नैना ठग लेंगे…1

नैनो कि मत मानियो, नैनो कि मत सुनियो..
नैना ठग लेंगे.. नैना ठग लेंगे…

हे गाणं volume full ठेऊन ऐकत होता पिनाक!

हेडफोन घालून सकाळचा नाश्ता तयार करताना गाणी ऐकणं हा पिनाक चा आवडता छंद..
पिनाक मानस शास्त्रात phd करणारा एक हुशार विद्यार्थी आणि नुकताच त्याचा एक प्रबंध अमेरिकेतल्या मानस शास्त्र विभागाकडे पाठवण्यात आला होता.. सध्या ब्रेक म्हणून तो त्याच्या आत्येभावाकडे आला होता नाशिक ला..

पंचवटी जवळच बंगल्यांची सोसायटी होती.. तिथेच राहायचात्याचा भाऊ नचिकेत आणि सुमा आत्या..

आल्या आल्या आत्यानी प्रेमानं विचारपूस केली आणि जेवायला वाढलं पण पिनाक आणि नचिकेत ला कधी एकदा घराबाहेर पडतोय असं झालं होतं..
कारण ही स्पेशल होतं..
निमिषा.. नचिकेत ची गर्लफ्रेंड.. मुंबई ला होती पण फिजिओ शिकायला नाशिकला आली आणि नचिकेत च्या प्रेमात पडली.. दोघ ही एकाच वर्गात..
आता भावानी वहिनीला भेटायला बोलावलंय आणि अद्याप घरी ही सांगितलं नसल्यामुळे ही भेट स्पेशल होती..
निमिषा गोड होतीआणि स्वभाव ही मस्त होता.. लगेचच मैत्री झाली तिची पिनाक बरोबर आणि नेमकी तेव्हाच तिला बोलवायला नैना आली…
तिची बालमैत्रीण.. तिची ही ओळखपरेड झाली… नैना दुसऱ्याच दिवशी जाणार होती पण सगळ्यांनी आग्रह केला कि आपण त्र्यंबकेश्वर ला जाऊ ट्रिप ला आणि तिला थांबावं लागलं..
एकच मोठी गाडी घेतली.. नचिकेत, निमिषा पुढे बसले पिनाक नैना मागे आणि राहुल प्रशांत मागे बसले… पहाटेच निघाले..

राहुल च्या डोळ्यात नैना बद्दल आकर्षण दिसत होतं..
पिनाक ला मात्र तिचे डोळे आवडले होते
हिरवे निळसर झाक वाले..
डोहासारखे गूढ…
गोरीपान आणि व्यायामामुळे दिसणारी टोण्ड बॉडी… ती आर्टिस्ट होती.. आणि पोर्ट्रेट तर तिचा लाडका विषय…
एकंदरीत जो पुरुष तिला भेटेल तो थेट तिच्या प्रेमातच पडायचा..

एका ठिकाणी चहा पाण्यासाठी गाडी थांबवली आणि सगळे एकत्र बसले..
पोरी आपसात कुजबुजत होत्या.. पण पिनाक मात्र एकटा उभा होता… दूरवर दिसणाऱ्या डोंगररांगा पाहत… त्यात त्याचे पिंगट डोळे त्या उन्हात अजूनच चमकत होते..
त्याच्या साठी चहा घेऊन नैना आली..
हं.. घे.. म्हणतं चहा पुढे केला..
थँक्स… म्हणतं त्यानं हातात घेतला..
काय पाहतोस रे इतकं निरखून? तिने कुतूहलाने विचारलं..
हा निसर्गाचा कॅनवास..
काय किमया आहे नाही.. त्या परमेश्वरा कडे केवढा मोठ्ठा कॅनवास आहे… आणि काय काय रेखाटतो तो…
त्याच्या कडे एकटक पाहत ती म्हणाली…
हम्म खरंय… आज मला ही कुणीतरी, खऱ्या सौन्दर्या कडे इतक्या स्वच्छ नजरेनं पाहताना दिसतंय..
म्हणजे? त्यानं आता वळून तिच्याकडे पाहिलं..
काही नाही.. असचं.. असं म्हणत ती तिथून निघून गेली..
काही वेळातचं ते त्रंबकेश्वर ला पोचले…
देवदर्शन झालं आणि आजूबाजूचा परिसर हिंडत जवळच्या जंगलापाशी आले… जंगलात थोडं फार हिंडायचं आणि परत फिरायचं असं ठरवून सगळे एकामागून एक चालत होते… जसं जसं आत जाऊ लागले तसं रानाचं गहिरे पण जाणवू लागलं आणि अचानक एका ठिकाणी नैना चा तोल गेला अन ती घसरत खालच्या दिशेनी गेली.. बाकीचे थोडे पुढे होते.. काही कळायच्या आत ती खाली गेली अन तिला वाचवायला राहुल उतराला.. आणि एका ठिकाणी त्याचा तोल जाऊन तो ही घसरला..

झाडी इतकी दाट होती कि हाका मारूनही काहीच प्रतिसाद येत नव्हता, भर दिवसा गडद अंधार..
रानं किड्यांची किरकिर, शांततेचा गूढ नाद आणि दुरून ऐकू येणारा पाण्याचा अस्पष्ट आवाज…

वातावरण अजूनच भेसूर भासू लागलं..
पिनाक सगळ्यांना धीर देत होता.. नचिकेत आणि निमिषा एकमेकांचा हात घट्ट धरून उभे होते..
बराच वेळ झाला तरी काहींचं प्रतिसाद मिळेना असं पाहून ,सगळ्यांनी एकमेकांना आधार देत त्या दोघांना शोधायचं ठरवलं.. हळू हळू तोल सावरत ते खाली उतरू लागले..
बऱ्याच वेळानंतर एका ओढ्यापाशी त्यांना बेशुद्ध अवस्थेत नैना सापडली..
तिला असं पाहून सगळेच हादरले होते.. तिच्या अंगावर जखमांच्या खुणा होत्या..
कसं बसं तिला शुद्धीवर आणलं आणि तिला राहुल बद्दल विचारलं पण तिला काहीच आठवत नव्हतं..

आता राहुल ला शोधायचं म्हणून ते ओढ्याच्या कडेनं चालू लागले इतक्यात नेटवर्क ला रेंज मिळाली आणि कुणाचा तरी फोन वाजला..
सगळ्यांना हुरूप आला.. राहुल ला फोन ट्राय करूयात म्हणत त्याला फोन लावला आणि अस्पष्ट रिंगटोन ऐकू आला.. आवाजाच्या दिशेने जात असतानाच.. जखमी अवस्थेत राहुल सापडला..

त्याला उठवलं आणि दोघांच्या आधारानं हळू हळू वाट चालू लागले.. नचिकेत ची पुजऱ्यांच्या मुलाशी ओळख होती.. त्यानं त्याला फोन लावला आणि थोड्याच वेळात गावातली माणसं मदतीला आली..

कसेबसे सगळे गाडीपाशी पोचले.. पण नियती मात्र आपलं जाळं विणून त्यांची वाटच पाहत होती..आणि त्यांच्या गाडीच्या टपावर बसून मजेत पाय हलवत होती…

काय घडलं नक्की? राहुल आणि नैना सोबत..

क्रमश :
©मनस्वी

One thought on “नैना ठग लेंगे…1

  • September 18, 2021 at 6:33 pm
    Permalink

    Interesting story. Waiting for next part

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!