आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग 2
विनी तशी साधी सरळ, गोरीपान, चटकन नजरेत भरेल अशी गोड मुलगी..बी.कॉम केलं आणि एका कंपनी मध्ये जॉब करायला लागली…तिच्यासाठी अमेयचं स्थळ एका वधू वर सूचक केंद्रातून मिळालं..पत्रिका जुळली..पहिल्या भेटीतच दोघं एकमेकांना आवडले..अमेय च्या आईला तर विनी फारच आवडली..तिचा निरागस स्वभाव त्यांना भावला..आणि त्या तिच्याकडे एक सून म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून बघायला लागल्या.
शनिवार, सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळं कसं निवांत होतं. विनी मॅडम भरपेट खाल्ल्यामुळे सुस्तावल्या होत्या..दुपारची दोन तास झोप काढल्यावर एक्दम फ्रेश होऊन उठली..आई पटकन चहा टाक..मला अमेय च्या घरी जायचंय…वेळेत पोचायला हवं बाबा नाहीतर काही खरं नाही….असं म्हणत ती स्वतःच्या खोलीत गेली आणि कपाट उघडून बेड वर बसली…बराच वेळ झाला तरी बाहेर नाही आली, म्हणून श्रद्धाताई तिला शोधत तिच्या रूम मध्ये गेल्या..तर बाईसाहेबांनी हे एवढे सगळे ड्रेसेस बेड वर पसरून ठेवले होते….आई सांग ना यातला कुठला ड्रेस घालू…चुडीदार कि पलाझो…कि जीन्स …..पहिल्यांदाच जातियेस ना, मग नीट चुडीदार घालून जा….तो पर्वा शिवून आणलेला घाल..विनीला आईचं म्हणणं पटलं…मस्तपैकी फेंट पिवळ्या कलर चा ड्रेस आणि त्यावर सगळं मॅचिंग कानातलं गळ्यातलं घालून छान यावरून विनी जायला निघाली..गोरी सडपातळ आणि उंच असल्यामुळे विनी ला ड्रेस फारच सुरेख दिसत होता..आणि आता काय बाबा अमेय भेटणार होता त्यामुळे कळी जास्तीच खुलली होती..अगं पण अमेय ला माहिती आहे का तुझ्या येण्याविषयी…नाही ग आई सरप्राईझ आहे…त्याच्या आईलाच माहित आहे फक्त…बरं…सावकाश जा ग. घराचा पत्ता माहित आहे ना…हो आई मी जाते बरोबर..
विनी अमेय च घर शोधत कर्वे रोड ला आली..भोंडे कॉलनी मध्ये आल्यावर एकांना ‘सार्थक’ बंगला कुठे आहे विचारलं..तर त्यांनी पण…”माझ्याकडे पाठ करून समोर बघा” म्हंटलं..तर तिथेच बंगला होता…तिने हसून थँक्स म्हंटलं…बंगल्या बाहेर ऍक्टिवा लावली आणि गेट उघडून आत गेली…..तर उजवीकडेच अमेय त्याची गाडी, लाल रंगाची फोर्ड पुसताना दिसला…..त्याचं लक्ष नव्हतं..तो गाणी गुणगुणत गाडी पुसत होता..त्याने मस्त टोमॅटो रेड कलरचा टी-शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती..जवळ जवळ ६ फूट उंच, गोरा पान आणि देखणा…लाल टी-शर्ट मध्ये एक्दम किलर दिसत होता..विनी त्याच्याकडे एक टक बघत राहिली..गाडी पुसून झाल्यावर तो वळला तर हिला बघून त्याला सुखद धक्काच बसला…पिवळ्या ड्रेस मध्ये विनी फारच सुंदर दिसत होती..अरे तू…..ये ना ये..आत ये..आज एक्दम सरप्राईझ…फोन करायचा ना..येतीयेस म्हणून..मी आलो असतो न्यायला.. विनी एक्दम लाजली…ते दोघे घरात गेले….विनी सोफ्यावर बसली आणि घराचं निरीक्षण करू लागली….दरवाज्यातुन आत आल्यावर समोरच्या भिंतीवर तिच्या लाडक्या स्वामी समर्थांचा हसरा फोटो होता….प्रशस्त हॉल आणि मोजकंच फर्निचर, मोठ्या खिडक्यांना सुंदर रंगसंगतीचे पडदे..किशोरी आमोणकर यांचं ‘सेहेला रे ‘ हे गाणं बारीक आवाजात लावलेलं (घरातल्यांच्या संगीताच्या उच्च आवडीची साक्षच होतं ते गाणं)…समोरच्या सोफ्यावर अमेय ची वसुधाआजी..स्नेहाताईंची आई, भाजी निवडत बसली होती..त्यांनी सुद्धा फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती, कानात डाळिंबी रंगाच्या कुड्या आणि नाकावर सोनेरी रंगाचा छोटा चष्मा…गुलाबी गोऱ्या रंगाला गुलाबी साडी शोभून दिसत होती..ये बस ग..कशी आहेस..