मे महिन्यात माझ्या भावाचे लग्न होते . आम्ही हळद घेऊन नवरीच्या घरी गेलो होतो. मस्त वाजत गाजत बेंजो च्या ठोक्या वर आमचे स्वागत दणक्यात झाले . मग जेवणाची वेळ झाली. बुफे लावला होता.आम्ही सवयी प्रमाणे ताटे घ्यायला गेलो. पण नवरीच्या घरच्यांनी सांगितले कि आज आमच्या मुलीच्या सासरच्या लोकांचा खास मान आहे. तुमच्यासाठी आज पंगत आहे. तुम्ही पांगतीमधे बसा आणि आम्ही तुम्हाला वाढणार. आणि आम्ही मस्तपैकी पंगतीत बसलॊ आणि पोटभर जेवलो. खर सांगायचे तर आम्ही दोन घास जास्तीच खाले. नवरी कडचे लोक कोळी असल्याने मस्त कालवण भात आणि फिश fry असा फक्कड बेत होता…. ते आगरी पद्धतीचं झणझणीत जेवण आम्ही अक्षरशः ताव मारून जेवलो.
हे आग्रहाने,प्रेमाने वाढले जाणारे जेवण जेवताना पूर्वीचा काळातील म्हणजे ८०/९० च्या दशकांतील लग्नात उठणाऱ्या पंगती आठवल्या. खर सांगायचे तर तेव्हा लग्न हा एक घरगुती सोहळा असायचा . हळद, मांड्वमोडी या सारखे समारंभ घरीच केले जात. कुठल्याही केटरर लाजेवणाची ऑर्डर दिली जात नसे . साग्र संगीत जेवण घरीच बनवले जात असे. घराच्या अंगणात किंवा ओट्या वरच पत्रावळी वरच पंगतीच्या पंगती उठत . पहिली पंगत लहान मुलांची , दुसरी पुरुषांची आणि ती शेवटची घरातील बायकांची. घरच्या स्त्रियाना बरेच कष्ट पडत पण तरीही हि त्या आवडीने हे काम करत. घरातील वयाने अणि मानाने मोठी स्त्री किती जेवण करायचे, काय मेनू असेल याचा निर्णय घेत असे. मग तिच्या मदतीला इतर बायका असत अणि गप्पा गोष्टी, कान गोष्टी अणि थोड्या रुसव्या फुगव्या च्या सोबतीने मस्त स्वयंपाक तयार होई. कधी थोडा अंदाज चुकीचा ठरे पण मग अश्या वेळी शेवटच्या पंगतीला बसणाऱ्या बायका सार निभावून नेत.
पुरी, भाजी, वरण भात, किंवा पुलाव, लोणचे, पापड असा साधासा बेत असे पण घरीच्या घरी प्रेमाने बनवलेल्या त्या जेवणाची चव मात्र भारी असे. आम्ही लहान मुले सतत स्वयंपाक घरात फेऱ्या मारून जेवण कधी मिळणार याची खबर काढत असू… मग आम्हाला एखादा लाडू, गरम पुरी, पापड अस काही तरी देऊन स्वयंपाक घरातून बाहेर पिटाळले जाई. घरातली दोन तीन कर्ते पुरूष सोडले तर बाकी पुरुष मंडळी मात्र मस्त मजेत लाडू चिवड्याचा फन्ना उडवत गप्पा च्या मैफिलीचा जमवत बसले असतं. त्यांची अणि लहान मुलांची एकंदरीत मजा असे. बायका बिचाऱ्या पदर खोचून काम करतं असत. त्यातल्या त्यात घराच्या माहेरवाशीण ला थोडी फार सूट असे…म्हणजे ती वन्स म्हणून स्वयंपाक घरातून बाहेर पडून भावा सोबत चहा पित गप्पा मारत बसू शकत असे…. पण सूना मात्र बिचाऱ्या पूर्ण स्वयंपाक घरातच असत…
लग्न जरी हॉल मध्ये लागलं तरी reception ला जेवण नसे तर, ice -cream असे, tuti fruity किंवा वॅनिला flavour चे !! काचेच्या बशीत ice क्रीम घेऊन वेटर फिरत असत . कधी कधी आपल्याकडे प्लेट येई पर्यंत ice क्रीम वितळलेले असे!! आम्ही मुले काका,मामा च्या वशिल्याने कधी कधी दोन तीन ice cream फस्त करत असू. नाही तर ते वेटर काही आम्हा मुलांनी परत ice cream मागितले तरी देत नसत…. इतका राग येई त्या आगाऊ वेटर चा तेंव्हा…. नवरा नवरीचे फोटो सेशन हि होत असे ice cream भरवताना, पहा आठवत असेल,तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या नि सजवलेली डिश आणि आजूबाजूला ड्राय ice मधून निघणाऱ्या वाफा आणि नवरा नवरी यांचे ice क्रीम भरवतानाचे फोटो ……..ice cream ची प्रथा सूरू होण्या पूर्वी गोल्ड स्पॉट किंवा मसाला दूध ही असे reception ला….. जेवढं मला आठवतंय हॉल मधील decoration ही साधं असे…. क्रेप च्या पट्टी च…. नवरा नवरी साठी लाल रंगाची सिंहासन अणि पाहुण्या साठी लाकडाच्या फोल्डिंग खुर्च्या…. हॉल मध्ये AC नाहीच.,.. असो या साधे पणाची आपली गम्मत होती….आमच्या cousin gang ची वेगळी मजा असे.,…. कुठल्यातरी एखाद्या मामा ला किंवा नविन लग्न ठरले असेल त्या भावजी ना आम्ही मस्त पैकी मस्का मारून त्यांच्या कडून मस्त जवळच्या हॉटेल मधून छोटीशी पार्टी उकळत असू……. मामाचे सारी भाचे कंपनी लाडकी असे त्यामुळे त्यांचं मन मामा कसं मोडणार आणि नविन लग्न ठरलेल्या भावजिना… सासरी Impression जमवायचं असे म्हणून तेही आनंदाने पार्टी देत…… अणि आमची मात्र चंगळ होई.
