POPCORN……

गेल्याच आठवड्यात एक चित्रपट पहिला  . चित्रपटाचे तिकीट , पॉपकॉर्न सामोसा सारे काही धरून . हजाराचा तरी फटका होता. सहज आठवले ते १५/२० रुपयाचे तिकीट काढून पाहिलेले चित्रपट. दोन रुपयाचे पॉपकॉर्न , ५ रुपयाचे सामोसे, बटाटवडे.. तेव्हा आतासारखे मल्टिप्लेक्स नव्हते. मराठी चित्रपट  गिरगावमध्ये सेंट्रल सिनेमा, roxy , ऑपेरा house येथे पहिला जाई . हिंदी असेल तर मिनर्व्हा, मेट्रो इंग्लिश असेल तर इरॉस, regal .कुठेही चित्रपट चाट पहा खिशाला इतकं मोठा … चाट नसे . मराठी चित्रपट  अगदी साधे सरळ असत. हिरो  कोण तर सचिन, महेश आणि अशोक, लक्ष्यया  ….. hero खूप handsome असला पाहिजे आणि सिक्स पॅक abs असले पाहिजे अशा अटी  नव्हत्या !! रवींद्र महाजनी सारखा एखादाच handsome hunk  हिरो असे…. बाकी सर्व यथा तथाच असत. आणि heroin निवेदिता सराफ, सविता प्रभूणे , अश्विनी भावे, … आणि नायिका असे साडी मध्ये , ते पण साडी चापून चोपून  नेसलेली , हातभार बांगड्या आणि बंद गळ्याचे blouse किंवा फार तर सलवार  कमीज मध्ये.. हिंदी मधील नायिका जश्या शर्मिला टागोर, विद्या सिन्हा, मुमताज हि साध्या साडीतच असत. छोटीशी बात चित्रपट पाहताना मी चकितच झाले  साधारण गुंडाळलेली साडी, केसांचा एक शेपटा अशा रूपात नायिका पाहताना खूपच आश्चर्य वाटले….. अर्थात तेव्हाच्या जमान्यात सर्व सामान्य स्त्रियांना, चित्रपटातील character आपलेसे वाटावे म्हणूनच नायिकेचा गेट up असा असावा….. त्याही पूर्वीचे नायिका असे नववारी साडी  मध्ये. एकंदरीत सिम्पलीसिटी वर  जास्ती भर असे.
नायक नायिका यांच्या भूमिका सर्व सामान्यच्या जवळ जाणाऱ्या असत.  शूटिंग लोकेशन्स हि छोटा  काश्मीर अथवा mud  island चा एखादा bunglow .फार तर पुणे किंवा कोल्हापूर येथे शूटिंग .  तरीही हे चित्रपट सर्वनाच्या मनाला भावत.शनिवारी दुपारी दूरदर्शन वर मराठी चित्रपट दाखवलं जात असे आणि रविवारी संध्यकाळी  हिंदी चित्रपट.  एखादा फेमस चित्रपट दाखवला जाणार असेल तर लोक अगदी उत्साहाने  रविवारची वाट पाहत. .  मला आठवतेय तेव्हा घरोघरी TV  नव्हते, म्हणून शेजारी पाजारी जाऊन हि हे चित्रपट पहिले जात. आमच्याही घरी काही आजूबाजूचे लोक येऊन चित्रपट पाहत. तेव्हा गणपती मध्ये सुद्धा गलोगल्ली चित्रपट दाखवले जात. रस्त्यावर गोणपाट , चटया, वर्तमान पात्र टाकून त्यावर बसून   लोक चित्रपट पाहत. असे चित्रपट पाहायला हि खूप मज्जा येत असे.अर्थात आम्ही ते आमच्या घराच्या गॅलरी मधून पाहत असू.  कधी सुट्टी मध्ये VCR भाड्याने आणून हि चित्रपट पहिले जात,तासाच्या भाड्याने VCR आणले जात.रात्रीच्या भाड्यावर VCR आणला असेल तर लागोपाठ  तीन तीन हि चित्रपट पहिले जात !!  माझ्या लहानपणी छोटा चेतन नावाचा एक ३D चित्रपट आला होता . त्या चित्रपटाचे आम्हा सर्व मुलांना खूप अप्रूप वाटले होते.एकदा आम्ही “आग हि आग ” नावाचा एक टुकार हिंदी चित्रपट पाहायला गेलो होतो आणि चित्रपट पाहताना सतत इलेक्ट्रिसिटी जात होती. तेव्हा आमच्याच अंगांची आग हि आग होत असताना आम्ही इलेक्ट्रिसिटी येण्याची वाट पाहत पाहत तो चित्रपट पहिला .    ह्या सर्व गोष्टींची एक आपलीच मजा होती.
