40th BDAY..1
अगं आवर की... अशी काय बसून राहिलीयेस.. मिता नि राही ला विचारलं.. राही मात्र... अजूनही तिच्याच विचारांच्या कोषात होती... राही... a bday girl.. हॊ आज रात्री बारापासून तिचा 40वा वाढदिवस सूरु होणारं होता... ए एकतियेस ना.... उठ.. जायचंय आपल्याला शॉपिंगला... आत्ता?? राहीनं दचकून विचारलं... हॊ हॊ आत्ता.. उठा... मिता आजूबाजूचे अल्बम उचलत म्हणाली... सगळा पसारा आवरून झाला आणि तयार होऊन राही आणि मिता बाहेर पडल्या... राही... खांद्यावर रुळणारे केस, पण फारशी निगा नं राखल्याने रुक्ष झालेले... चेहरा कोमेजलेला, डोळ्याखाली काळी वर्तुळं, जाडसर भुवया, आणि पडेल खांद्याची... आत्मविश्वास गमावलेली एक एक्स गृहिणी... एक्स यासाठी की नुकताच तिचा नवरा तिच्यापासून विलग राहू लागला होता... आणि तमाम बायकांना जों अहं असतो की माझ्या नवऱ्याचं माझ्याशिवाय अडतं आणि तें जेव्हा फोल ठरलेलं कळतं तेव्हा त्या या अशा झोन मधे जातात.. मिता... मात्र वयापेक्षा अधिक तरुण दिसणारी, स्टेप आणि कलर केलेल्या केसांची, राखाडी पिंगट डोळ्यांची, तजेलदार त्वचेची आणि मधाळ रंगाची.. दोघी बाहेर पडल्या... गाडी मात्र राही चालवत होती .. अर्थात दबकत... आणि त्या एका मोठ्या मॉल च्या आवारात शिरल्या... राही साठी एक युनिक सरप्राइज होतं... त्या दोघी मॉल च्या लिफ्ट मधे शिरल्या आणि शेजारी उभ्या असलेल्या एका पुरुषाला तिच्या हॅन्डबॅग चा धक्का लागला .. तिने sorry म्हणायला मान वर केली आणि ती त्या नजरेत हरवली... हा... चेहरा.ओळखीचा वाटतोय... कोण आहे हा? ती sorry म्हणाली आणि त्यानं मोबाइल मधून लक्ष हटवत माने नेच its ok..अशी खूण केली.. तिने मिता कडे पाहिलं तर ती हीं मोबाईल मधे तोंड खुपसून उभी होती... एक क्षण तिला वाटून गेलं.. पुर्वीसारख आता कुठलंच नातं आपल्यासाठी नॉर्मल राहिलं नाहीये का? ती तिच्याच विचारात असताना... त्यांचा उतरायचा मजला आला आणि त्या दोघी बाहेर पडल्या... कपड्यांच्या दालनात शिरताच मिता म्हणाली... वेस्टर्न बघूया... ह्म्म्म म्हणत ती हीं गेली मागोमाग.. मिता नि काळ्या रंगाचा, बॅक ओपन वनपीस निवडला... आणि तिला कुठला रंग हवाय विचारलं... पण ती मूड मधेच नव्हती.. आता मात्र मिता नि बाकीची खरेदी उरकली आणि त्या पुन्हा घराकडे यायला निघाल्या... वाटेत मिता ला एक फोन आला... आणि तिने गाडी वळवली... आता गाडी एका युनिसेक्स सलोन पाशी थांबली... सगळ्या खरेदीच्या पिशवीतून नेमकी एक पिशवी उचलली आणि गाडी लॉक करून त्या आत आल्या... लगेचच मिता नि राही ला त्या मुलींच्या ताब्यात दिलं आणि म्हणाली.. COMPLETE MAKEOVER... अगं नको...