वारसा (भाग ५)
आधीच्या भागाची लिंक- वारसा (भाग ४)
फिरोज ने तेजसला भेटायला बोलावलं होत. खूप महत्वाच काम आहे अस तो म्हणाला. तेजस ने हि गोष्ट अविनाशला फोन करून सांगितली आणि तो सावंतला बरोबर घेऊन फिरोजला भेटायला हॉटेल वृंदावन मध्ये गेला. फिरोज त्यांची वाट बघत बसला होता. लांबच्या टेबल वर बसलेला मांजरेकर त्यांच्यावर लक्ष ठेऊन होता. ह्या दोघांना आलेले बघून फिरोज उठून उभा राहिला आणि म्हणाला-
फिरोज- या या तेजस भाय. तुमचीच वाट बघत होतो. सावंत चाचा सलाम.
दोघे त्याच्या समोर बसले.
फिरोज- काय घेणार? चहा की थंडा?
तेजस- काम काय आहे ते सांग.
फिरोज- कामच काय आहे? ते होणारच. आधी चहा तर घ्या.
तेजस- नको. आधी कामाच बोलू. मला सस्पेन्स मध्ये चहा जात नाही.
फिरोज- ठीक आहे. तस तर तस. त्याच काय आहे ना तेजस भाय हल्ली ना महंगाई लई वाढली आहे. मुर्गीचा चारा पण लई महाग झाला आहे. त्यामुळे मला ना आताच्या भावात सप्लाय परवडणार नाही.
सावंत- फिरोज पण हे आत्ता बोलून काय उपयोग? आपण एका वर्षाचे भाव contract मध्ये फिक्स केलेत.
फिरोज- (त्याच्या डोळ्यात रोखून बघत) मी ते contract मोडतो असं समजा.
तेजस- तू अस करू शकत नाहीस फिरोज.
फिरोज- मी तस करतोय तेजस भाय. तुला पायजे तर कोर्टात जा. पण मला भाव वाढवून दिला नाही तर चारा बंद करून टाकेन मी.
तेजस- किती भाववाढ हवी आहे तुला?
फिरोज ने आजच्या दराच्या तिप्पट दर सांगितला.
सावंत- ए फिरोज वेडा आहेस का तू? तिप्पट दराने चारा घेतला तर आम्हाला धंदा बंद करावा लागेल.
फिरोज- बंद कशाला करता? मांजरेकरकडे बायर आहे. त्याला विकून टाका.
तेजस- अच्छा. अशी गेम आहे तर. मग ऐक फिरोज. आम्ही आमच्या कोंबड्या उपाशी मारू पण तुला एक पैसा वाढवून देणार नाही. आता जा आणि तुझ्या मांजरेकरला सांग हे.
इतक बोलून तेजस रागाने बाहेर पडला. सावंत मागे होताच. दोघे गाडीत बसले.
सावंत- तेजस बाबा इतक पटकन रागवायचं नाही.
तेजस- मग काय करायचं? त्याच्या आणि त्या मांजरेकरच्या तालावर नाचायचं?
सावंत- तस नाही. पण आता तू चिडून निघून आलास आणि चर्चेचे मार्ग बंद झाले ना?
तेजस- चर्चा व्यावसायिकांशी होते. व्यवसाय गिळू बघणर्या चोरांशी नाही.
सावंत- तरी पण तेजस बाबा…
तेजस- मला एक सांगा. अजून कोण सप्लायर आहेत आपल्या गावात?
सावंत- कोणी नाही. आपल्या तालुक्यात फिरोजची मोनोपोली आहे.
तेजस- हम्म..ओके…आपल्याकडे किती दिवस पुरेल इतका चारा शिल्लक आहे?
सावंत- फार फार तर पंधरा दिवस.
तेजस- ठीक आहे. तुम्ही ऑफिसला जा गाडी घेऊन. मी इथेच उतरतो.
तेजस ने गाडी थांबवली. सावंत स्तिअरिन्ग वर बसला. गाडी गेली. तेजस चालत तळ्याजवळ आला. समोर शांत तळ होत आणि तेजसच्या मानात विचारांचं काहूर होत. तो शून्यात बघत आता पुढे काय करता येईल ह्याचा विचार करत होता. इतक्यात आवाज आला.
आवाज- टेन्शन?
त्याने वळून पाहिलं. शिवानी तळ्याकडे बघत उभी होती.
तेजस- शिवानी तू?
शिवानी- हो मी. काही सुचत नसलं ना की मी इथे येते. हल्ली तर बरेचदा येते. ह्या तळ्यात काहीतरी आहे. इथे आल्यावर सोल्युशन मिळतात.
तेजस- How I wish…
शिवानी- तुझा प्रोब्लेम तळ्याला सांगून तर बघ.
तेजस- शिवानी प्लीज यार. टाईम पास नको करू. माझा प्रोब्लेम खूप सिरीयस आहे.
