ये उन दिनो की बात हैं…. 

थोडी थंडी पडायला लागलीय…. मला मुंबईची थंडी आवडते…. खरं तर ती थंडी नसते… नुसता सकाळ संध्याकाळी हवेत गारवा असतो इतकंच…. बाकी थंडी अनुभवायची तर दिल्ली सारख्या ठिकाणी राहायला हवं… मग कळते थंडी म्हणजे काय…. मी काही वर्षे दिल्ली मध्ये वास्तव केले…. तेव्हा थंडी हा एक स्वतंत्र ऋतू असतो हे आयुष्यात प्रथम अनुभवलं….. एक तर मुबंई वरून दिल्ली ला गेल्यामुळे माणशी एकच स्वेटर आमच्या कडे होता तोही अगदी साधा हलका फुलका…. थंडी पडायला लागल्यावर आम्हाला कळलं की हया स्वेटर चे काही इथे निभाव लागणार नाही… मग आयुष्यात  पहिल्यांदा स्वेटर खरेदी केली…. घरी घालायला वेगळे…. बाहेर जायला वेगळे… या शिवाय branded thermal wear, आता पर्यंत  हातमोजे फक्त छायागीत मधील हिरो हिरोईन ला बर्फात खेळतानाच घातलेले पहिले होते…….. त्यांचीही या थंडीत फार जरूर असते हे कळले…. आपल्या बॉम्बे dying च्या double bed च्या चादरीवर झोपलो की नुसतं गार गार वाटायचं…. मग छान जाडजूड रजया खास बिछाना वर पांघरायला आणि अंगावर पांघरायला विकत घेतल्या…… मुंबई मध्ये कधी काळी घेतलेला स्वेटर वर्षा न वर्ष चाले…… इथे कितीही स्वेटर घ्या कमीच पडे….. इथला महिला वर्ग फार आवडीने स्वेटर खरेदी करतात…. साडी वर जसा मॅचींग blouse असतो तसा प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग स्वेटर ही खरेदी केला जातो…. पुरुष आपले मळखाऊ रंगाच्या स्वेटर वर समाधानी असतात अगदी दिवसही 12/13 degree temperachar असते…. रात्री तर नुसतं कुडकुडायला होत….. मी तर किचन मध्ये पण गिझर बसवून घेतला होता….. आता बोला रात्री हिटर सुरु केल्या शिवाय झोप येणं मुश्किल….. 

हया थंडीत खाण्या पिण्या ची मात्र चंगळ असते…. सरसो का साग, आलू पराठे, छोले पूरी, momos, गरमा गरम chinese सूप, वेग वेगळ्या चिक्या, drifruit ची पंजिरी….गप्पा मारत मारत चहा चे किती cup रिचवले जायचे  काही विचारू नका….. दुपारी उन्हात बसून गप्पा ची मैफिल जमायची….. जुन्या दिल्लीत ऐन थंडीत करीम ‘s भेजा करी, मटण करी वर ताव मारणे ही आनंदाची पर्वणी असे….. दिल्लीत असताना आम्ही ह्या दिवसात भरपूर day ट्रिप्स करायचो…. दिवसभर कितीही फिरा अजिबात थकवा जाणवायचं नाही……. कितीतरी वेळा आम्ही घरून जेवण बनवून न्यायचो आणि मस्त family पिकनिक करायचा…. मजा यायची……. 31 st च्या पार्टीत ही जागोजागी ठेवलेल्या शेकोटी वर हात शेकत… स्टार्टर्स खाण्याची मजा औरच होती…. 

नाही म्हणायला  या थंडीचा थोडा फार त्रास व्हायचा पण हळू हळू मजा ही यायची……. तर अशी ही उन सर्दी के दिनो की बात….

Anuja Pathare
Latest posts by Anuja Pathare (see all)

Anuja Pathare

मी अनुजा पाठारे. माझे शिक्षण m.com पर्यंत Sydenham कॉलेज येथून झाले आहे.मी एक शिक्षिका आहे. विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या भाषेत शिकवण्यात माझा हातखंडा आहे. मी एक मनस्वी व्यक्तिमत्त्व आहे. स्वानंदी अशी माझी खरं तर ओळख करून द्यायला मला आवडेल. मी जशी माझ्या जिवाभावाच्या माणसाची मने आनंदी ठेवते तितकच स्वतःच मनही आनंदी ठेवते . स्वतःच मन खुश ठेवण, स्वतः च्या आवडी निवडी पुरवण, स्वतः चे छंद जोपासण हे माझ्या आयुष्यात तितकंच महत्वाचे आहे.. आपल्या आनंदात इतरांना सामील करून घ्यायला ,नवीन नाती जोडायला अन् त्या सोबतच जुनी नाती जपायला फार आवडते. जीवनात आनंद मिळवण्यासठी फार मोठया मोठया ऐहिक सुखा ऐवजी लहानसहान गोष्टी मधून आनंद शोधा हा माझा जगण्याचा फंडा आहे. जसे मला उत्तम उत्तम लेख , पुस्तके वाचून समाधान मिळत तसेच स्वतः च्या मनातील विचार शब्द रुपात मांडून ही खूप समाधान मिळते. Lekhonline च्या माध्यमातून माझे अनुभव, माझ्या मनातील भावना तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न तुमच्या पसंतीस उतरेल हीच आशा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!