यशस्वी पुरुषाची बायको ….(भाग १. एकूण भाग ३ )
आज सकाळपासून अजिता वर अभिनंदनांचा वर्षाव होत होता. सगळे कलीग्स तिच्या क्युबिकल मध्ये येऊन तिला प्रमोशनच्या शुभेच्छा देत होते. फक्त दोन वर्षात तिने मिळवलेलं यश खरच अविश्वसनीय होत. लंच मध्ये सिईओ समीर ने अजितच्या खास कौतुकासाठी दहा मिनिटांचा अभिनंदन समारंभ ठेवला होता ऑफिसातच. ऑफिसच्या दोन्ही फ्लोअर वरचे जवळजवळ १५०० कर्मचारी चौदाव्या मजल्यावरच्या ऑफिसात दाटीवाटीने उभे होते. सगळे इंजिनियर, हुशार आणि प्रचंड मेहेनती. समीरने दहा वर्षांपूर्वी सुरु करून आज शेयर बाजारात लिस्टिंग झालेल्या S tech ltd ह्या आयटी कंपनीच्या यशाचे भागीदार. अजिता त्यातलीच एक. समीर बोलत होता. त्याने फक्त दोन वर्षात अजितने केलेल्या कामाचं, तिच्या हुशारीच कौतुक केलं. आणि त्याने अजिताच्या इंटरव्ह्यू बद्दलची आठवण सांगितली. ती म्हणाला “ मी अजितला हायर केली कारण तिच्या डोळ्यात मला प्रचंड महत्वाकांक्षा दिसली होती. ओव्हर टू अजिता.”
अजिता बोलायला उभी राहिली. बेचाळीस वर्षांची अजिता दिसायला सुंदर आणि सालस होती. सगळे ऐकू लागले. अजिता बोलू लागली.
अजिता- फ्रेंड्स मी आपल्या कंपनीचे आणि खास करून समीरचे आभार मानते की त्याने मला इथे नोकरी दिली आणि माझी capability दाखवायची संधी दिली. त्यासाठी वेळ दिला. सोपा नव्हता हा प्रवास. चाळीसाव्या वर्षी एका single mother असलेल्या बाईसाठी अशी संधी म्हणजे फक्त आणि फक्त नशीब आहे. मी नशीबवान ठरले. पण इतर लाखो बायका आहेत ज्या talent असूनही यशस्वी नवऱ्याच्या छायेत आयुष्य घालवतात. सगळा self-respect, भावना आणि स्वतःच अस्तित्व विसरून. आपल्या कंपनीने स्त्रियांसाठी सेकंड इनिंग हा initiative राबवून माझ्यासारख्या स्त्रियांना एक प्रचंड मोठी संधी दिली आहे. त्यासाठी मी कंपनी आणि समीरचे परत आभार मानते.
तीच भाषण ऐकून सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मग सेकंड हाफ मध्ये काम संपवून अजिता घरी निघाली. गाडी चालवत घरी जात असताना तिला ईशाचा फोन आला. इशा म्हणजे तिची सोळा वर्षांची मुलगी. अत्यंत समजूतदार, अभ्यासात हुशार आणि दिसायला तिच्या सारखीच गोड. अजितने ब्लूटूथ स्पीकर वर फोन घेतला.
अजिता- हाय…
ईशां- हाय vice president…
अजिता- thanks baby…
ईशां- how was the day? सर्वांनी विश केल ना?
अजिता- yes. सर्वानी wish केल. आणि समीर ने तर लहानस फंक्शन ठेवलं होत.
ईशां- हम्म…he is nice.
अजिता- yes…
ईशां- मग आज मला treat ना? कुठे नेते आहेस?
अजिता- तू ठरव. तू म्हणशील तिथे जाऊ.
ईशां- ओके. आपण toms kitchen मध्ये जाऊ. नवीन जागा आहे. Happening आहे.
अजिता- done.
ईशां- किती वाजता येते आहेस?
अजीताने map पहिला आणि म्हणाली-
अजिता- एक तास दाखवतोय. Traffic आहे गांधी रोडला.
इशा- तो रोजच असतो. ठीक आहे. तू ये. तोवर मी home work संपवते.
अजिता- ओके.
इशा- मम्मा ऐक ना…
अजिता- काय ग?
ईशां- तुझ्या प्रमोशनच dad ला सांगू का? तो आज पण फोन करेल ना रोजच्या सारखा?
अजिता-….
