श्रीरंग…11

जसं जसा घड्याळाचा काटा पुढे सरकू लागला तसं तशी टिक टिक माझ्याही डोक्यात वाजू लागली ..
आता काय…?
दुपारचे दोन वाजले .. आणि त्याचा मेसेज आला..
तो :काय ढमे? कशी आहेस 😜😜
मी :🙄🙄ढमे..तु मला अज्जीबात ढमे म्हणायचं नाहीयेस 😠😡
तो :बरं बाई…
मी :🤦‍♀️ई बाई काय 😳
तो: बरं ऐक…  आता आम्ही सगळे एकत्र जमतोय… आई बाबा माई..  wish me goodluck… सांगतोय त्यांना आज आपल्याबद्दल
मी :बापरे.. मला टेन्शन येतंय…  काय म्हणतील?
तो :बघूया… बरं तुझा एखादा फोटो पाठव… तसें मी काढलेत तुझ्या नकळत पण ते जरा…u know.. 😉
मी :😳 तु कधी काढलेस?  बरं पाठवते… साडी नेसलेलाच पाठवते 😉😉
तो :हो… त्यात तु खूपच गोड दिसतेस 😘
मी :हो का??
तो : येस्स्स्सस…  बायको… लव यू
मी : इश्श्य 🤭🤭 जा आता… नंतर कॉल कर मी इकडे गॅस वर आहे
तो : नको… गॅस फुटेल तु बॉम्ब आहेस 😜🤣🤣🤣
मी : चूप… 😠😠
तो :चिडलीस की अजून गोड दिसते… माझी ढमी.. 😜😜🤣🤣
मी :👊👊👊bye..
तो :..♥️😍😘😘😘bye..
कसं असतं ना… आपलं हे वेडू आपल्याला काहीही म्हणाला तरी गोडच वाटतं… आणि आज तर एक खिंड लढवून झाली होती आता गड सर केला की झालं..
पण या स्वप्नभोपळ्याला चिरायला आत्तू आली 🙄
ढमे… आज संध्याकाळी ही साडी नेस… ब्लाउज बघून ठेव…
अगं पण ही तुझी  आहे ना..?
हो..
हे मला पहायला आले होते… तेव्हा नेसले होते…
मग आज ही मी का  नेसू?
म्हणजे ते तुला ही पसंत करतील.. इति आत्तू
अगं पण… मला केलीये की पसंत.. आधीच.. श्रीरंग नी…
हो का… बरं मग त्याचं पूर्ण नांव सांग… पत्ता सांग..
🤭🙄 अय्यो… मला पूर्ण नांव माहित नाही… सांगितलं होत का त्यानी 🙄🙄…छे पण मी अशी काही धप्पकन प्रेमात पडले की नांव विचारलंच नाही…
पत्ता तरी कुठून सांगू??? 😳😳
हे सगळं मनातच बरं का..
अत्तु नावाचं काय एवढं…
आणि माझं नवं नांव पत्ता कळेलचं… त्याच्या घरचे येतील तेव्हा..
मी आपली लंगडी बाजू सावरायचा प्रयत्न केला…
पण मला धोबी पछाड दिलाच तिने…
हे बघ… आंतर जातीय, धर्मीय प्रांतीय.. चालणार नाही…
मेले… मला उगाचच मी बॉम्बे वाली मनीषा वाटून गेले आणि हा माझा अरविंद 😉…कसला चिकणा दिसलाय ना तो.. 😜🤭🤭
ढमे…
कुठे  गेलात??  या वातावरणात या… जरा स्वप्न ही झेपतील तेवढीच बघा… आत्तू नी reality चा चिमटा काढला..
बाबा आई काय विचार करतील पण??
खरंच याच नांव पत्ता काहीही विचारलं नाही… असे कसे प्रेमात पडलों 🙄🙄मी आता फुल्ल टेन्शन मधे…
तेवढ्यात बाबा आले…
ढमा बाई… कसला विचार करताय??
बाबा… माझं चुकल…सॉरी… मी सांगायला हवं होत…
पण हे सगळं इतकं पटकन घडलं… खरंच सॉरी…
बरं असू दे…. तुला काय काय माहिती आहे त्याच्याबद्दल?
अं….  काहीच नाही…
काय?? अगं म्हणजे तो कुठं राहतो ते तरी??
मी प्रत्यक्ष जाऊन बघतो…
बाबा…  आणि मला रडायलाच आलं…
नाही माहिती… मी गळा च काढला ..
बरं बरं शांत हो…
मी बघतो…. काय उद्योग करून ठेवशील देवच जाणे…बरं हा भेटला कुठे??
मुरलीधराच्या देवळात…
नशीब.. बरं त्याचा एखादा फोटो पाठव मला… मी चौकशी करतो…
पण बाळा असा पटकन विश्वास ठेवू नये….  हा वागायला बोलायला ठीक वाटला..
पण फसवणूक ही होऊ शकते… इतकं उतावळं होऊ नये…
हो बाबा… मी डोळे पुसतं पुसतं म्हणाले.  मी त्यांना फोटो पाठवला…
तेवढ्यात त्याचा मेसेज..
बोललो घरी…
मग??
सगळे फोटो बघून एकदम गप्प आहेत…आई बाबा माई कुणीच काही बोलत नाहीये.
ओह्ह… बरं असू दे…  जरा वेळ दे त्यांना…
बरं एक मला तुझं पूर्ण नांव पत्ता दे…
आणि पत्रिका ही पाठव…
ह्म्म्म…. पाठवतो….
मग त्यानं माहिती पाठवली…
श्रीरंग सुधाकर साने
स्वर्णीम पेढी
रत्नमाला बंगला विठ्ठल मंदिरा जवळ
बाजारपेठ रस्ता..
जन्म तारीख…  26ऑक्टोबर… मग पत्रिका आणि त्याचा ऑफिस पत्ता…

