अन्नपूर्णा
” अरे व्वा आज दुसऱ्या खानावळीतुन आणले वाटते जेवण.मस्तच रे अगदी आईची आठवण आली बघं.गावाकडचे झणझणीत चवीष्ट आहे रे.कोणती आहे खाणावळ जवळच आहे का.म्हणजे मी पण तिथुनच डब्बा मागवेन.” असे सुनील ने महेशला म्हटले.
” अरे नाही रे.आत्या आहे इथेच रहाते तिने दिला आहे डब्बा”महेश म्हणाला.
” ओहो.तरीच रे घरच्या जेवणाची चव आली”
सुनील आणि महेश हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते.दोघेही नोकरी साठी शहरात जाऊन राहू लागले होते.
आता रोजच महेशचा डबा आवडीने सुनील खाऊ लागला.
त्यादिवशी आॅफिस सुटल्या नंतर हे दोघे कॉफी शॉप मध्ये गेले.आज जरा महेश सकाळपासून चुप चुपच होता.सुनीलला हे जाणवले होते.तरी त्याने विचारायचा प्रयत्न केला होता पण महेशने उत्तर द्यायचे टाळले होते.
” अरे आज तुझा मुड का असा आहे.काय झाले सांगशील.आॅफिसमध्ये सर्वांसमोर मी तुला फोर्स केला नाही.पण इथे कोणी नाही”
महेशने एक दिर्घ श्वास घेतला.कॉफीचा कप खाली टेबलावर ठेवला.आणि जरा स्वत:ला सावरले.आणि ” अरे यार सुनील…
माझी आत्या आहे ना.तिचीच काळजी रे.
तिला तिच्या लग्नाच्या चौथ्या वर्षीच वैधव्य आले रे.अगदी लक्ष्मी नारायण सारखा दिसणारा जोडा.आणि अचानक आलेल्या संकटात ती खचून गेली रे.”
” अरेरे फार वाईट झाले रे”
” हो रे आणि त्याहुनही वाईट म्हणजे तिच्या सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढले.तिच्या मुलाला पण काढून घेतले.कारण काय तर तिच्या मुळे तिचा नवरा वारला.आता ती कोठे जाणार म्हणून माझ्या जवळ आली रहायला.काल मी तिच्या मुलाला आणायला गेलो तर त्यांनी नकार दिला.आत्या नुसती रडत आहे रे”
” अरे काय मुर्ख लोक आहेत हे.असे कसे कोणाला करु शकतात.मुल हिचे आहे आणि कायद्याने हिलाच मिळणार.थांब तु माझ्या मित्राची बहीण वकील आहे.तिला फोन करून सविस्तर माहिती घेऊया.आणि तुझ्या आत्त्याला मुल मिळेल असे करु.
दोघांनी फोनवर वकील बरोबर बोलून सल्ला घेतला.आणि कायद्याने मुलाचा ताबा मिळवला.
मुल तर मिळाले पण त्या लोकांनी तिला आपल्या घरी घेतले नाही .
तिचा नवरा खाजगी कंपनीत नोकरीला असल्यामुळे काही पैशाची मदत किंवा नोकरी त्याच्याजागी लागावी असे झाले नाही.
आता या दोघां मायलेकांचा सगळा खर्च महेश करत होता.
” बाळा महेश मी गावी जाऊन रहावे म्हणते.आईजवळ.”
” अगं आत्त्या गावी जाऊन काय करणार तु.इथेच रहा.हवे तर आजीला इथेच बोलावून घेऊ आपण.आई बाबा राहू दे गावी”
” अरे तुझ्या एकट्यावर आमचा भार कशाला बाळा”
” ये आत्ते वेडी झाली कि.आत्त्या असलीस तरी तु एका मोठ्या बहिणीसारखे जपलेस मला.आठवते का बाबांच्या मारापासुन मला कसे वाचवायची.शाळेत काही खाऊ दिला तर दप्तरात ठेवून मला आणायची तु न खाता.मी शाळेच्या पिकनिकसाठी निघालो कि डबा माझा माझ्या आवडीच्या सांजेच्या पोळ्या करून भरून द्यायची.सगळे मित्र माझे डबा फस्त करायचे.त्यावेळी तु केले आता मी करणार.”
