श्रीरंग… 8

आधीच्या भागाची लिंक- श्रीरंग… 7

त्याचा निरोप घेऊन मी निघाले खरी.. आई कडें जायला… पण मनात मात्र याचाच विचार चालू होता…
का कुणास ठाऊक.. सारखं वाटत होतं आजची वेळ टळावी.. आणि तो मुलगा भेटूच नये…
पण हाय रे कर्मा !!
आई मला दाते काकूंसोबत आमच्या घरापाशी भेटली आणि तो so called हिरो ही.. 🙄🙄
आता दिसायला lbw होता (लांबून बरा वाटला )
पण जवळ पोचले आणि हसूच आलं 🤭🤭🤭
अगंबाई हा तर तो देवळातला… ह्याचा मित्र.. 😜🤣🤣
सुटले… मनातल्या मनात मुरलीधराचे पाय च धरले…
त्यानी ही मला पाहिलं आणि जाताना गाडी मुद्दाम जवळून घेतली आणि म्हणाला..
तेवढं दादा ला सांगू नका… खेटरानी पूजा बांधेल माझी 🙄🙄🤭
येतो… वहिनी !!!
😜🤭🤣🤣…अहो…. काय झकाsssss स्स वाटलं म्हणून सांगू…
मला तर इश्श्य,, अगंबाई, सगळंच होत होतं…
आई माझ्यापाशी आली आणि म्हणाली… आवडला का मुलगा?
मी ही पटकन म्हणाले…. नाही… कसा आवडेल नवरा म्हणून..
का??
का नाही आवडला?
🙄🙄आता हिला काय सांगावं.. तेवढ्यात आत्तूचा फोन आला…
बाजारात लवकर या… ती विठ्ठल चौकातल्या सानें आज्जींच्या घरात होती… आणि त्यांनी आईला आणि मला तातडीनं बोलावून घेतलं…
आम्ही पत्ता टिपून घेतला.. रिक्षा पकडली आणि निघालो…
घर तसं लांब होतं…
पुन्हा फोन… साने आज्जींच्या नातवाला पाठवलं आहे तो जिथं वळायचं आहे त्या गल्लीच्या तोंडापाशी उभा आहे…
आता आम्ही तिथवर पोचलों आणि पाहिलं तर एका साध्या मोपेड वर एक पोरगेलासा वाट पाहत होता…
आम्ही त्यालाच विचारलं… साने ना?
तो ही हो म्हणाला आणि गेलो घरापाशी..
मोठ्ठा चौसोपी वाडा… आत जाताच डावीकडे छोटासा हौद
पाय धुतले आणि आत आलो…
मोठ्ठा शिसवी झोपाळा..
त्यावर साने आज्जी आणि आत्तू बसलेल्या…
साने काकू बाजूच्या बैठकीतून उठून पुढे आल्या..
या या म्हणत स्वागत केलं..
लगेचच कोकम सरबत कि चहा म्हणून विचारलं
आम्ही सरबत घेतलं…
काकू आणि आज्जी दोघी धप्प गोऱ्या.. चैत्र गौरीच्या मुखवट्या सारख्या सुंदर, नाजूक आणि चाफेकळी नाकाच्या… नाकात हिऱ्याची चमकी, आणि अंगावर मोजके पण सुबक दागिने…
तेवढ्यात मोठ्या गाडीचा आवाज आला..
घरातली बाकीची पुरुष मंडळी आत आली.. आम्ही बायका आतल्या खोलीत गेलो.. आणि त्या लोकांना चहा पाणी मी नेऊन दिलं… आपापसात काही गप्पा झाल्या… त्यांच्या आणि आई आत्तू च्या.. मला मागच्या विहिरीपाशी घेऊन गेल्या होत्या काकू..
आणि अचानक तिथे एक जण समोर आला…
त्यानी काकूंना वाकून नमस्कार केला नीं माझ्या कडें पाहूनत्यांच्या  काहीतरी कानात पुटपुटला…
माझं काळजात धस्स च झालं…
आता हाच कोण??  आणि मला कुठं पाहिलं बिहिल की काय??
आईला कळलं तर??
मला तर चक्कर चं आली टेन्शन नीं…
जाग आले तर त्यांच वाड्यातल्या एका आलिशान पलंगावर… बाजूला आई आत्तू काकू आज्जी सगळी मोठी माणसं आणि डॉक्टर सुद्धा…
डॉक्टर म्हणाले… ताण आलाय मनावर… सध्या आराम करू दे…
मी सावरून बसायचं म्हणून उठायला गेले आणि पुन्हा ग्लानीत गेले
आता बऱ्याच वेळाने शुद्ध आली तर काकू आणि आत्तू जवळ बसल्या होत्या..
त्यांनी मायेनं हात फिरवला डोक्यावरून.. आणि म्हणाल्या..
सगळं मनासारखं होईल… कसली काळजी करतियेस? 🙄🙄
कुणी काही बोललं का?
मी गप्पच… मग त्या बाहेर गेल्या…
खोलीच्या खिडकीतल्या पडद्यांना कुणी तरी बाहेरून हलवतंय असा भास झाला…
उठले आणि खिडकीपाशी गेले…
पण भासच असावा… कोण होतं तिथे?
काय होईल पुढे??
क्रमश :

पुढील भागाची लिंक- श्रीरंग … 9

Image by Free-Photos from Pixabay 

4 thoughts on “श्रीरंग… 8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!