मी तारीख परत वाचली…  कायं??  आज 26 चं आहे… आणि  आपण bday विसरलो 🙄🙄
मी परत कॉल केला….यानी कट केला
मी लगेच.bday मेसेज टाकला…
पण हा ऑफलाईन गेला… 🙄
अरे देवा आता काय करू…
बरं मैत्रिणीला तरी कुठल्या तोंडानी हा पराक्रम सांगू…?

थोडा वेळ तसाच गेला….  बाबा ही बाहेर जाऊन आले…
मी अधीरपणे विचारलं…  काय मिळाली माहिती??
बोलूयात नंतर… आणि ते फ्रेश व्हायला निघून गेले…
मी पुन्हा विचारात पडले…  नांव तरी वाचून हायस वाटलं…

निदान तेवढ्यापुरत…  संध्याकाळ झाली आणि आई आत्तू आवरायला लागल्या…
आई तर सकाळपासून बोलतच नव्हती… 🙄🙄
आता ही आली..
दागिने साडी दिली आणि गेली तशीच…खूप वाईट वाटत होत…
मुरलीधराची सुंदर पंचधातू ची मूर्ती आहे माझ्याघरी… मी जाऊन हात जोडले..
बाबा रे…  तूच वाचव आता…
नमस्कार करून आवरून निघाली आमची वरात त्या मुलाला बघायला…
टिक टिक… धक धक सगळंच एक्दम डॉल्बी आवाजात वाजू लागलं…
आम्ही पुन्हा त्या कालच्या वाड्यात आलो…
दारातच ती सगळी मंडळी उभी …
नक्की नवरा मुलगा कोण हेच कळत नव्हतं… आम्ही बायका आत गेलो..
मीरा जवळ आली…  तिच्याशी गप्पा मारल्या पण टेन्शन वाढत होत…
आणि मला बाहेर बोलावलंय असा निरोप आला मी मान खाली घालून गेले…