घरचे बरे आहेत ना…..तेवढ्यात अमेय म्हणाला, अगं आजी आई कुठाय…अरे ती जरा कोपऱ्यावर गेलीये..येईलच इतक्यात…तिला पाणी दे प्यायला.. त्यानी पण लगेच पाण्याचा ग्लास आणून ठेवला..अगं विनी तू आधी कळवायचंस ना येणारेस ते..आज आईची कुठलीशी मैत्रीण येणार आहे म्हणे आणि दोघी पिक्चर ला जाणार आहेत…विनी ला हे ऐकून खूप हसू आलं..खरंतर मैत्रीण म्हणजे दुसरी कोणी नाही तर विनीच…तेवढ्यात स्नेहा ताई आल्या…तिला पाहून म्हणाल्या आरे बेटा आलीस…बरं झालं..अमेय नि घर दाखवलं कि नाही..ये आत ये..असं म्हणत त्या तिला घर दाखवायला लागल्या…आरशा सारखं लक्ख घर होत..सगळ्या वस्तू जिथल्या तिथे पसारा नाही काही नाही.. खाली ५ खोल्या आणि वर मोठा हॉल आणि दोन बेड रूम्स.. किचन ला लागून छोटस संगमरवरी देवघर..मोजकेच देव..सुंदर चांदीच्या समईमध्ये शांत पणे तेवणारा दिवा आणि उदबत्तीचा मंद सुगंध..घरातील प्रत्येक वस्तू मधून स्नेहाताईंची सौंदर्य दृष्टी दिसत होती…घराच्या मागच्या बाजूला मोठ्या हौसेनी केलेली छोटी बाग..बागेत सुद्धा कुठेही कचरा नाही..अगदी नीट नेटकी खूप विचार करून केलेली बाग. सुगंध असेलेली सर्व फुलझाडं पश्चिमेला लावलेली..म्हणजे पश्चिमेकडच्या वाऱ्याबरोबर घरात सुगंधही दरवाळावा हा त्या मागचा हेतू..अमेय चे बाबा बागकाम करत होते..ते हि मग आत आले..आणि तिच्याशी हसून बोलले…..स्नेहा ताई तिच्या जवळ आल्या आणि हळूच म्हणाल्या ,बरं आता प्लॅन ऐक..तुम्ही दोघे आधी तुमच्या आवडीच्या हॉटेल मध्ये जा, खा प्या, गप्पा मारा आणि मग मूवी ला जा..तुमच्यासाठीच तिकिट्स काढली आहेत.. अमेय ला म्हणाल्या माझी मैत्रीण काही येणार नाहीये..असं करा, तुम्ही दोघेच पिक्चर ला जा. अमेयला गोम कळली आणि गालातल्या गालात हसत तो पण लगेच तयार होऊन आला..बाईक काढली आणि दोघे बाहेर पडले….एवढ्या लवकर काही जेवण गेलं नसतं म्हणून आधी ६ ते ९ च्या शो ला गेले.. विनी ने पण घरी तसं आईला कळवून टाकलं…
मूवी आणि नंतर जेवण यात वेळ कसा गेला कळलंच नाही..हॉटेल मधून निघताना अमेय नि तिचा हात हातात घेऊन थोडं दाबत म्हणाला..विनी आपल्या दोघांचं जरी लग्न होत असलं तरी आपल्याबरोबरच आपले आई-वडील हि असणार आहेत…माझ्या आईनी आणि बाबांनी खूप काटकसरीने संसार करून मला सगळी सुख दिली आहेत..माझ्या आईमुळेच घरात चैतन्य आणि आनंद आहे….आणि तू तुझ्या वागण्याने तो द्विगुणित करावा हि अपेक्षा आहे..आई तुझ्यासाठी सगळं करेल..तू सुद्धा तिचं मन जप..तुला काही सांगायचं असेल शेर करायच असेल, काही हवं असेल तर मी आहे…तू मला किंवा आईला विश्वासाने सांग..आम्ही तुला कधीच निराश होऊ देणार नाही…मी कसा आहे , घरचे कसे आहेत हे मी तुला सगळं सांगितलंय..तुही मोकळेपणानी बोल..फालतू कारणांवरुन मी माझ्या मित्रांच्या घरात मतभेद होताना पाहिलेत..आणि तसं मला आपल्यात होऊ द्यायचं नाहीये..
तू सगळ्यांना जीव लावावास, प्रेम द्यावस एवढीच अपेक्षा आहे..करशील ना एवढं…विनी ने सुद्धा त्याच्या हातावर हात ठेवून त्याला आश्वासन दिल…दोघे अमेयच्या घरी येऊन विनी ची गाडी घेऊन तिच्या घरी गेले..घराच्या थोडं अलीकडे गाडी थांबवून..अमेय ने परत तिचा हात हातात घेतला..तशी ती लाजून हात सोडवून घराकडे पळतच गेली..तिनी घराचा दरवाजा लावल्यावर अमेय त्याच्या घरी निघून गेला..
क्रमशः
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग ६ - July 21, 2023
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग ५ - June 30, 2023
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग 4 - June 17, 2023