आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग ६
संध्याकाळी विनी ऑफिस मधून घरी आली……पेट पूजा झाल्यावर लगेच हातात फोन घेऊन बाहेर झोपाळ्यावर बसली…व्हाट्सअँप वर काहीतरी मेसेजेस टाईप करणं चाललं होत…विनी ची आई तिला हाका मारत होती, पण हिच्या कानापर्यंत त्यांचा आवाज पोचत नव्हता…तिला शोधत त्या बाहेर आल्या..आणि पटकन हातातून फोन काढून घेतला…तर ती जरा वैतागूनच म्हणाली…हे काय…फोन कशाला काढून घेतलास…मी महत्वाचं बोलत होते ना……. तुझ्या लग्नापेक्षा सध्यातरी मला महत्वाचं काहीच वाटत नाही….आणि आता तुला निक्षून सांगते…हि फोनवरची बडबड, मेसेजिंग आता बास झालं…प्रत्येक गोष्ट अमेय ला सांगितलीच पाहिजे असं नाही….मी उठले, बसले, झोपले, दात घासले….चहा पितिये, या फालतू गोष्टी कशाला गं सारख्या बोलत राहता तुम्ही…..तुला आत्ताच सांगून ठेवतीये, त्याला सारखं भेटणं, त्याच्याशी फोन वर सारखं बोलणं अजिबात चालणार नाही…..त्यांच्या घरी सुद्धा त्यांनी बोलावलं तरी सारखं जायचं नाही…काहीतरी नावीन्य तुमच्या दोघांच्यामध्ये राहूंदेत……नंतर आहेच आयुष्यभर…..अति परिचयात अवज्ञा नको……थोडा तरी दुरावा पाहिजेच…….आणि अजून एक….तुम्ही कुठे जाता, खाता पिता याचे फोटोज फेसबुक किंवा दुसरीकडे कुठेही टाकायची गरज नाही…किंबहुना तुमच्या दोघांचे फोटोज अजिबात टाकायचे नाहीत….आत्ताच अमेयला आणि स्वतःला या गोष्टीची सवय लाव…आपल्या विषयी कोणाला काहीही माहिती द्यायची गरज नाही…..ज्यांच्याशी आपल्याला कर्तव्य आहे त्यांना आपण सर्व सांगितलेलं आहे….इथे हितचिंतक कमी आणि विघ्नसंतोषी लोक जास्ती असतात…..दृष्ट लागते….तुझा नसेल पण माझा यावर विश्वास आहे………आणि सात च्या आत घरात, हा नियम तुला आत्ता, या घरी असेस्तोवर आणि त्यांच्या घरी गेल्यावर सुद्धा लागू आहे……त्याला भेटायला आठवड्यातून एकदाच परवानगी आणि त्यात वेळेचं बंधन आहेच…..समजलं का….या उपर मला काहीही ऐकायचं नाही……अजून एक गोष्ट, शक्यतो त्याच्या मित्र मैत्रिणींबरोबर कुठेही जायची गरज नाही….हे त्याला कसं समजवायचं ते तू बघ, नाहीतर मी स्नेहाताईंशी बोलते……लोकांना तुला काय बघायचंय ते थेट लग्नात बघुदेत….आणि आपल्या आणि त्यांच्या नातेवाईकांच म्हणशील तर व्याहीभोजन, सीमांतपूजन या समारंभांना बघणं होईलच……
अगं अगं आई हो! जरा मधे मधे दम तरी घे बोलताना, किती या इंस्ट्रुक्शन्स……..तुझ्या भल्याचाच विचार करून सांगतीये….काय आजकालची फॅड्स तुम्हा पोरांची….बरं, तू म्हणशील तसंच करिन, मग तर झालं…खुश?? हो..