ईशां- काय झालं? नको का सांगू? नाही सांगत. तू लोड नको घेऊ यार. मी सहज विचारलं.
अजिता- नाही तसं काही नाही. सांग तू मिलिंदला…
ईशां- ओके. See you. And congrats…bye…
अजिता- बाय….
फोन कट झाला आणि अजिता मनाने कॉलेजात गेली. अजिता पुण्याची. मराठी शाळेत शिकून उत्तम मार्क्स मिळवून सायन्सला प्रवेश घेऊन बारावी नंतर इंजिनियरिंगसाठी मुंबईत vjti ला आली. तिथेच तिची आणि मिलिंदची ओळख झाली. दोघे एकाच वर्गात. दोघेही हुशार. दिसायला देखणे. मिलिंद गोखले म्हणजे अस्सल कोकणस्थ रूप. घरे डोळे, गोरा रंग, भुरे केस आणि चेहऱ्यावर हुशारीच तेज. मिलिंद मुंबईचा. बालमोहन आणि रुपारेल चा विद्यार्थी. आता vjti मध्ये. ईशां हॉस्टेल मध्ये राहायची. ती आणि मिलिंद एका ग्रुप मध्ये होते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी भटकणे, सिनेमे बघणे, मुंबईत ज्यांची घर होती त्यांच्या घरी जाणे हे सुरु होत. कॉलेजात मिलिंद आणि अजिता मध्ये पहील्या नंबर साठी चुरस होती. कधी मिलिंद पहिला यायचा तर कधी अजिता. दोन वर्ष एकत्र काढल्यावर दोघांच्या मनात प्रेमाचा अंकुर फुलू लागला. मग नेहमीच्या वळणाने त्यंची देखील प्रेम कहाणी गेली आणि valentines day ला मिलिंद ने सर्वांसमक्ष तिला प्रपोज वगैरे करून दोघे ग्रुप मध्ये “कपल” झाले.
मिलिंद ने त्या दोघांबद्दल स्वतःच्या घरी लगेच सांगून टाकल. मिलिंद चे वडील मोठ्या बँकेत अधिकारी होते. त्यांना ऑफिसची गाडी वगैरे होती. सुखवस्तू कुटुंब होत त्याचं. मिलिंद ची बहिण माधुरी उत्तम गायची. तिने त्या क्षेत्रात पदवी घ्यायचा निर्णय घेऊन ती विशारद कोर्स करत होती. वयाने मिलिंद पेक्षा दोन वर्षांनी लहान. दिसायला तशीच देखणी. बडबडी. टपोऱ्या डोळ्यांची. घरी कळल्यावर तिने अजितला “वहिनी” म्हणायला सुरुवात देखील केली. मिलिंदच्या घरून विरोध व्हायचं काहीच कारण नव्हत. अजितच्या घरी देखील मिलिंद पसंत होता. त्यामुळे दोघांच्या प्रेम कहाणीत व्हिलन कोणीच नव्हता. वर्ष भुरूभुरू उडून गेली आणि फायनल परीक्षा जवळ येऊ लागली. सगळे झटून अभ्यासाला लागले. परीक्षा झाली. अजिता पुण्याला आली. लगेच तिच्या आईने लग्नाचा घोषा सुरु केला. अजिता ने स्पष्ट सांगितलं की तिला मास्टर्स करायला अमेरिकेला जायचं आहे. लग्न इतक्यात नाही. अजितच्या वडिलांनी तिला सपोर्ट केला. त्याच रात्री मिलिंद च्या वडिलांचा फोन अजितच्या घरी आला. त्यांनी मिलिंद आणि अजितच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. अजितचे वडील म्हणाले देखील कि घाई काय आहे. दोघांना पुढे शिकायचं असेल तर शिकू द्या म्हणून. त्यावर मिलिंद चे वडील म्हणाले “अहो आमची मुलाची बाजू असून आम्ही प्रस्ताव ठेवतोय. आणि तुम्ही चक्क आता नको म्हणताय? अहो तरुण मुल आहेत. बेसिक शिक्षण झालंय. पुढे शिकतील, नोकरी करतील जे हव ते करतील. पण हे वय वाईट असतं. प्रेमात आहेत ना मग लग्नाच्या गठीत अडकवले की आपण मोकळे. मग त्यांना काय करायचं ते करू द्या. शिका, नोकरी करा, आम्हाला नातवंड द्या….काय?: हे बोलून ते जोरात हसले. आता मुलाचे वडील लग्नाचा प्रस्ताव ठेवत आहेत म्हटल्यावर अजिताच्या घरच्यांना देखील नाही म्हणता आल नाही. रिझल्ट लागायच्या आधीच त्याचं रजिस्टर पद्धतीने लग्न झाल. पुणे आणि मुंबईत रिसेप्शन झाली. आणि रिझल्ट लागला. अजिता कॉलेजात पहिली आली होती आणि मेरीट लिस्ट मधेय पण होती. मिलिंद कॉलेजात दुसरा आला होता आणि तो पण मेरीट होल्डर होता. दोघे प्रचंड खुश झाले. दोघांनी मास्टर्स साठी एकाच युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. दोघे अमेरिकेला गेले.
