साथ सोबत
आपण अगदी जवळ पास जरी जायचं असेल तरी बोलतो एकटीच कुठे जाऊ.? कोणीतरी सोबत असेल तर बरं होईल. माणसाला सतत कोणाची तरी सोबत हवीच असते. कुठं एकटेच प्रवासाला गेलो की सुरवातीचा थोडा वेळ जातो आजूबाजूची गंम्मत जम्मत बघण्यात जातो. पण नंतर मात्र वेळ घालवायचं कसा हा प्रश्न पडतो. मग आजूबाजूच्या प्रवाश्यासोबत गप्पा मारून वेळ घालवला जातो. खरंच आपल्या आयुष्यात कुणाची तरी सोबत असणं किती महत्वाचे असते. ही एका गरज पूर्ण करण्यासाठीच लग्न संस्था अस्तित्वात आली असावी. अडी अडचणीच्या वेळी, दुःखद प्रसंगी, संकट प्रसंगी तर हीच सोबत खूप हवी हवीशी असते. काही महिन्यापूर्वी वडिलांच्या आजारपणात माझ्या जवळच्या माणसानी सतत मला साथ सोबत दिल्यानेच मी त्या कठीण प्रसंगाचा धीराने मुकाबला करू शकले. नाही तर सारेच मुश्किल झाले असते. जेव्हा एखाद्या घरात मृत्यू होतो तेव्हाही सुरवातीचे काही दिवस सतत येणारे नातेवाईक किंवा शेजारी पाजारी, मित्र मंडळी यांचा किती आधार असतो. प्रिय व्यक्तीच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी, एकटेपणा थोडा फार प्रमाणात का होईना कमी होतो.
माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे. दुर्दैवाने खूप लहान वयात तिचा जोडीदार तिला सोडून कायमचे एकटेपण देऊन गेला. तिने ज्या हिमतीने हे एकटेपण झेलले त्याला तोड नाही. आपल्या एकटेपणाचा बाऊ न करता अडीअडचणी वर मात करून नेहमी आनंदी असते. खरंच
तिचे हे असे आपल्या जोडीदाराच्या नसलेल्या सोबतीलाच आपली हिम्मत बनवून आयुष्याची लढाई लढणे आणि आयुष्यचा एक एक क्षण भरभरून जगणे मला खूप काही शिकवून गेलंय.आयुष्याच्या जोडीदाराची सोबतीची खरी किम्मत मला कळली जेव्हा तिची जिवाभावाची मैत्रीण म्हणून तिच्या आयुष्यतील एकटेपणा मी तिच्यासोबतच्या काही हळव्या क्षणात अनुभवला….
लहानपणी आपल्या भावंडा सोबत घालवलेले आनंदाचे, क्षणच आपले त्यांच्या सोबतचे bonding अजून strong करतात. मित्र मैत्रिणी सुद्धा तर त्यांच्या सोबत घालवलेल्या मौज मजेच्या, सुख दुःखच्या सोनेरी सोबतीच्या दिवसानंतरच आपल्या जिवाभावाचे मैतर बनतात. बनतात. नवरा बायकोचे नाते तर एक अमूल्य नाते असते. एकमेकांना सुख दुःखात साथ सोबत देत देतच हे नाते फुलत जाते. पण काळाच्या नियमानुसार जेव्हा ही साथ सुटते तेव्हा मात्र एकाकी राहिलेल्या जोडीदाराला मात्र आठवणीच्या सोबतीनेच आयुष्य काढावे लागते……
आकांक्षाचे पंख लावून पिल्ले घरट्यातून उडून गेली की रिकाम्या घरट्यातील भिंतीची सोबत नकोशी वाटते….
अशी ही साथ सोबतीची कडू गोड कहाणी आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा भाग आहे……..हसते हसते कट जाए रस्ते जिंदगी युंही चलती रहे… म्हणत आपण जगत राहायला हवं .
- चाळिशीतली बर्फी - February 25, 2023
- अंगत पंगत - December 16, 2022
- ये उन दिनो की बात हैं…. - November 4, 2022