शिवानी- मग सोल्युशन पण सिरीयस देईल हे तळ. सांगून तर बघ प्रोब्लेम.
तेजस वैतागला आणी म्हणाला-
तेजस- फिरोज आमच्या बर्डसचा फूड सप्लायर आहे. तो तीन पट पैसे मागतोय नाहीतर सप्लाय बंद करेल म्हणतोय. माझ्याकडे फक्त पंधरा दिवसांचा स्टोक आहे. त्या नंतर मी काय करू? तिप्पट पैसे देऊन धंदा बंद करू की मी स्वतःच फूड सप्लाय सुरु करू? काय म्हणतय तुझ तळ? आहे का काही सोल्युशन?
शिवानी शांतपणे त्याच्याकडे बघत स्माईल करत होती.
शिवानी- तू फार पटकन चिडतोस तेजस. आणि हा तुझा मोठा अवगुण आहे.
तेजस- मला ग्यान नाही सोल्युशन हव आहे.
शिवानी- तेजस, सोल्युशन तुझ्याकडेच आहे. तुला माहित आहे आणि तू ते स्वतःच मला सांगितल आहेस.
तेजस- what?
शिवानी- हो. काय म्हणालास तू? धंदा बंद करू की मी स्वतःच सप्लाय सुरु करू असच ना? मग कर स्वतःच सप्लाय सुरु.
हे ऐकून तेजसच्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला. त्याने अत्यानंदाने शिवानीला मिठी मारली आणि म्हणाला-
तेजस- शिवानी तू जीनियस आहेस. काय आयडिया सुचली आहे यार तुला. सिम्पली सुपर्ब. Wow. पण…पण हे खरच शक्य होईल?
शिवानी- मला सोडलस तर सांगेन.
आपण तिला घट्ट मिठी मारली आहे हे तेजसच्या लक्षात आल्यावर दचकून तो दूर झाला.
तेजस- sorry यार. ते एक्साईटमेंट मध्ये मिठी मारली…
शिवानी- आल ते लक्षात माझ्या म्हणून तुझा गाल अजून शाबूत आहे. अन्यथा अशी हिम्मत जो करेल त्याचा गाल मी सुजवते.
तेजस- sorry म्हणालो आहे.
शिवानी- हो ऐकल आहे. आता कामच बोलूया?
तेजस- हो. आपणच आपल्या बर्डससाठी फूड सप्लाय करण्याची कल्पना चांगली आहे. पण पंधरा दिवसात ते करायला जाम मेहेनत आणि प्लानिंग लागेल.
शिवानी- मेहेनत तू कर. प्लानिंग आपण दोघे करू चालेल?
तेजस- done.
शिवानी- म्हणजे ह्या इंजिनियरची आपल्या गावातील नोकरी पक्की?
तेजस- (हसून) हो. हुशार आहेस हा. पगार किती घेणार हि हुशार इंजिनियर?
शिवानी- सर महिनाभर काम बघा आणि तुम्हीच ठरवा किती पगार देणार ते.
तेजस- ठीक आहे. मी रात्री बाबांशी बोलतो. त्यांना हा निर्णय सांगतो. तू उद्या सकाळी शार्प नऊ ला ऑफिसला ये. वेळ कमी आहे आपल्याकडे.
शिवानी- डन. बाय.
इतक बोलून शिवानी निघाली. तिला पाठमोरी जाताना तेजस बघत होता. अचानक त्याने तिला हाक मारली-
तेजस- शिवानी…
शिवानी थांबून वळली. तेजस तिच्या जवळ गेला. तिच्या टपोऱ्या डोळ्यात काही क्षण बघून तिला परत मिठी मारली. तिच्या मानेवर फवारलेल्या परफ्युमचा वास आता त्याच्या नाकातून मस्तकात शिरला. तिच्या केसांचा स्पर्श त्याला वेड लावून गेला. तो तिच्या कानात पुटपुटला-
तेजस- खरच thanks शिवानी.
इतक बोलून तिच्यापासून लांब होत दोन्ही हात आपल्या दोन्ही गालांवर धरून मान खाली घालून तिच्यासमोर उभा राहिला. त्याला तसा उभा पाहून शिवानीला खूप हसू आल. ती जोरजोरात हसू लागली. तिच्या त्या हसर्या सुंदर आणि मोहक रूपात तेजस हरवून गेला. तिने त्याच्या केसातून हलकेच हात फिरवला आणि म्हणाली-
शिवानी- you are mad…
इतक बोलून ती तिच्या दुचाकी वर बसून निघून गेली. तेजसच्या मनातील व्होयलीन जोरजोरात वाजू लागली होती.
क्रमश:
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
Pingback: वारसा (भाग ४) – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: वारसा (भाग ६) – LekhakOnline – Excellent Marathi Articles