नंतर नंतर लग्नाच्या reception ला जेवण ठेवण्याची प्रथा सुरु झाली. लग्न लागले के काही वेळाने ताटे वाट्या यांचा एक वेगळाच नाद ऐकू येत असे, बऱ्याच लोकांचे कान तो आवाज कधी येतो याची वाट पाहत असत… हा कानाला सुखवणारा आवाज आला की मग समजायचे आता पंगतीला सुरवात होणार. लांबलचक टेबले मांडली जात. पांढरे शुभ्र tablecloth अंथरले जात. आणि त्यावर ताटे, वाट्या, पाण्याचे पेले. सगळे मांडले जाई. सुरवातीला लिंबू , मीठ, लोणचे, कोशिंबीर वाढले जाई. मग बाकीचे पदार्थ वाढले जात.आणि वाढपी सतत हवे नको ते पाहत असत. जेवण तसे साधेच म्हणजे दोन भाज्या, पुऱ्या, मसाले भात, कढी, भजी जिलेबी, श्रीखंड. असे आयते वाढलेले जेवण नातेवाईकांच्या सोबत गोष्टी, मजा मस्करी करत एकदम चवदार लागत असे. मधून मधून वर आणि वधू पक्षतील मंडळी येऊन जेवणाचा आग्रह करत असत, शेवटच्या एक दोन पंगती मध्ये नवरा नवरी, आग्रह कर करून जिलेब्या वाढत. या सर्वामध्ये एक आपलेपणा होता, जिव्हाळा होता.
आता buffet शिवाय लग्नात जेवण नसते. वेगवेगळे स्टॉल वर वेगवेगळे पदार्थ असतात. इटालियन, मेक्सिकन, पंजाबी, गुजराती, विविध प्रकारचे पदार्थ असतात. भाज्या, रोट्या, rice प्रत्येक पदार्थाचे किती तरी प्रकार , या व्यतिरिक्त पिझ्झा,पावभाजी , पाणी पुरी, शेवपुरी असे चौपाटी वर हमखास मिळणारे पदार्थ हि असतात. स्वीट डिश चे हि किती प्रकार, गुलाबजाम पासून PASTRY पर्यंत अनेक प्रकार असतात.अगदी मुखशुद्धी साठी सुद्धा ८ ते १० प्रकारच्या सुपार्या असतात. आकर्षक पद्धतीने मांडलेले सारे स्टॉल आपल्याला खुणावत असतात. मात्र हे सारे पदार्थ एकच वेळी डिश मध्ये घेऊन DESIGNER कपडे सांभाळत लोकांना hi हॅलो करत त्यांचा आस्वाद घेणे काही तितके सोपे नसते. कदाचित थोडे त्रासदायकच असते.पण आता अशीच पद्धत असल्याने आपण हे सारे manage करतो.
अर्थात आपण काळानुसार बदलायला हवेच. त्यामुळे मी काही या buffet सिस्टिम च्या विरोधात लिहीत नाही. पण जी गम्मत आपल्या बहीण भावंड बरोबर लग्नाच्या च्या पंगतीला बसून गप्पा मारत ,जिलेब्या फस्त करण्यात होती ती या buffet सिस्टिम मधे नाही हे नक्की !!!!! ….
मी अनुजा पाठारे. माझे शिक्षण m.com पर्यंत Sydenham कॉलेज येथूनझाले आहे.मी एक शिक्षिका आहे. विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या भाषेत शिकवण्यात माझा हातखंडा आहे. मी एक मनस्वी व्यक्तिमत्त्व आहे. स्वानंदी अशी माझी खरं तर ओळख करून द्यायला मला आवडेल. मी जशी माझ्या जिवाभावाच्या माणसाची मने आनंदी ठेवते तितकच स्वतःच मनही आनंदी ठेवते . स्वतःच मन खुश ठेवण, स्वतः च्या आवडी निवडी पुरवण, स्वतः चे छंद जोपासण हे माझ्या आयुष्यात तितकंच महत्वाचे आहे.. आपल्या आनंदात इतरांना सामील करून घ्यायला ,नवीन नाती जोडायला अन् त्या सोबतच जुनी नाती जपायला फार आवडते. जीवनात आनंद मिळवण्यासठी फार मोठया मोठया ऐहिक सुखा ऐवजीलहानसहान गोष्टी मधून आनंद शोधा हा माझा जगण्याचा फंडा आहे.जसे मला उत्तम उत्तम लेख , पुस्तके वाचून समाधान मिळत तसेच स्वतः च्या मनातील विचार शब्द रुपात मांडून ही खूप समाधान मिळते. Lekhonline च्या माध्यमातून माझे अनुभव, माझ्या मनातील भावना तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न तुमच्या पसंतीस उतरेल हीच आशा.
Latest posts by Anuja Pathare
(see all)