वारसा (भाग ४)
आधीच्या भागाची लिंक- वारसा (भाग ३)
तेजस ऑफिसात आला. ऑफिस पासून काही अंतरावर त्यांच पोल्ट्री फार्म होत जे अविनाशच्या केबिन मधून बरोब्बर दिसत असे. तेजन ने अविनाश च्या केबिन मध्येच स्वतःसाठी एक लहानस टेबल आणि खुर्ची मागवून घेतले. Laptop टेबल वर ठेवला. उठून चालत तो त्या खिडकीजवळ गेला जिथून फार्म दिसत होत. काही मिनिट त्या फार्म कडे बघून वळला. चालत अविनाशच्या टेबल जवळ आला. त्यावर अविनाश, राधा आणि तेजस असा तिघांचा फोटो ठेवला होता. तेजस ने खाली वाकून त्या अविनाश च्या खुर्चीला नमस्कार केला आणि तो त्याच्या जागेवर येऊन बसला. त्याने सावंत काकांना आत बोलावलं. सावंत म्हणजे अविनाश ने धंद्याला सुरुवात केली तेव्हापासून त्याच्या बरोबर असलेला एक जुना जाणता सहकारी. अविनाश त्याला मित्र जास्त आणि कर्मचारी कमी मानत असे. सावंत अविनाशचा राईट hand होता. व्यावसायिक तसेच अविनाशच्या आयुष्यातील वैयक्तिक आर्थिक व्यवहार तसेच निर्णय ह्यात सावंतचं मत अविनाशला महत्वाच वाटत असे. सावंत वर सोपवलेली जबाबदारी सावंत काहीही करून पूरी करणार अशी अविनाशला खात्री होती. तरीही सावंत आपण कर्मचारी आहोत आणि अविनाश मालक आहे हे जाणूनच वागत असे. कधीच त्याने ती रेषा ओलांडली नव्हती. विचारल्याशिवाय सल्ला दिला नव्हता. सावंत केबिन मध्ये आला.
तेजस- काका आजपासून…
सावंत- हो. मला सरांनी फोन करून सांगितल तुम्ही जॉईन करताय म्हणून. खूप आनंद झाला मला ते ऐकून. सरांनी इतक्या वर्षांच्या मेहेनतीने उभा केलेला बिझनेस विकला गेला असता तर मात्र वाईट वाटलं असतं. तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे सर.
तेजस- सर? ओ काका हे काय आता?
सावंत- आता तुम्ही माझे बॉस आहात. तुम्हाला सर म्हणायला नको का?
तेजस- ओ काका, मला तुम्ही सर म्हणालात ना तर मी तुम्हाला बाबा म्हणतात तस ए धोंडू म्हणेन. चालेल का?
सावंत- तुम्ही बॉस आहात. जे म्हणाल ते चालेल.
तेजस- काका प्लीज हा. इतकं चांगल असू नये कोणी. तुम्हाला चालेल हो पण माझी जीभ धजावेल का? हे बघा तुम्ही मला तेजस बाबाच म्हणायचं ह्या पुढेही. अहो तुमच्या अंगाखांद्यावर खेळलोय मी. तुम्ही सर काय म्हणता मला?
सावंत- अहो पण…
तेजस- ते मान्य नसेल तर मी ऑफिसात येणारच नाही. चला बाय.
सावंत- तेजस बाबा…थांब..
तेजस- हा. आता कस मस्त वाटल. काका तुमच्या मदतीने आणि बाबांच्या गाईडन्स ने मी बिझनेस सांभाळणार आहे. एका वर्षाचा तर प्रश्न आहे. भुर्रकन उडून जाईल. मग परत बाबा सगळा कंट्रोल घेतील आणि मी युएसला जाईन. पण तोवर तुमची खूप मदत लागेल. तुमच्याकडून खूप शिकता येईल मला.
सावंत- नक्कीच तेजस बाबा. मी तुला सगळी मदत करेन.
तेजस- मग सुरुवात कुठून करुया?
सावंत- फार्म पासून. ज्या मालाचा व्यवसाय आपण करतो तो माल तर आधी समजून घे. मी तर सांगेन पहिला एक आठवडा ऑफिसात न येता फार्म वर घालव तेजस बाबा. आपला stock काय सांगतो ऐक, त्याची भाषा आणि मूड्स समजून घे. त्याच्या बरोबर वेळ घालव. सगळी माहिती घे.
तेजस- ठीक आहे काका. मी जातो फार्मवर. Thanks.
