मन तळ्यात मळ्यात…. 3
आधीच्या भागाची लिंक- मन तळ्यात मळ्यात…. 2
सरोजला असं लाजताना पाहून उगीचच असीम ला त्याच्या ही भावना चाळवल्यासारखं वाटलं पण मग हे प्रकरण आजोबांचं आहे हे आठवून तो मनातल्या मनात वरमला..
सरोज पुढे सांगू लागली…
खरंतर मला विश्वनाथांना एक महत्वाची गोष्ट सांगायची होती… पण अचानक मला काळानं नेलं अन त्याला नं भेटल्याचा सल इतका खोल रुजला की मला ही मुक्ती मिळाली नाही.. असं सांगत असताना तिनं किलकिल्या दाराबाहेर हात काढून तिची दिवाण खोलीतली फ्रेम त्याच्या समोर आणून ठेवली…
असीम किती ही धाडसी असला तरी प्रत्यक्षात हे असं अतार्किक बघणं किती जीवघेणं असेल… एक नखशिखांत सुन्दर स्त्री पहिल्या मजल्यावरच्या खोलीतून हात लांssssssब करून खालच्या दिवाणखान्यातली पेंटिंग फ्रेम जी उचलायला 2 माणसं लागतील ती समोर आणून देते… पुन्हा एकदा घडला प्रसंग मनात घोळवून असीम सावरून बसला…
त्या फ्रेम च्या मागे ती अडकवायला 2 कड्या दिसत होत्या… पितळी कडी… त्याच्या मध्य भागी एक भोक होतं तिनं त्यात हात घालून काही भूर्जपत्र गुंडाळ्या बाहेर काढल्या… आणि त्या असीम समोर ठेवल्या…
मुळातच अशा गूढ अनाकलनीय वातावरणातही ती पत्र पाहून त्याचे डोळे चमकले…
तिनं झटकन त्याचा हात धरत थांबवलं त्याच्या जवळ बसत म्हणाली… तू माझ्यासाठी विश्वनाथच आहेस… हे सगळं तुझं… पण एक अट आहे…
कुठली अट? असीम नी अधीरतेने विचारलं..
सांगते पण आज तू वाडा सोडायचा नाहीस… काहीही कारण काढ पण थांब… अजून बरंच दडलंय ह्या वाड्याच्या पोटात… पण आता मला जावं लागेल… माझं लक्ष आहे तुझ्यावर… हे म्हणताना मात्र तिचे डोळे एका विलक्षण रंगानं भरले… आणि ती दाहकता नं सहन होऊन त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली… त्यानं डोळे झाकून घेताच… ती गायब झाली… आणि काही क्षणात जणु काही घडलंच नाही असा माहोल तयार झाला… त्याचं चुरगळलेलं अंथरूण पांघरूण सरळ झालं… मगाशी बाजूला पडलेला t shirt पुन्हा त्याच्या अंगावर स्थिरावला ते पेंटिंग त्याच्या जागी स्थिरावलं आणि ती भूर्जपत्र??
ती मात्र त्याच्या हातातच होती..
खरंतर असीमला निघून जावं असं हजारदा मनात आलं पण मग तिची धमकी वजा सूचना आठवून तो इथं राहायचा बहाणा शोधू लागला… आणि पुन्हा आडवा झाला.. काही क्षणातच गाढ झोपला
बाहेर आता उजाडायला लागलं होतं… वाडा मात्र गडद सावल्यांमध्ये अजूनही पेंगुळला होता…
खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यानी ती भूर्जपत्र उलगडली..
” कृष्णमुखी न मार्जारी
व्दिजिव्हा न च सर्पिणी
पंचभत्री न पांचाली
यो जानती स पंडित:||
*******
विराज… कालपासून वाईच्या फार्म हाऊस मधे अडकला होता… पाणी शिरलं होतं सगळीकडे आणि तेच काढत घर साफ करण्यात रात्र सरली होती. त्यानं बाकीच्या नोकरांना सूचना दिल्या आणि ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. गाडीत बसताच थकव्यानं तो ही निजला….
………….
##विश्वनाथ राजवाडे… नेमकं काय तपासायला आले होते?
##असीमला त्या भूर्जपत्राचा अर्थ लावता येईल?
##काय दडलंय वाड्याच्या पोटात? खजिना की एखादं काळं सत्य??
##सरोज काय सांगणार आज?
##विराज परत आला तर असीम काय कारण सांगेल?
गुगळे आज्जीला नं विचारता उत्तर शोधा… 😉😉##
क्रमश :
©मानसी
पुढील भागाची लिंक- मन तळ्यात मळ्यात…. 4
Image by Enrique Meseguer from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Intresting