अजून काही गोष्टी बोलायच्या आहेत तुझ्याशी……कपडे आणि दागिन्यांची खरेदी जशी महत्वाची आहे त्यापेक्षाही महत्वाचे आहे तुझे आरोग्य…अजून ४ महिन्यांचा अवधी लग्नाला आहे….हीच वेळ आहे जेव्हा तू स्वतःवर लक्ष देऊ शकतेस…..इकडे तिकडे फिरण्यापेक्षा स्वतःच असं एक टाइम टेबल कर…..उद्या पासून पहाटे उठायचं, माझ्याबरोबर फिरायला यायचं, तुझं काय ते योगा टोगा कर, मला कामात मदत करायची…सगळे पदार्थ करायला शिकायचे…बेसिक सगळं येतंय तुला…पण कुठली गोष्ट माहित नाही असं नको………
मी डॉक्टर लेल्यांची अपॉइंटमेंट घेतीये, त्यांच्याकडून पंचकर्म करून घ्यायचं……ते कधी केव्हा कुठे करायचं ते तुला सांगतील…तुला काही शंका असल्यास त्यांना विचार…मी त्यांना तुला कौन्सेलिंग करायला सांगणार आहे…अमेय ला पण हवं असल्यास बरोबर तुझ्या नेऊ शकतेस…लग्न म्हणजे नुसतं नटणं मुरडणं फिरणं नाही…स्त्रियांच्या शरीरात बरेच हॉर्मोनल चेंजेस होत असतात….सगळं आयुष्यच बदलून जात तुमचं…त्याच्यासाठी शरीरशुद्धी होणं गरजेचं आहे….काही दोष असतील तर निघून जातील….तशी तू एकदम आरोग्य संपन्न आहेस…योगा आणि खेळामुळे तुझी तब्बेत चांगली आहे…इंटरनेट वर फालतू टाईमपास करण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष दे…..लग्नाच्या दिवशी ब्युटी पार्लरवाली तुला मेकअप करेल गं…पण मुळातच तुझी त्वचा छान दिसली पाहिजे…ते एक दिवसापुरता होईल…आपल्याला कायमच चांगलं दिसायचंय….तू चांगली ठणठणीत असशील तर घराकडे नीट बघू शकशील, नाहीतर नाही…घरात कितीही नोकर चाकर असले तरी बाईला घरात लक्ष द्यावंच लागतं..तिच्यावरच तिच्या घरातल्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अवलंबून असतं…
लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी आणि इतर बोलणी करण्यासाठी, स्नेहाताईंनी विनी आणि तिच्या आई- बाबांना घरी आमंत्रित केलं…गुरुजींना विचारून २४ नोव्हेंबर हि तारीख निश्चित करावी असं आम्ही म्हणतोय…एक तर त्या दिवशी शनिवार आहे….सगळ्यांना सोयीचं होईल….त्यात थंडीचे दिवस असल्यामुळे आल्हाददायी वातावरण असेल..सगळे एक्दम फ्रेश राहतील…तुम्हाला काय वाटतं विनी च्या आई आणि बाबा…..कल्पना चांगली आहे…पण ४ महिन्यात लगेच म्हणजे आत्ता कार्यालय मिळणं कठीण आहे…मी साधारण चौकशी केली तर सगळी कार्यालयं वर्षभर आधीच बुक होतात…..तुम्हाला कुठलं कार्यालय चालणार आहे….शिवाय तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत कळलं असतं तर बरं झालं असतं….म्हणजे आम्ही विनी साठी ४ बांगड्या आणि नेकलेस आणि कानातल्याचा सेट केलाय….अमेय च्या बाबांनी त्यांना थांबवलं….हे बघा आमच्या काही अपेक्षा नाहीत…तुम्ही स्वखुशीने तुम्हाला तुमच्या मुलीला काय द्यायचं आहे ते द्या…आम्हाला काही नको…..आम्ही तिला मंगळसूत्र, पाटल्या, आणि एक हार देणार आहोत….हि एक रीत म्हणून…नाहीतरी हे सगळे दागिने शेवटी लॉकर मधेच ठेवले जातात…आणि कार्यालयाचे म्हणाल तर तुम्ही काही काळजी करू नका….आम्ही त्यावर विचार केलाय…केटरिंग चा जो काही खर्च आहे तो आपण दोघे मिळून करू…..अजून काही शंका असतील तर विचारा….विनी च्या आई-बाबांना हे ऐकून गहिवरून आलं……आमंत्रितांची यादी अजून केलेली नाही, त्यामुळे आत्ता अंदाज नाही…….दोघांच्या कपड्यांचं म्हणाल तर आपण आपले आणू…तुम्ही तुमचे तुमच्या पसंतीने आणा आणि आम्ही आमच्या पसंतीने आणू…..फक्त सीमांतपूजन आणि लक्ष्मी पूजनाच्या साड्या आम्ही तिला घेऊ…अर्थात तिच्या पसंतीने…मान पानाचं पण आपण आपलं बघू…आमच्या लोकांसाठी काही आणायची गरज नाही..तुम्ही पण तुमच्या लोकांचं बघा…..त्यांच्या आवडी निवडी तुम्हाला जास्त चांगल्या माहिती…..आता मुद्दा राहिला लग्न कुठे करायचं याचा…मला एक १०-१५ दिवस द्या…मी तुम्हाला त्या जागी घेऊन जाईन….तुम्हाला ती कल्पना आवडेल याची मला खात्री आहे….विनी आणि तिचे आई-बाबा अमेय च्या घरी जेवूनच परत गेले…
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग ६ - July 21, 2023
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग ५ - June 30, 2023
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग 4 - June 17, 2023