सूर 

घाई झालेली तरी धावतपळत जाताना तन्वी बुचाच्या झाडाखाली रेन्गाळलीच.  चारदोन फुलं उचलूनच तिने लिफ्ट गाठली.  डिपार्टमेंट तिसऱ्या मजल्यावर.  आणि HOD च्या केबिन समोरच third year चा वर्ग.  सरदेसाई मॅडम ची करडी नजर असे सगळ्यांवर.  Classes बंक केलेले चालत नसत.  तसंही बंक करून टाईमपास करणाऱ्यातली तन्वी नव्हतीच.  कॉलेज,  अभ्यास,  प्रॅक्टिकल्स, शिकवणारे सर मॅडम  आणि वर्गातील मैत्रिणी हेच तिचे विश्व होते.  त्यातच तिचे मन रमत असे.  

लिफ्ट मध्ये तन्वी शिरली आणि तेव्हाच M.  Sc.  चा केतन आणि योगिता लिफ्ट मध्ये शिरले.  केतन अतिशय पॉप्युलर आणि हुशार मुलगा होता.  स्मार्ट,  उंच,  चमकत्या डोळ्यांचा.  तन्वी ला केतन अतिशय आवडत असे पण हा आपल्या रिच च्या बाहेर आहे हे तन्वी पक्के जाणून होती.  सावळी, थोडी गुटगुटीत असलेली तन्वी पटकन नजरेत भरणारी नव्हतीच.  आणि केतन च्या आजूबाजूला ज्या सुंदर,  स्मार्ट मुलींचा गोतावळा असे त्यात तन्वी कडे लक्ष जाणेही दुरापास्त.  लिफ्ट मध्ये तन्वी नी हळूच केतन कडे बघितले.  तो योगिता शी बोलण्यात गुंग होता.  तन्वी स्वतःशीच हसली.  सकाळी सकाळी केतन दिसला. तन्वीचा दिवस छान जाणार होता…… 

Gathering चे दिवस होते.  डिपार्टमेंट ची पार्टी होणार होती.   कोण डान्स करणार,  कोण गाणं म्हणणार याची लिस्ट द्यायची होती.  तन्वी स्वतःची कविता वाचणार होती.  नाव देताक्षणी वर्गात कुजबुज आणि टॉन्टिंग सुरु झाले…… शी कविता काय…. किती ओल्ड  फॅशन्ड !….. . कळली तर बरंय!…… तन्वी थोडी खट्टू झाली पण तिने दुर्लक्ष केले.  

पार्टी चा दिवस उजाडला.  अक्ख्या हॉल मध्ये नुसता बगीचा फुललेला होता जणू ! सगळ्या मुली सुरेख कपडे आणि मेकअप मध्ये होत्या.  मुलं ब्लेझर,  फॉर्मल्स मध्ये…..तन्वीने सुद्धा गुलाबी कुर्ता घातलेला.  इतकी गोड दिसत होती.  घराच्या दारात असलेल्या वेली गुलाबाचे गुलाबी फुल तिने केसात माळले होते.  हल्ली फॅशन नव्हती तरीही…. तिला फार आवडायचे….. आज केतन तिला दुरून बघत होता.  तिला आपण आवडतो हे माहित होते त्याला.  पण कधी बोलायला आली नव्हती…. इतर मुलींसारखी पुढे -पुढे  करायची नाही त्याच्या.  जरा वेगळी वाटायची त्यामुळेच.  आज गुलाबी रंग खूप खुलून दिसत होता तिला….. 

आज तिने वाचलेली कविता सुद्धा त्याच्या मनात रुंजी घालत होती….. 

तुझे माझ्या जीवनी येणे,  

त्याचेच झाले गाणे….. 

केतन चे विचार स्टेज वरून झालेल्या announcement मुळे थांबले…… सगळ्यांना आवडणारा फिशपॉंड्स चा कार्यक्रम सुरु होत आहे.  खरं तर केतन ला हा कार्यक्रम मुळीच आवडत नसे.  बहुतेक फिशपॉंड्स शारीरिक उणिवांवरच असत.  क्वचित एखादा मजेशीर असे.  ज्यावर फिशपॉन्ड जास्त त्याचा चेहरा बघवत नसे.  रडवेला होत असे…… 

आजही तेच होते.  शेवटचा फिशपॉन्ड वाचायला तन्वी च्या वर्गातील रोहन उभा राहिला…. 

And the last fishpond goes to…… 

आपल्या वर्गातील कवियत्री तन्वी…… 

ऐका हं…. 

“नया जमाना है,  

नया जमाना है,  

मगर…… 

ये मॉडेल पुराना है ” 

हॉल मध्ये हसण्याचा खाकोळ उठला.  शिट्ट्या,  टाळ्या,  तन्वीकडे बघून दाखवलेली बोटे….. यात तन्वीच्या मैत्रिणी सुद्धा सामील होत्या.  

तन्वी चा चेहेरा उतरला.  डोळ्यात पाणी जमा होऊ लागले.  तोंडावर उसने हसू ठेवून तन्वी दाराकडे सरकू लागली. 

केतन च्या हे लक्षात आले.  तो पटकन स्टेज पाशी गेला.  

“Our star performer ketan wants to dedicate a song to someone special….”. 

केतन चे नाव ऐकताच दारापाशी पोचलेली तन्वी थबकली.  तिने मागे वळून पाहिले आणि त्याच क्षणी तिच्या कानावर शब्द पडले…. 

” This is for you,  tanvi “…. 

आणि केतन ने हळुवार स्वरात तन्वी ची कविता गायला सुरुवात केली…. 

तुझे माझ्या जीवनी येणे 

त्याचेच झाले गाणे…. 

हॉल मध्ये आणि तन्वीच्या मनातही त्याचा सूर भरून राहिला होता ! 

-मंजिरी प्रसाद देशपांडे 

 

 

Manjiri Deshpande
Latest posts by Manjiri Deshpande (see all)

Manjiri Deshpande

नमस्कार. मी मंजिरी देशपांडे. मी जपानी भाषांतरकार म्हणून काम करते. वाचन आणि लेखनाची लहानपणापासून आवड आहे. मराठी व इंग्रजी साहित्य, कविता, हिंदी सिनेमा आणि सिनेसंगीत यांची विशेष आवड आहे. चार पाच वर्षांपासून फेसबुक वर नियमित लिहिते. Lekhakonline वर लेखनाची सुरुवात करण्यास खूप आनंद होतो आहे. धन्यवाद.

3 thoughts on “सूर 

  • September 12, 2021 at 1:21 pm
    Permalink

    छान लघुकथा

    Reply
  • September 18, 2021 at 2:55 am
    Permalink

    छान👌👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!