आता आजी पण आली.आजीपण कधी कधी काही तरी स्वैपाक करुन महेशला डबा करून द्यायची.
महेशने डबा उघडला कि जेवणाचा घमघमाट सुटायचा.
सगळेजण त्याच्या डब्यावर तुटून पडायचे.
संध्याकाळी घरी परतताना सुनील ने महेशला म्हटले ” ऐक महेश एक विचारू का”
” हो विचार न’
” हे बघ गैरसमज नको.आता तुझी आत्त्या रोज तुला स्वैपाक करुन डबा देते.आणि आम्ही सगळे जण अगदी आवडीने खातो.आता बघ आपल्या बरोबर कितीतरी लोक बॅचलर आहेत आणि ते हाॅटेलात जेवतात.पण तिथे असे घरगुती जेवण मिळत नाही.
मग मला काय वाटते कि जर आत्त्याने जेवणाचा व्यवसाय सुरू केला तर.
अरे आपल्या आॅफिस मध्ये कित्येक जण आहेत.आणि त्यांच्या ओळखीने आणखीन खुप जण घेतील.बघ विचार करून सांग मला”
महेशने घरी येऊन आत्त्याला सगळे सांगितले.आणि आत्त्यापण लगेच तयार झाली.” अरे खरंच खुप छान कल्पना आहे.अरे दिवस भर मी मोकळीच असते.आणि आईपण आहे मदतीला.”
आता महेशच्या आॅफिस मध्ये दहा जणांचें जेवण मागिवले जायचे.जो तो जेवणाची स्तुती करत होता.
आता या दहा जणांनीं आणखीन आपल्या ओळखीच्या लोकांना माहिती दिली.बघता बघता पन्नास लोकांनी जेवणाची आॅडर दिली.
आता या माय लेकींना दोघींना इतके काम जरा जास्तच झाले.मग त्यांनी दोन महीला कामाला ठेवल्या.
ज्या वकीलाने यांना मदत केली होती त्यांनींही खूप कौतुक केले.त्यांनीही एक सुचवले कि आता तुम्ही जरा जास्तच लोकांना जेवण बनवित जा.मी तुम्हाला कामाला ज्या गरजू महीला आहेत त्यांना तुम्हाला मदतीला पाठवतो.म्हणजे त्यांना रोजगार मिळेल आणि तुम्हाला मदत.
बघता बघता या महीलांनी खुप मोठा जम बसवला.आता तर त्या जेवणा बरोबर लोणचे,पापड यांचा देखील लघु उद्योग सुरू केला.
आता या महीलांनीं आपला ड्रेसकोड ठरवला …. गुलाबी..
गुलाबी साडी..
सगळ्या महीला कोणी विधवा होती तर कोणी गरजू तर कोणी स्वावलंबी होण्यासाठी.कोणी वयस्कर तर कोणी तरुण तर कोणी मध्यम वयी.न जातीचे बंधन न रंग रुपाची ओळख.
होती तर फक्त एकच ओळख ती म्हणजे स्त्री…
आई, बहीण, मुलगी ….
….जी आपल्या ध्येयपूर्तीसाठी काहीही करु शकते अशी …
खऱ्याअर्थाने गुलाबी रंगाचा मान राखला गेला.
खऱ्याअर्थाने अन्नपूर्णा देवीची मूर्ती जणू.
©® परवीन कौसर…
Image by Sabine van Erp from Pixabay
Latest posts by Parveen Kauser (see all)
- घटस्थापना.. - July 29, 2021
- सुहासिनी - June 15, 2021
- कन्या दान - May 8, 2021