40thbday… 5
विहान काही कामानिमित्त बाहेर गेला आणि मिता आणि राही निवांत पाय पसरून हॉल मधे बसल्या… इतक्यात दारं वाजलं..
एक मुलगा हातात पानाच्या पुडी होती… मिता नी ती पुडी घेतली आणि ती राही जवळ येऊन बसली… ह्म्म्म घ्या मॅडम..
असं म्हणत ती पुडी तिच्या हातात दिली…
हे काय आता??
बघ…
अय्या… मगई पान… आणि ही कुणाची आयडिया?? राही खुष होती..
विहान अजून कोण??
वॉव… कित्ती वर्ष झाली गं… असं दुपारच्या जेवणानंतर मगई खायला मिळणं म्हणजे अलभ्य लाभ… !!!
खरंय… so थँक्स to विहान..मिता तिच्या कडें पाहत म्हणाली..
राही ते पान खाऊन हरवून गेली होती…
काही वेळ तसाच गेला आणि ती. मितूच्या मांडीवर डोकं ठेवून निवांत निजली…
मितु ही त्या समाधानी चेहऱ्याला पाहून सुखावली..
मग तिला हलकीशी जाग आली आणि ती उठून मितु साठी कॉफ़ी करायला गेली…
इतक्यात तिची नजर त्या सकाळच्या गिफ्ट कडे गेली..
अरे… झाली की संध्याकाळ.. आता उघडूयात म्हणत तिने तो बॉक्स समोर टीपॉय वर आणून ठेवला…
कॉफी करून मिताला हाक मारली… दोघी ही उत्सुकतेने पाहू लागल्या…
त्यात एक सुंदर लेमन येल्लो रंगाचा परी सारखा फ्रॉक होता…
आणि त्यावर शोभून दिसेल असा पाचूचा नेकलेस…
ती बघतचं राहिली…
तिने स्वतःला एक चिमटा काढला आणि मग आनंदानं उडी चं मारली…
कित्ती लहानपणापासून तिला एक मोठ्ठया घेराचा सिंड्रेला फ्रॉक घालायचा होता… तो finally आज मिळाला ..
ती कॉफी सम्पवूनं आवरायला गेली . आणि त्या फ्रॉक मधली ती एक सुंदर बार्बी बनून समोर आली…
मितुनी तिचे केस रोल करून दिले.. मेकअप केला…
लॅच उघडल्याचा आवाज आणि एक चार जणांचा ग्रुप आत आला…
त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि मिता नी त्यांना टेरेस दाखवलं..
मग मितु ही तयार झाली.. त्या दोघी बाहेर पडल्या..
विहान खास तिला pickup करायला त्याच्या मॉडिफाइड कार मधून आला होता..
सगळे एका पूल साईट रूफ टॉप हॉटेल ला पोचले..
हॉटेल स्वरोस्की…
ताऱ्यांनी चमचमणार आकाश आणि त्याचं सुंदर प्रतिबिंब त्या स्विमिंग पूलच्या पाण्यात पडलेलं…
आजूबाजूला आकर्षक रंगाची बैठक व्यवस्था… सगळी जमीन ही एक aquarium concept मधे बनवलेली… त्या प्रत्येक खुर्चीपर्यंत जाणारा रस्ता वूडन आणि काचेचा… त्यात जिवंत मासे कासवं… आणि टेबलावर सिल्की कॉफ़ी ब्राऊन टेबल क्लॉथ… त्यावर सुरेख लॅम्पशेड्स…. पण त्या ही कंदील आकाराच्या…
आणि बाजूला सुरेख live संगीत….
ते पोचले आणि reserved टेबल पाशी त्यांना नेऊन बसवलं… आजूबाजूच्या प्रत्येक टेबलावर 2 व्यक्ती होत्या पण वेगवेगळे मास्क घातलेल्या…
राही नं विचारलं सुद्धा… ही काय मास्क थिम आहे का?