इतक बोलून तेजस उठला आणि केबिन मधून बाहेर पडून फार्म वर गेला. खिडकीतून तो आता सावंतला दिसत होता. सावंत ने अविनाशला फोन लावला आणि म्हणाला-
सावंत- सर तेजस बाबा गेला फार्मवर.
अविनाश- धोंडू, तू आहेस म्हणजे मला चिंता नाही.
सावंत- हो सर. काळजी नका करू तुम्ही. तेजस बाबा हुशार आहे. लवकर सांभाळेल सगळा बिझनेस.
इतक बोलून त्याने फोन कट केला. समोर तेजस फार्म मध्ये शिरलेला होता.
तेजस ने तो सबंध आठवडा खरच फार्म मध्ये काढला. तिथे त्याने अंडी, पक्षांची वाढ, पुनरुत्पादन, देखभाल ह्या सर्वांची सखोल माहिती घेतली. त्या पुढला आठवडा त्याने अविनाश आणि सावंतच्या मदतीने कस्टमर, सप्लाय चेन, अकाऊंटस, व्हेंडर वगैरे समजण्यात व्यतीत केला. त्या पुढील आठवड्यात त्याने स्वतः जाऊन सगळ्या सप्लायर्स आणि कस्टमर्सची भेट घेतली. दरम्यान अविनाश आणि सावंतच्या गाईडन्स मध्ये काही डील्स देखील केली. तेजस ला आता व्यवसाय कळू आणि आवडू देखील लागला होता. त्यातच दोन महिने निघून गेले. आता अविनाश ऑफिसला खूप कमी येत असे. आला तरी लंचला घरी परत जात असे. तेजस ने आता हळूहळू व्यवसायावर बर्यापैकी ग्रीप घेतली होती. मुळात तल्लख डोक्याचा असल्याने त्याला कोणत्याही विषयाची जाण पटकन येत असे. आता तेजस रोज रात्री जेवण झाल्यावर पोल्ट्री फार्मिंग बद्दल जी जी माहिती मिळेल ती वाचू लागला. त्यातील दिग्गज आणि जाणकार लोकांचे इंटरव्ह्यू बघू लागला. त्यांच्या सक्सेस स्टोरी ऐकल्यावर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की व्यवसाय विस्तार हीच व्यवसाय वाढीची किल्ली आहे. तेजसच्या डोक्यात त्या दिशेने विचारचक्र फिरू लागल. आपला व्यवसाय कसा वाढवता येईल ह्याचा तो आता विचार करू लागला.
त्या दिवशी तेजस असाच त्याच्या ऑफिसात व्यवसाय विस्ताराबद्दल विचार करत असताना त्याला केळकर बाईंचा फोन आला.
तेजस- बोला बाई.
बाई- अरे तेजस शिवानी साठी कोणाशी बोललास का? तिच्या लायक नोकरी आपल्या गावात मिळत नाहीये रे. तिनेही खूप प्रयत्न केला. पण इंजीनियरचा आम्हाला काय उपयोग असच उत्तर मिळालं तिला. पुण्याला गेली तर उद्या मिळेल नोकरी. पण आता तिच्या लग्नाच बघतोय ना. म्हणून ती पण तोवर माझ्यापासून लांब जायला तयार नाहीये. खूप समजावलं मी. पण ऐकत नाहीये.
तेजस- हम्म…बाई आपल्या गावात इंडस्ट्री नाहीये ना. मग इंजिनियरला नोकरी कशी मिळेल?
बाई- तेच तर. एक काम करतोस का? तूच समजाव तिला. एका वयाचे आहात तुम्ही. कदाचित तू सांगितलस तर पटेल तिला.
तेजस- बाई अहो मी काय सांगणार?
बाई- ते तू बघ बाबा. काहीही कर आणि तिला पुण्याला जाऊन नोकरी बघायला तयार कर. मी तिला तुझ्या ऑफिसात पाठवू का?
तेजस- हो चालेल बाई. आता दोन वाजलेत. तिला पाच पर्यंत पाठवा.
बाई-पाच वाजता? अरे ती पोहोचेल आत्ता दहा मिनिटात. तिला मी सांगितल आहे की तेजस एका नोकरीच्या संदर्भात भेटणार आहे हणून.
तेजस- अहो बाई पण…
बाई- तू हुशार आहेस ठावूक आहे मला. सांभाळून घेशील ह्याची खात्री आहे. तिला तयार केलीस ना जायला तर पुढल्या वेळी घरी आल्यावर साजूक तुपातले दोन बेसन लाडू खायला घालेन मी.
