नैना ठग लेंगे…८
विभा तिच्या मुंबईतल्या घरी पोचली खरी.. पण मनानं अजूनही त्या जंगलात होती.. नुकतीच तिच्या आईने टेरेस गार्डन ची काही पुस्तकं आणली होती.. त्यात वेगवेगळ्या वेलींचे फोटो होते.. सहज म्हणून त्यातलं एक पुस्तक उचललं आणि चाळू लागली.. आणि पाहता पाहता तिच्या मेंदूनी त्यातल्या एका वेलीला जिवंत केलं. हो जिवंत.. एक वेल नागासारखी सळसळत समोरच्या भिंतीवर चढली,पाहता पाहता तिला लालसर धुमारे फुटले.. आणि क्षणात त्यातून एक स्त्रीचं तोंड तिच्या दिशेनी जोरात समोर आलं... हा धक्का इतका तीव्र होता तिच्यासाठी की ती जागेवरचं कोसळली.. आणि बेशुदध झाली.. **** इन्स्पेक्टर वरद... हा मोठा हुशार अधिकारी, ताज्या दमाचा अन सळसळण्याऱ्या रक्ताचा.. नेमकं ह्यानी जेव्हा चार्ज घेतला तेव्हा त्याचा ड्रायव्हर सुट्टीवर होता.. तो आज परत आला आणि ड्युटी साठी गाडीजवळ जाऊन ती साफ करू लागला.. वरद त्याच्या ऑफिस क्वार्टर मध्ये राहत होता.. नवीन माणूस दिसला म्हणून त्याने हटकलं... ओळख परेड झाली आणि तेवढ्यात कमिशनर साहेबांचा फोन आला.. केस चे अपडेट देत असताना त्यानी हरिहर च्या पायथ्याच्या गावाचा उल्लेख केला.. तें ऐकून ह्या ड्रायव्हर नी कान टवकारले.. फोन संपताच तो समोर आला.. आणि म्हणाला.. साहेब.. एक इचारू का? तुमी आत्ता हरिहर पायथ्या बद्दल बोलत हुता नव्ह? माझंच गाव.. काय झालंय? वरद नी थोडक्यात केस सांगितली.. चार मुलांचा उल्लेख.. आणि राहुलची आत्महत्या.. याचा काहीतरी संबंध असावा असं त्याला वाटतंय हे ही बोलून गेला.. ड्रायव्हर मात्र शांतपणे ऐकत होता.. तें समद ठीक आहे.. पण तिथं दोन मुली बी हुत्या.. त्यांचं कुटच नावं न्हाई.. असं कसं? काय? दोन मुली.. वरद नी चमकून पाहिलं त्याच्याकडे.. अरे पण पोलीस स्टेशन ला जबानी दिली त्यात नाहीये मुलींचा उल्लेख.. सायेब.. एक सांगू का? बोला.. हे बगा.. मी त्याच गावात ऱ्हातो.. आणि पोरी श्रीमंता घरच्या असतील किंवा काई वंगाळ घडलं आसल.. तर अशा येळी ही नावं कुटच येत न्हाईत.. पण तुम्हांला त्या पोरांबरोबरं पोरी हुत्या हे मी खात्रीने सांगतो.. तिथला हॉटेल मालक माझा चुलत्या हाय... हे समदे तिथूनच गेले गडाच्या दिशेनी.. त्या दिवशी सांजच्या टायमाला गेली ही पोरं.. आभाळ नुसतं लकलकत हुतं.. अनं अवसेची वेळ.. म्या म्हसूबाला नारळ चढवला अन म्हागारी फिरलो.. तो पतूर म्या पाहिलंय ह्या समद्याना.. नक्की पाहिलंयस?? व्हय जी.. Ok चल चौकीत... असं म्हणत वरद युनिफॉर्म घालून आला.. आणि चौकीत पोचताच त्यानं स्केच आर्टिस्ट ला बोलावलं.. ड्रायव्हर नी दोन्ही मुलींची वर्णनं हुबेहूब सांगितली.. त्यातल्या एकीचा चेहरा ओळखीचा वाटला.. वरद एकटक तें दोन्ही स्केचेस निरखत होता... तपासाला एक नवी कलाटणी.. **** पिनाक ला अनुग्रह नं मिळाल्यामुळे रुखरूखं लागून राहिली होती.. या सगळ्यात एकच बरी गोष्ट घडली