सुहासिनी
” अरे बापरे आज खुप उशीर झाला.कितीही लवकर उठून आवरले तरी वेळ व्हायचा तो झालाच.आता बाहेर ट्रफिक नसली तर नशीब रे देवा” असे पुटपुटत सुहासिनीने आपल्या फ्लॅटला कुलुप लावले आणि लिफ्ट जवळ पळतच जाऊन लिफ्ट मध्ये प्रवेश केला.
लिफ्ट पार्किंग मध्ये जाऊन थांबली.तशी गडबडीने सुहासिनी धावतच आपल्या कारजवळ गेली.कार सुरू करून ती अगदी स्पीडने निघाली.कारणही तसेच होते तिची आज महत्वाची मिटींग होती.
सुहासिनी..
बॅकेमध्ये नोकरी करत होती.नुकतीच तिची बदली प्रमोशन झाल्यामुळे दुसऱ्या शहरात झाली होती.आणि तिला एकटीलाच यावे लागले होते.तिचे आई वडील आणि धाकटी बहीण वडीलांची नोकरी आणि बहीणीचे शिक्षण यासाठी तिच्या बरोबर येऊ शकत नव्हते.
जवळ जवळ अर्धा रस्ता आली असेल तोच एकदम तिच्या समोर एक वृद्धा रस्ता ओलाडाण्याचा प्रयत्न करत असताना भोवळ येऊन पडली.
” अरे देवा ……काय हे…कोण आहे ही बिचारी कशी पडली.” म्हणतं सुहासिनीने कार थांबवली आणि बाहेर आली.तोच रस्त्यावर ही गर्दी जमा झाली.सगळ्यांना वाटले हिच्या कारमुळेच ती वृद्धा पडली.पण जेव्हा तिच्या आणि कारमधील अंतर पाहीले तेंव्हा त्यांना सत्य कळले.
” प्लिज कोणी तरी मदत करता का यांना उचलून हळू गाडीमध्ये बसवण्यास”
कसे बसे त्या वृद्धाला कारमध्ये मागील सीटवर झोपवले.
” धन्यवाद.बरं इथे जवळपास दवाखाना आहे का”
सुहासिनीने लगेच दवाखान्यात जाऊन त्या वृद्ध महीलेला अॅडमीट केले.
तिथे नर्सने फॉर्म भरून घेतले.ती महीला अजून शुद्धीवर आली नव्हती डॉ.नी तिला सलाईन लावून इंजेक्शन दिले.
काही वेळात ती शुध्दीवर आली.हे पाहून सुहासिनीला जरा हायसे वाटले.ती नर्सला आपला फोन नंबर देऊन मला एक अर्जंट मिटींग आहे.मी येते तासाभरात.जर तोपर्यंत काही गरज भासली तर मला फोन करा मी येतेच म्हणून ती आपल्या कामाला गेली.
लवकरच मिटींग संपवून सुहासिनी दवाखान्यात आली.तिने त्या महिलेबद्दल चौकशी केली.
” हो आहेत त्या बऱ्या पण त्यांना जरा कमी दिसत आहे.डोळ्यांचीं तपासणी करायची आहे.”
” बरं”
तशीच सुहासिनी त्या महिलेच्या रुममध्ये गेली.तिला झोप लागली होती.सुहासीनीच्या पायाच्या आवाजाने ती एकदम जागी झाली.
” कोण… डॉ.का? मला का वाचवले.मेले असते तर बरे झाले असते.का आणि कोणासाठी जगायचं मी.कोण नाही माझे.आणि काही नाही माझ्या जवळ .होते नव्हते ते मुलगा आणि सुनेने काढून घेतले.आणि मला अशी घराबाहेर काढले.” म्हणून ती रडू लागली.
सुहासिनीला ऐकून खुप वाईट वाटले.तशीच ती बाहेर आली. डॉ.ना भेटून जितके लवकर होईल तितक्या लवकर डोळ्यांची तपासणी करा आणि आॅपरेशन करावे लागेल तर करा म्हणून ती आपल्या घरी गेली.
अगदी आठवड्यात तिचे आॅपरेशन झाले.आणि आज तिला डिस्चार्ज मिळणार होता.
” आजी आज तुम्हाला सुट्टी मिळणार.आता काही दिवस काळा चष्मा वापरायचा मग काही गरज नाही.आता तुम्हाला काही त्रास होणार नाही.अगदी छान दिसणार तुम्हाला”
हे ऐकून ती रडू लागली” आता इतकं वाईट पाहिले आहे कि काही पाहण्याची इच्छा नाही.आणि मी जाणार तरी कोठे.मुलाने बाहेर अंगावरील कापडावर बाहेर काढले.लवकर डोळे मिटले असते तर बरे झाले असते”
तोच समोरुन केशरी रंगाची साडी नेसून एक सुंदर तरुणी येत असलेली दिसली.तिच्या एका हातामध्ये फुलांचा गुच्छ आणि दुसऱ्या हातामध्ये छोटीशी बॅग होती.
” नमस्ते आजी.तिने वाकून अदबीने नमस्कार केला.
” आजपासून रडायचे नाही.रडून डोळे खराब होतात.मी तुमची नातं सुहासिनी.आजपासुन तुम्ही माझ्या घरी येऊन राहायचे.ही घ्या तुमच्या साठी साडी आणली आहे.केशरी रंगाची.
नवरात्र सुरू आहेत.आणि आज खऱ्या अर्थाने देवी माझ्या घरी येत आहे”
सुहासिनी इतके बोलली तोच ती महिला म्हणाली ” नाही बाळा मी कसली देवी तुच आहेस आई तुळजा,तुच माझी आई अंबाबाई तुच दुर्गा तुच माझी आई ”
दवाखान्यात सगळेजण या वेगळ्या नात्यात गुंफलेल्या दोन्ही देवीना पाहून नतमस्तक होऊन गेले.
या दोघीं केशरी रंगात आणखीन खुलुन दिसत होत्या.दोघींच्यां चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता…
©® परवीन कौसर….
Latest posts by Parveen Kauser (see all)
- घटस्थापना.. - July 29, 2021
- सुहासिनी - June 15, 2021
- कन्या दान - May 8, 2021
खूप छान