तेजस- त्या लाडवांसाठी मी अमेरिकेच्या अध्यक्षाला पुण्यात नोकरी करायला पटवेन. शिवानी क्या चीज है.
आवाज- तुम्हारे सामने खडी है…
ते ऐकून तेजस ने केबिन च्या दाराकडे चमकून पाहिलं. दारात जीन्स आणि त्यावर एक कुर्ता परिधान केलेली सुंदर दिसत असलेली शिवानी उभी होती. तिला बघण्यात काही क्षण हरवलेल्या तेजस ने भानावार येत हातात असलेल्या फोनवर हेलो हेलो केल. पण बाईनी फोन केव्हाच कट केला होता. शिवानी ने विचारलं-
शिवानी- आत येऊ का मी?
तेजस नि:शब्द अवस्थेत तिच्या रुपात हरवून गेला होता.
शिवानी- तेजस इनामदार…मी आत येऊ का?
तेजस भानावार येत म्हणाला-
तेजस- य…या ना…आय मीन ये ना ये शिवानी.
शिवानी आत येऊन त्याच्या समोर बसली.
इथे मांजरेकर अपमानाने जळत होता. तेजस आणि अविनाश ने मुस्कुटात मारलेली तो विसरू शकत नव्हता. पण काहीच करूही शकत नव्हता. त्याची प्रचंड चिडचिड होत होती. मोठा नफा कमवायची संधी त्याच्या हातातून निसटली होती. त्याला आता खबर मिळाली होती की तेजस ने व्यवसाय यशस्वी रीत्या स्वतःच्या हातात घेतलेला आहे. म्हणजे आता भविष्यात सुद्धा तो गिळंकृत करता येणार नाही हे त्याच्या लक्षात आल होतं. काहीही करून त्याला बदला घ्यायचा होता. त्याने काहीतरी विचार करून फिरोज परदेशीला फोन लावला.
शिवानी ने कॉफीचा मग खाली ठेवला आणि ती तेजसला म्हणाली-
शिवानी- तू मला लोकल जॉब opportunity बद्दल सांगणार आहेस अस आई म्हणाली म्हणून मी इथे आले. आणि तू तर मला पुण्याला जायला कन्व्हिन्स करतो आहेस.
तेजस- शिवानी come on तुझ्यासारख्या इंजिनियरला लोकल जॉब कसा मिळेल? आणि तू बाईंच्या जवळ राहतेस ह्यापेक्षा तू तुझ्या शिक्षणाला साजेसा जॉब पुण्यात करतेस ह्याचा बाईंना जास्त आनंद होईल ना?
शिवानी- आणि माझा आनंद?
तेजस- आई वडिलांच्या आनंदात आपण आपला आनंद शोधायचा असतो शिवानी.
शिवानी- हो? मग तू युएस ला न जाता एक वर्ष ब्रेक घेऊन इथे गावात पोल्ट्री फार्म सांभाळतो आहेत त्याने तुझ्या पेरेंट्सना जास्त आनंद होईल की तू त्याचं स्वप्न पूर्ण करायला युएस ला गेल्यावर होईल?
तेजस- माझी परिस्थिती वेगळी आहे शिवानी.
शिवानी- माझीही परिस्थिती वेगळी आहे तेजस. उद्या लग्न झाल्यावर मी जाणाराच आहे एखाद्या दुसर्या शहरात किंवा देशात. इतकी वर्ष आईपासून लांब राहिले आहे. पुढे तर आयुष्यभर लांब राहणार आहे. मग हे मधले काही महिने मी तिच्या जवळ राहायचं ठरवलं तर ते चूक का? आणि तू घेतलेलं सेम तसंच डिसिजन बरोबर का? तेजस, कोणतीही व्यक्ती आई वडिलांच्या बाबतीत फक्त इमोशनल असते. प्रक्टिकल जगासमोर असते. त्याला तू अपवाद नाहीस आणि मी पण नाही. एनी वे. तुला भेटून बर वाटलं. तुझ्या बिझनेस साठी शुभेच्छा. बाय.
हे बोलून शिवानी निघून गेली. तेजस ती जे बोलली त्याचा विचार करत होता. इतक्यात त्याचा फोन वाजला.
तेजस- हेलो…
आवाज- तेजस भाय फीरोज बोलतोय. फिरोज परदेशी. तुमच्या मुर्गीचा फूड सप्लायर.
पुढील भागाची लिंक- वारसा (भाग ५)
क्रमश:
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023