अमेरिकेत सगळच नवीन होत. वातावरण, कल्चर, लोक, अभ्यास, युनिव्हर्सिटी, आणि त्यांचा संसार सुद्धा. सहा महिने जरा सेटल झाल्यावर अजिताने अमेरिकेत सेटल असलेल्या तिच्या कझिनच्या लहानश्या कंपनीत हळूच पार्ट टाईम नोकरी सुरु केली. चार पैसे मिळू लागल्यावर अमेरिकेत राहाण थोड सुसह्य होऊ लागल. स्कॉलरशिप दोघानाही होतीच. दोघांच मास्टर्स पूर्ण झाल आणि दोघांनाही वेगवेगळ्या कंपनीत कॅम्पस मधून नोकऱ्या मिळाल्या. पण मिलिंद कॅलिफोर्नियाला आणि अजिता जर्सीला अशी ताटातूट होणार होती. पण पर्याय नव्हता. दोघानाही मिळालेल्या ऑफर्स नाकारण्या सारख्या नव्हत्या. रिझल्ट नंतर पंधरा दिवसात जोइनिन्ग होत. दोघांनी ऑफर स्वीकारल्या. जोइनिन्ग च्या आधीचे पंधरा दिवस दोघांनी एकत्र मजेत घालवायचं ठरवलं होत. त्यानुसार दोघे त्यांच्या सेव्हिंग मधून Switzerland ला फिरायला गेले. सात दिवसांची टूर. दोघेच. ती टूर अविस्मरणीय होती. दोघांनी परत येऊन आपापल्या कंपनीत ड्युटी जॉईन केली आणि पहिल्याच महिन्यात अजितला ती प्रेग्नंट असल्याची जाणीव झाली.
तिने त्याबद्दल मिलिंदला सांगितल्यावर मिलिंद प्रचंड खुश झाला. म्हणाला-
मिलिंद- काय सांगतेस? Wow. मी आणि अर्जुन, आमचा दोघांचा नेम कधीच चुकत नाही.
अजिता- ए गप रे. आता कुठे नोकरी लागली आहे आणि प्रेग्नंट? त्यात तू पण लांब. मी सांगत होते पण तू ऐकल नाहीस. तुझी मजा झाली आणि परिणाम मला सहन करावे लागणार.
मिलिंद- ए बास काय? आपल पाहिलं बाळ आहे ते. त्याला परिणाम नको म्हणू.
अजिता- हो. मान्य आहे. पण मी कस manage करू मिलिंद? नवा जोब, नवीन शहर आणि मी एकटी. त्यात ही प्रेग्नन्सी म्हणजे…
मिलिंद- babes प्लीज…अस negative नको बोलू. हि किती आनंदाची गोष्ट आहे, आपण त्याकडे positively बघुया.
अजिता- म्हणजे काय करुया?
मिलिंद- म्हणजे आपल्या बाळाला मस्त जन्म देऊया.
अजिता- ते मी करणार आहे. तू काय करणार?
मिलिंद- हम्म…let me figure out…मलाही अनुभव नाहीये ना यार…
अजिता- माहित्येय रे. मी गम्मत केली. पण हे कसं manage करायचं तेच कळत नाहीये.
मिलिंद- एक आयडीया. तू ना तुझ्या आईला बोलावून घे लास्ट २ महिन्यांच्या वेळी.
अजिता- आणि तू?
मिलिंद- मी येईन ना भेटायला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा.
अजिता- I don’t know Milind मी ह्याच्याशी कस deal करू शकेन…
मिलिंद- सगळ नीट होईल. मी आहे ना? आणि मी म्हणालो तसा positive विचार कर. And congrats to us for our first baby…
क्रमश:
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
Wonder how the story will end !Awaiting* for next part