  ब्लॅक  अँड व्हाईट च्या जमान्यात मोस्टली मराठी चित्रपट तमाशाप्रधान  असत. गावातील पाटील, एक खलनायक , तमाशात नाचणारी नायिका असे काहीसे टिपिकल कथानक असे. मग हळू हळू गोंधळात गोंधळ, मुबईचा फौजदार, गंमत जम्मत , अशी हे बनवा बनवी, धुमधडाका, सवत माझी  लाडकी  असे काही हलके फुलके विनोदी चित्रपट आले. विनोदी चित्रपट सोबत  आत्मविश्वास , चौकट  राजा, कळत नकळत , तू तिथे मी ,  सारखे थोडे वेगळे विषय हाताळणारे चित्रपट हि होते. विवाहबाह्य संबंध सारखा विषय, म्हातारपणी  एकमेकांचा आधार बनून नव्याने आयुष्य सुरु करण्याचा विचार , मतिमंद माणसाचे भावविश्व असे वेग वेगळे विषय खुप छान पद्धतीने मराठी चित्रपटात मांडण्यात आले. असे म्हणता येईल कि मराठी चित्रपटामध्ये एक नवीन trend सुरु झाला.
हिंदी चित्रपट तर सर्वच्याच जिव्हळयाचा विषय असतो. हिंदी चित्रपटाने प्रेक्षकाला आपलेसे केले, भला मोठा टुमदार बंगला, शानदार गाडी, गडगंज संपत्ती सारी काही सामान्य माणसाच्या आवाक्यात नसलेली स्वप्ने माणसाला दाखवली …… यश चोप्रा नि तर सरळ हिरो heroins ना रोमान्स करायला exotic foreign लोकेशन्सवर पाठवले. जे आपले स्वप्न असते आणि आपण प्रत्यक्षात आणू नाही ते चित्रपटाच्या पडद्यावर पाहायला आम जनतेला आवडत असे. सर्व सामान्य माणूस कित्येक वेळा परिस्थितीच्या तडाख्यात सापडतो आणि इच्छा असूनही परिस्थितीचा  प्रतिकार करू  शकत नाही. अशा काहीश्या मनस्थितीत सामान्य जनता असताना  अमिताभ,धर्मेंद्र सारखे एक फटक्यात आठ दहा गुंडाना लावणारे macho man  hero म्हणून आवडायला लागेले. अर्थात,  देखणेपणाचा वरदहस्त लाभलेले कपूर घराणे …ऋषी कपूर, शम्मी कपूर ही खानदानी मंडळी तर समस्त. स्त्रीवर्गाच्या hot favourite लिस्ट मध्ये होतीच. संजीव कपूर सारखे थोडे वयस्कर दिसणारे हि नट त्याच्या अभिनयाने सगळ्याना  वेड लावत होते. राजेश खन्ना सारखा अतिशय सोज्वळ चेहरा असलेला नट तर पडद्यावर हिरोईन  सोबत रोमान्स करताना पाहताना समस्त तरुणीच्या  हृदयाची धाडकन वाढत असे. टिपिकल मसाला चित्रपटासोबत मासूम, अर्थ,  स्पर्श,साथ साथ , कथा,  बावर्ची वेगळ्या विषयाला हात घालणारे चित्रपटही लोकांना  आवडून गेले.”हम आपके है   कौन ” सारखे आयुष्याचा प्रत्येक क्षण  भरभरून जगा असा संदेश देणारे चित्रपट हि लोकांच्या मनाला भावले.