म्हणे पर्यंत शॉर्ट गाऊन समोर आला.. आणि तिला चेंज करायला लावलं... ती आरशासमोर. आणि बाजूला 4 जणी.. कुणी मॅनि पॅडी करतंय तर कुठे वॅक्स... मग फेशिअल झालं... हेअर झालं आणि एक वेगळीच राही दिसू लागली.. मग जुना ड्रेस घालायला गेली तर त्या जागी एक बॉटल ग्रीन रंगाचा वनपीस वाट बघत होता... एक चिट्ठी... राही... MY SWEETHEART.. आज तुझ्यासाठी एक LIFE CHANGING SURPRISE आहे... लवकर तयार हॊ... मिता ♥️ तिला बरं वाटलं... कुणीतरी प्रेम करतंय... एकटे नाही आहोत आपण... ती तयार झाली... आता आरशात पाहताना ती इतकी सुंदर भासली की ती तिच्याच प्रेमात पडली 😍.. बाहेर आली.. मिता नि दारं उघडलं गाडीचं... आणि आत बसताना तिचा long gaun अलगद उचलून आत दिला... (😘किती छोटी गोष्ट असते ना... की कुणी तरी अशी काळजी घेतंय ) राही सुखावली... त्या निघाल्या... मग मादाम CLUB ROOFTOP ला जाऊयात. आपला जुना अड्डा... आठवतोय?? हॊ गं.. किती वर्ष झाली. .hangout नाही केलं... तें हीं तुझ्या बरोबर... मागे एकदा... मी आणि.... राही चा आवाज भरून आला... थांब... पुढचं नको.. तिचं वाक्य तोडत मिता म्हणाली... आणि त्या club ला पोचल्या... Valet parking साठी चावी देऊन स्टॅम्प मारून आत आल्या... रेट्रो थिम नि सजवला होता club.... आत आल्यावर मास्क आला... राही... नि मिता बार काउंटर ला आल्या... माझी ऑर्डर तूच दे... मिता मुद्दाम म्हणाली.. आणि त्या revolving बार चेअर वर बसत राही बार अटेन्डन्ट फ्री व्हायची वाट बघू लागली... त्याच्या सफाईदार कसबी हाताचं कौतुक वाटलं... तिने टकिला शॉट्स सांगितले. 2 राऊंड झाल्यावर ती तिथल्या बार अटेन्डन्ट ला म्हणाली.. Hey... मी सांगते तें बनवशील?? Yes by all means... काबो.. crushed ice.. ब्लु कुरासोव आणि सोडा.. आणि हिला sex on the beach.... आणि त्या दोघींचे drink तयार होतं असतानाच राही चं आवडतं गाणं लागलं... मखणा.. में छोड आई घरबार... ओ मखणा रे मखणा आणि त्या संगीत आणि दारूनी एक वेगळाच कैफ चढला... ती बेधुंद नाचू लागली... एकीकडे ती जुन्या आठवणी अश्रूतून दूर सारत होती .. आणि दुसरीकडे जसजसे घड्याळाचे काटे सरकत होते तसतसं तिचं नवं आयुष्य जवळ येतं होतं मिता तिला पाहत होती... आणि एका क्षणी तें गाणं संपलं आणि शांतता पसरली... राही जोरात ओरडली.... Hey DJ.... BABY को बेस पसंद हैं... COME ON.. प्ले it.... आणि पुन्हा ती थिरकू लागली.... आणि अचानक एक जण समोर आला आणि ती स्तब्ध झाली... असं नेमकं काय झालं पुढे?? क्रमश : ©®मनस्वी पुढील भागाची लिंक- 40TH BDAY…2 Image by 3D Animation Production Company from Pixabay
Latest posts by gangal_manasi (see all)
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Interesting
Thank you🥰
Perfect thambvaliye katha..
Pingback: 40TH BDAY…2 – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: 40TH BDAY…2 – LekhakOnline – Excellent Marathi Articles