होती.. आणि ती म्हणजे स्कॉलरशिप.. पिनाक ला नुकताच इमेल आला होता अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी चा.. त्याचा शोध निबंध अभ्यासासाठी निवडला गेला होता.. आता त्याला लवकरात लवकर त्याचा पुढचा निबंध पाठवायचा होता... पिनाकला वरद चा फोन आला.. तातडीने तो त्याला भेटायला पोलीस स्टेशन मध्ये पोचला.. वरद नी ती दोन्ही स्केचेस त्याला दाखवली.. पण त्यानं ओळखतोसं का? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्या आधीच.. विभा च्या वडिलांचा फोन आला.. आणि वरद तडक मुंबईला निघून गेला.. *** पिनाक ही नचि आणि निमिषा ला भेटायला आला.. त्यानं विभा आणि नैना च्या स्केच बद्दल सांगितलं.. निमिषा कडून पत्ता घेऊन तो नैना ला भेटायला मुंबई ला निघाला...पिनाक नी मित्राची कार मागून घेतली.. जाताना मात्र त्यानं नं विसरता ती खिशात ठेवलेली वस्तू पुन्हा चाचपडून नीट आहे नं याची खात्री केली.. गाडी नाशिक हायवे ला लागली आणि त्यानं रेडिओ स्टेशन ट्यून केलं.. योगायोग असा की तो गुणगुणला आणि तेच गाणं लागलं... नैणो की मत माणियो रे.. नैणो की मत सुणीयो..2 नैणा ठग लेंगे... नैणा ठग लेंगे... तो गुणगुणता अचानक थांबला.. बाहेरच वातावरण बदलायला लागलं.. त्याच्या डोळ्यांसमोर क्षणात सावलीनं उन्हाला कवेत घेतलं.. भर दुपारी मिट्ट काळोखं.. उंच डोंगर रांगांवर ढग उतरू लागले.. एकीकडे गाण्याच्या ओळी बाहेर असं दाटलेलं मळभ... आणि अचानक रस्त्याच्या दूतर्फा हिरव्या रंगाचा दाटलेला गडदपणा... आता एकेक गोष्ट त्याला उलगडू लागली.. पण ही तर फक्त सुरुवात होती... **** नैना तिच्या आईजवळ आली... आई डायरीतलं काहीतरी वाचत होती.. नैना ची चाहूल लागताच तिने झटकन डायरी मिटली.. आणि टेबलवर ठेवली.. नैना नी तिच्या डोळ्यात पाहिलं... अचानक एक हिरवं वर्तुळ तिच्याभोंवती फिरू लागलं... हळू हळू तें अधिक गडद होऊ लागलं.. आणि एका क्षणी नैना नी तिच्या आईचा गळा धरला.. आई किंचाळली.. आ ssss.. सोड.. सोड मला.. काय हवंय तुला? का आम्हा मायलेकीला वेठीस धरलयस..?? सोड आम्हाला... पण नैना तशीच उभी राहिली समोर... एक रूप अत्यंत सुंदर मोहक आणि आरशातलं रूप तितकंच भेसूर, ओंगळवाणं, भयानक कुरूप... नैनाच्या आईचा आरडा ओरडा ऐकून अम्मा धावत वर आल्या.. त्यांनी नैना च्या आईला सावरलं... नैना नी डोळे घट्ट मिटून घेतले होते.. मग तिने पुन्हा डोळे उघडले.. या वेळी मात्र ती शांत होती.. अम्मा तिच्या आईला घेऊन खाली गेल्या.. त्यांनी डॉक्टरांना फोन केला.. आणि नेहमीची झोपेची गोळी त्यांना दिली.. तिची आई शांत पणे सोफ्यावर निजली.. #पिनाक पोचेल नैना च्या घरी? #वरद ला नेमकं काय कळलं ? #विभानी नेमकं काय पाहिलं? #नैना ला नेमकं काय झालंय? क्रमश : ©मनस्वी
Latest posts by gangal_manasi (see all)
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021