मला त्याला बघायचंच नव्हतं…
मला त्याच्या समोर बसवलं…. काही जुजबी प्रश्न विचारले त्या बाकीच्या लोकांनी… मग सगळे उठून आतल्या खोलीत गेले त्या बाहेरच्या झोपाळ्यावर तो… आणि समोर मी…
किती ते अवघडलेपण… नको वाटत होता तो एकांत..
आणि तो समोर आला.. मी ही उठून उभी राहिले… आणि क्षणभर  वाटलं की माझा श्री आहे समोर…
मी घाबरले… बापरे मी इतकी प्रेमात पडलिये की त्याचाच भास व्हावा..
इतक्यात त्यानं माझा हात धरला… 🙄🙄
बापरे… मी दचकून त्याच्या कडें पाहिलं आणि हात झटकला..
आणि त्यानी पुन्हा मनगट धरलं…
मी त्याला पाहून शॉक मधे..
गरगरलं..
मेलं ह्यांच्या घरात काय चकरा येतात मला..
मला श्री चे भास होतायत असा जबरी फील आला आणि त्यानं त्याच्या मिठीत सावरलं…
इतक्यात माझ्या कानाशी आवाज आला…. बायको… अशी डायरेक्ट मिठीत 😜😜
बायको??? 🙄🙄🙄
आता आवाजाचे ही भास???
तरी मी स्वतः ला सावरत बाजूला झाले….
आणि पुन्हा धाडस करून पाहिलं… इतक्यात मागून सगळे हसत हसत बाहेर आले…
आणि आमच्या भोवती जमले…. त्यानं अगदी गुडघ्यावर बसून अंगठी पुढे करत मला मागणी घातली… आणि मी….
मी ही हो म्हणाले….
कशी नाही म्हणणार होते….?
हिऱ्याची लखलखती अंगठी….घेऊन तो राजकुमार समोर होता
काय रागावलात माझ्यावर… का अंगठीला भुलले असं वाटलं ना….

मुळीच नाही….
माझा श्रीरंग समोर होता…..  त्याच्या पुढे मला काहीच दिसत नव्हतं
कसं वाटलं सरप्राईज?? आत्तू पुढे आली… आणि म्हणाली….
म्हणजे तो मुलगा तूच होतास जों आम्ही बघायला आलो 🤭🤭
काय हा जुगाड 🙄🤭??
काय राधाबाई आवडला का मी पसंत केलेला मुलगा??
मी ही हसून तिच्या गळ्यात पडले आणि पुन्हा चोरून त्याला पाहू लागले..
अजून काय हवं होत??
आम्ही दोघे ही सातवे आसमान पर 😍😍😍😍

मग जेवणं झाली…केक कापला… आणि तो म्हणाला ..आता मी सोडायला जातो… म्हणजे गाडीने आई आत्तू बाबा गेले आणि मी हा आणि लैला 😍😍😜😜
तीचं जी बंद पडली म्हणून ही ♥️story घडली 😜😜

घराच्या अलीकडे एक आडोसा होता हा तिथेच थांबला…
मी त्याला bday wish केलं…. आणि तो म्हणाला…
मग माझं bday गिफ्ट कुठाय??
काय देऊ मी तुला??
त्यानं बायको…
म्हणत जवळ घेतलं आणि डोळे मिटून म्हणाला…. ह्म्म्म दे…
मी ही इश्श्य म्हणत लाजले..
दे ना… डोळे उघडत म्हणाला…
मी त्याच्या कपाळावर kis करायला टाचा उंच केल्या आणि त्यानं अजून मान उंच केलेली अचानक खाली केली आणि पुन्हा माझे अधर याच्या अधरांवर 🙈.
मग पुढचे मंतरलेले क्षण कसे गेले ते कळलेच नाही..
आम्ही एकमेकांच्या मिठीत…. श्वासांनी एकच लय पकडली, आणि पुन्हा एकदा त्याच्या भरदार छातीवर डोकं ठेवत मी लाजले…
मला गाभाऱ्यातला श्रीरंग प्रत्यक्ष आयुष्यात मिळाला….

मी त्याची अंनं तो माझा झाला😍😍♥️♥️

*©®मनस्वी*

*आवड्या का 🤭🤭😍😍😍 सौं राधा श्रीरंग साने ची गोष्ट.*
*नक्की सांगा…..

Image by Free-Photos from Pixabay 

12 thoughts on “श्रीरंग…11

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!