विरोधात गेले तर पळून येशील ना..? 🤭🙄
मग मात्र माझं पित्त उसळलं… 🙄
काय हॊ… काय चालवलय तुम्ही?
बापरे… आत्ता पासून अहो जाहो?? 🤭🤭😜 तो थट्टा करत होता..
एक मिनिट..
ना तुम्ही मला प्रोपोज केलंय ना मी तुम्हाला हॊ म्हटलंय.. मग लग्न कुठून आलं…
माझा राग वेगळाच…🤭
ओह्ह अस्स होय… म्हणजे आधी राणी सरकारांना पटवायचयं…. बर्रर्रर्रर्र…
पण जाऊ दे…  सुस्कारा सोडत म्हणाला..
का? मी गोंधळून विचारलं…
नाही करत मी प्रोपोज…
का??
तसं हीं तू  नाही म्हणालीस तर… उगाच कशाला नकार घ्या… 🤭🤭 किती तो गंभीर आवं आणून बोलला.
आणि मी… पटकन बोलून गेले…
आणि मला हॊ म्हणायचं असेल तर .. 🤭🙈…आई गं.. नकळत काय बोलून गेले हे कळून जीभ चावली आणि हाताच्या ओंजळीत चेहराच लपवून घेतला…
मैत्रीण कमरेला चिमटा काढून निघून गेली हसत… 😜😜
आणि मी .. तशीच लाजेनं चूर होऊन उभी….
तो आता समोर आला…
धक धक वाढली…
त्यानं दोन्ही मनगटांना धरून हातं बाजूला केले…

डोळे मिटलेली मी…  श्वास जाणवण्या इतपत जवळ आलेला तो  .
आणि….
आणि…
पुन्हा एकदा कपाळावर kiss…  इश्श्य म्हणून लाजून पाठमोरी झाले..
मागून डाव्या खांद्यावर हनुवटी टेकत म्हणाला…
प्रोपोज करायचा प्लॅन आहे पण उत्तर हॊ असेल तरच..
काय??
हॊ  म्हणशील  ना??
पुन्हा मला मागे वळवत माझी हनुवटी त्याच्या बोटांनी तोलून धरत वर केली… मी त्याच्या डोळ्यात थेट पाहिलं…
आणि त्यानं बोटं बोटात गुंफून जवळ खेचलं….

अहो…   ऐकायला आतुर आहे…
लवकरच भेटूयात…
आणि आत्या काहीही बोलल्या नाहीत… जुजबी चौकशी केली घरच्यांची आणि निघून गेल्या… म्हणून काही बोललो नाही..
टेन्शन घेऊ नकोस… मी आहे ना….
आणि सारखी अशी लाजलीस तर प्रेम कधी करू 😜😜
त्यानं हात सोडवून घेतला… आणि निघाला…
आज मी त्याचा हात धरला… आणि तो मागे वळला..
खूप काही बोलायचं होतं…  पण बघत राहिले त्याला…
इतक्यात मैत्रीण परत आली…
मुद्दाम उंहू…  करून खोकली…  हम आपके तल्या माधुरी सारखी 🤭🤭
चला… आज साठी इतकं पुरे…..
जातानाही तो पाहत होता…  काळजी घे…  करु नकोस… बाय
म्हणत निघून गेला…

मी हीं घरी आले…..

आणि आल्या आल्या….  बाबा म्हणाले….
या… राजकुमारी…  आता यंदा कर्तव्य काढूयात का??
बापरे.. बाबांना कळलं??
आत्तू बोलली 🙄🙄
मी घाबरून तिच्याकडे पाहिलं….  ती रागावून माझ्याकडे पाहत म्हणाली….
करूयात बघायला सुरवात…. जमेल योग असेल तेव्हा…

🙄🤭🤭🤭 आता?????
काय चाललंय तिच्या डोक्यात???
नाही आवडला का तिला??
*क्रमश:*
*©®मनस्वी*

Image by Free-Photos from Pixabay 

4 thoughts on “श्रीरंग..6

  • March 27, 2021 at 9:09 am
    Permalink

    Mast.. vat bghtey pudhachya bhagachi

    Reply
    • March 31, 2021 at 4:05 am
      Permalink

      Thank u😊😊🍫

      Reply
    • April 5, 2021 at 1:17 am
      Permalink

      😍😍😍🌹🌹

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!