श्रीरंग … 9
आधीच्या भागाची लिंक- श्रीरंग… 8
मी वळून येऊन बसले पलंगावर आणि पडद्याची हालचाल पुन्हा झाली…
तिथून एक मुलगी डोकावत होती.. मी तिला जवळ ये अशी खूण केली.. तशी ती पुढे आली… जेमतेम 7 वर्षांची असेल.. मग तिला नांव विचारलं… तर ती म्हणाली मीरा…
आणि तुझं? ओठांचा चंबू करून म्हणाली…
मी राधा… दोघी एकमेकींना न्याहाळत होतो…
थोडी भीड चेपली आणि ती पुढे आली… मग मला खेटून बसली.. मग शाळा, मैत्रिणी, खेळणी ह्यावर गप्पा इतक्या रंगल्या की बाईसाहेब आत्ता गट्टी बट्टी सखी झाल्या…
यात अर्धा एक तास गेला…
साने काकू तिला शोधत खोलीत आल्या… आणि बघतात तर काय हे पिल्लू माझ्या मांडीवर खांद्यावर मान ठेवून निवांत झोपलेलं अजी मी अंगाई गुणगुणत होते…
अगंबाई.. झोपली पण… sorry हं.. उगाच तुला त्रास..
नाही हो… त्रास काय… गोड़ आहे हे बाळ .
माझं त्या पिल्लू बरोबरच मेतकूट पाहून त्या सुखावल्या… स्वतःशीच काहीतरी बोलत निघून गेल्या…
मीरा ला बाजूला झोपवून मी अत्तु ला बघायला खोली बाहेर आले नीं समोर आत्तू आली…
काय मग? हे घर इतकं आवडलंय की आजचं अक्षता पाडून घ्यायच्या आहेत डोक्यावर?
तू ही अशी चकरा येऊन पड नीं तिकडे तुझा बाप तांडव करत असेल…
आता निघूया का??
🙄🙄काय तरी हे बोलणं? मी काय मुद्दाम पडले का चक्कर येऊन??
आत्तू स्पष्ट च सांगते मला तो आवडतो आणि म्हणालाय तो.. त्याच्या आई बाबांना पाठवेल मागणी घालायला…
वा गं वा …. आणि मी बरी हो म्हणेनं… ही व्हीलन झाली पुन्हा..
मग मी पळून जाईन… मी पण चिडले… आणि नंतर कळलं काय बचाबचा माती खाल्लीये ते… आणि हे कळून जीभ चावली .. एकीकडे सॉरी सॉरी म्हणत मी आत्तू च्या मागे आणि ती तरातरा पुढे….
चला…घरी… मग बोलते मी… ती चिडलीच होती…
🙄🙄मला तरी मेलं काय सुचलं?? हा बोलून जातो नीं मग डोक्यात फिरतात विचार भवरे… 😜😜
जाऊदे आज घरी राडा होणारं… करा मानसिक तयारी 🙄
आम्ही आज्जी आणि मोठी माणसं यांचा रीतसर निरोप घेतला आणि सानेंनी पोचवायला गाडी ड्राइव्हर दिला…
घरी आलो… तर बाबा काळजीत होते…
बाळा काय झालं? अशी कशी चक्कर येऊन पडलीस? जेवली नव्हतीस का सकाळपासून??
मला तर काहीच आठवत नव्हतं…
बाबा सॉरी… तुम्हाला त्रास झाला माझ्यामुळे ..
नाही गं… काळजी वाटली… बाबा माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले…
मग मी आणि आत्तू आवरून आलों.. आणि फोन वाजला ..
बाबा… आधी हॅलो म्हणल्यावर …
एक्दम किंचाळले .. काय?
अं हो हो .. नक्की भेटूया ..
हो हो.. का नाही…?
हो ना भाग्यच आहे आमचं..
आणि हसत हसत फोन ठेवला…
माझ्या कडें पाहत म्हणाले….
मागणी घातलीये तुला…
काय??.? 🙄🙄🙄🙄
कुणी?? का???
मी ठरवलं आहे… यंदाच कर्तव्य काढूयात आणि हेच स्थळ फायनल 😍
बाबा… ऐका ना… 🙄
मला बोलायचंय…
पण आई बाबा आणि आत्तू इतकी तार स्वरात बडबड करत होते की माझा आवाज विरूनच गेला…
मी घाईन त्याला मेसेज केला…
पण मेसेज पोचला नाही,
कॉल करून पाहिला फोन बंद…
अरे देवा !
आता काय करू.? कसा कॉन्टॅक्ट करू याला…
मग मैत्रिणीला कॉल केला… तिला सांगितलं… तिने ही खटपट केली… पण हा काही संपर्कात येईना…
कशीबशी जेवले आणि झोपायला गेले…
साधारण 12 नंतर त्याला मेसेज पोचला..
इकडे मी जागीच…
त्याचा रिप्लाय… काळजी करू नको उद्या बोलू .
मी पुन्हा गॅस वर .. 🙄🙄
आणि मग कधीतरी रात्री निजले..
सकाळी उशीरा जाग आली…
©®मनस्वी
Image by Free-Photos from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
👌👌👌
😍😍😍