पण त्या दोघांनी ही खांदे उडवत माहित नाही म्हणून विषय टाळला.. तिचे आवडते ड्रिंक.. पिनाकोलाडा… आणि स्टार्टर्स सांगून ते गप्पांमध्ये गुंतले.. काही वेळानी मितु फोन आला म्हणून उठून गेली… आता उरले हेच दोघे….
काही वेळा संवादाशिवाय ही खूप सारा संवाद घडत असतो…
नजरेतून…..
तसंच काहीसं ह्यांचं झालं.
आणि अचानक संगीत बदललं…
त्यानं तिला डान्स साठी विचारलं…
ती ही डान्स फ्लोअर वर आली…
आता आजूबाजूला ही कपल्स नाचू लागली आणि एका क्षणी ते संगीत थांबलं….
आणि bday song वाजलं …
क्षणात तिच्यावर चहुबाजूनी गुलाबपाकळ्या उधळल्या…
आणि मितु केक घेऊन समोर आली …
त्या सिन्ड्रेला ला हे सगळ स्वप्नच वाटत होत..
केक कापताना एकेक जण पुढे येऊन wish करू लागला आणि तिला सुखद धक्के मिळू लागले…
तिचे सगळे close फ्रेंड्स ज्यांच्याशी तिचा गेल्या काही वर्षात संपर्क तुटला होता… ते झाडून सगळे उपस्थित होते..
तिला आश्यर्य आणि सुखाश्रु अनावर झाले….
प्रत्येकाशी बोलून भेटून ती जाम सुखावली….
आणि मग एकच राजेशाही मोठ्ठ टेबल लावलं…त्यावर फूड ट्रेन दिमाखात धावत होती..
आजुबाजुला सगळे आप्त आणि शेजारी 2 जीवश्च…
सहज मनात आलं काहीतरी आणि ती हातातला ग्लास घेऊन उठून समोरच्या डेक पाशी गेली… मागोमाग विहान ही गेला …
खाली चमकत असणारे दिवे आणि आकाशातले चांदणे हे जणु एकमेकांशी स्पर्धा करत होते …
तिने त्याच्या खांद्यावर मान टेकली आणि म्हणाली…
विहान… आजवर खूप वेळा वाटलं रे … असा ग्रँड bday असावा..
पण पैसा असूनही इच्छा नव्हती त्याची …कधी लक्षात ही राहायचा नाही… हा दिवस… मग सेलेब्रेशन दूर च…
THANK YOU DEAR…
आज तुझ्यामुळे हे सगळ स्वप्न जगले ..
विहान नी तिच्या कपाळावर ओठ टेकले.
आणि म्हणाला..
.आता एक शेवटचं सरप्राईज राहिलंय… पण त्या कऱता घरी जावं लागेल…
ओक्के 😍 चल..
मग जेवण करून ती दोघे घरी आली…. मितु मात्र आज मैत्रिणीकडे राहायला गेली….
😜
घरी येताच त्यानं दारं उघडलं नी तिच्यासाठी पाकळ्यांचा रस्ता केला होता… दोन्ही बाजूला छोटे दिवे…
मग थेट टेरेस वर नेलं नी त्या टेरेस ला सगळीकडून कव्हर केलं ….
आणि तिचे डोळे मिटायला सांगितले..
हं आता उघड… असं म्हणताच राही आनंदानं चित्कारली.
वॉव… हे कसं सुचलं??
काय असेल सरप्राइज???
अहो…. काजवे होते टेरेसभर…
आणि गुडघ्यावर बसून तिला लग्नाची मागणी घालणारा विहान 😍..
तिने लाजत ते प्रोपोजल स्वीकारलं आणि घड्याळात बाराचे टोले पडले….
खऱ्या अर्थी तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली ….
आणि 40thbday memorable झाला….😍😍😘
##कशी वाटली ही कथा??
##आवड्या ना?
©®मनस्वी
Image by 3D Animation Production Company from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Chhan goshta
खुपचं आवड्या 😂