मला मात्र आवडतात ते हलके फुलके निखळ आनंद देणारे विनोदी चित्रपट. जुळ्यांची धमाल दाखवणारा अंगूर असो व गोलमाल, आयुष्यात माणसाला नुसते उच्च शिक्षित असून भागात नाही त्या सोबत स्मार्टनेस सुद्धा किती महत्वाचा  आहे ते सांगणारा धमाल विनोदी चित्रपट छोटीसी बात, शुद्ध हिंदी भाषेसारखा विषय घेऊन त्यातून विनोद फुलवणारा चुपके चुपके, पुनर्विवाह सारख्या विषय घेऊन बनलेला विनोदी चित्रपट  खट्टामीठा , शिस्त आणि वक्तशीरपणा या सारख्या गुणातून हि कसा विनोद निर्माण होतो याचे चित्रण असलेला खूबसूरत  हे काही माझे आवडत चित्रपट. तसेच विवाह बाह्य संबंधासारखा विषय खूप छान पद्धतीने हाताळणारा    सिलसिला हा हि माझा आवडता चित्रपट आहे.  आहे. कुठेही भावनांचा अतिरेक, ना दाखवता खूप   सुंदर पद्धतीने हा नाजूक विषय मांडून चित्रपट परत परत पाहण्यायोग्य बनला आहे. अमिताभ आणि  रेखा यांचे ऑनस्क्रीन chemistry तर लाजवाबच . अगदी एकमेकांच्या  मिठीत विसावाणे असो कि डोळ्यात डोळे घालून पाहणे असो….. सारे अगदी परफ़ेक्ट असते…. अर्थात याचे श्रेय जाते त्यांच्या ऑफस्क्रीन chemistry ला!!!!
 …. हिंदी चित्रपट आणि त्याचे नायक नायिका एक ना संपणारया विषय आहे. आता दर आठवड्याला नवीन चित्रपट येतात. काही चालतात, काही आपटतात. exotic foreign लोकेशन्स, लिव्ह इन मध्ये राहणारे नायक नायिका , पहिल्या भेटीतच नायकाला मिठी मारणारी नायिका , छोटे छोटे होत चाललेले नायिकेचे कपडे! हे सारे  ८०/९० च्या दशकातील चित्रपट पाहून मोठे झालेल्या पिढीला तितकेसे रुचत नाही. अर्थात दंगल, AIRLIFT., PADMAN, RUSTOM, TOILET EK PREM KATHA, सचिन  या सारखे  सारखे काही चित्रपट याला अपवाद आहेत!!! शेवटी काय ही एक मनोरंजन करणारी दुनिया आहे. कोणाला काय आवडेल ते आपण नाही सांगू शकत!!
 आपण चित्रपट पाहताना  popcorn खातो.ते  कसे चटपटीत लागतात .पॉपकॉर्न संपतात पण ती मसालेदार चव जिभेवर रेंगाळत राहते,  चित्रपट पाहणे हि असाच एक अनुभव आहे !!आपण चित्रपट  पाहतो …  या रंगेबिरंगी दुनियेत हरवून जातो. आणि चित्रपट संपल्यावर त्याच्या आठवणी मनात ठेवून   पुन्हा आपल्या वास्तवादी दुनियेत येतो……
Anuja Pathare
Latest posts by Anuja Pathare (see all)

Anuja Pathare

मी अनुजा पाठारे. माझे शिक्षण m.com पर्यंत Sydenham कॉलेज येथून झाले आहे.मी एक शिक्षिका आहे. विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या भाषेत शिकवण्यात माझा हातखंडा आहे. मी एक मनस्वी व्यक्तिमत्त्व आहे. स्वानंदी अशी माझी खरं तर ओळख करून द्यायला मला आवडेल. मी जशी माझ्या जिवाभावाच्या माणसाची मने आनंदी ठेवते तितकच स्वतःच मनही आनंदी ठेवते . स्वतःच मन खुश ठेवण, स्वतः च्या आवडी निवडी पुरवण, स्वतः चे छंद जोपासण हे माझ्या आयुष्यात तितकंच महत्वाचे आहे.. आपल्या आनंदात इतरांना सामील करून घ्यायला ,नवीन नाती जोडायला अन् त्या सोबतच जुनी नाती जपायला फार आवडते. जीवनात आनंद मिळवण्यासठी फार मोठया मोठया ऐहिक सुखा ऐवजी लहानसहान गोष्टी मधून आनंद शोधा हा माझा जगण्याचा फंडा आहे. जसे मला उत्तम उत्तम लेख , पुस्तके वाचून समाधान मिळत तसेच स्वतः च्या मनातील विचार शब्द रुपात मांडून ही खूप समाधान मिळते. Lekhonline च्या माध्यमातून माझे अनुभव, माझ्या मनातील भावना तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न तुमच्या पसंतीस उतरेल हीच आशा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!