वारसा (भाग ६)
आधीच्या भागाची लिंक- वारसा (भाग ५)
त्या रात्री जेवताना तेजस ने अविनाश समोर विषय काढला. आपणच फूड सप्लाय करायची कल्पना बोलून दाखवली. अविनाशला त्यात रिस्क वाटत होती. आपला मूळ व्यवसाय सोडून एका नव्या आणि काहीही अनुभव नसलेल्या व्यवसायात उडी घेण त्याला रिस्की वाटत होत. त्याने स्पष्ट नकार दिला. अविनाश म्हणाला “मी स्वतः उद्या फिरोजशी बोलतो. काही ना काही मार्ग निघेल. पण हे रिस्क नको.” तेजस ने अविनाश चा निर्णय मान्य केला. मग इतर विषयांवर गप्पा मारून सगळे आपापल्या खोलीत गेले.
तेजस त्याच्या रूम मध्ये आला. अविनाश ने नकार दिला असला तरी त्याला पोल्ट्री फूड सप्लाय ची कल्पना स्वस्त बसू देत नव्हती. तेजस ने त्यावर रिसर्च सुरु केला. गुगल करून त्या बाबत माहिती तो गोळा करू लागला. जगभरात आणि भारतात पोल्ट्री फूड कोण आणि कसा सप्लाय करतात. ते प्रोसेस कुठे आणि कस करतात. महाराष्ट्रात आणि त्यांच्या भागात ह्या व्यवसायातील उल्लेखनीय लोक कोण आहेत. त्यात त्याला फिरोजच नाव पण वाचायला मिळाल. एकीकडे त्याला अविनाश म्हणाला ते पटत होत आणि एकीकडे आपण आत्मनिर्भर होण, व्यवसाय वाढवण आवश्यक वाटत होत. तो वाचत होता. माहिती घेत होता. इतक्यात त्याला शिवानीचा मेसेज आला.
शिवानी- हेलो सर. मोठे सर काय म्हणाले?
ते वाचून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं.
तेजस- आम्ही स्टाफशी फक्त ऑफिस मध्ये बोलतो. अस रात्री chat करत नाही.
शिवानी- मी कामाच्या बाबतीत वेळ बघत नाही. चोवीस तास कामाचा विचार करते.
तेजस- हे अस बोलून मला इम्प्रेस करायची गरज नाहीये. तुला आधीच नोकरी ऑफर केलेली आहे.
शिवानी- तुला इम्प्रेस करायला मला बोलायची गरज आहे? मला नुसत बघून तू इम्प्रेस झाला आहेस. खर सांग.
तेजस- हा तुझा गैर समज आहे.
शिवानी- हा माझा गैरसमज आहे हे वाटणे हा तुझा गैरसमज आहे.
तेजस- भांडायला मेसेज केला आहेस का?
शिवानी- ते तू सुरु केलस. मी माझ्या मेसेज करण्याच कारण पहिल्या प्रश्नात सांगून टाकल आहे.
तेजस- ओके. The answer is no. मोठ्या सरांना आपला प्लान पसंत नाहीये.
शिवानी- पण का?
तेजस- ते तूच विचार त्यांना.
शिवानी- म्हणजे माझी नोकरी लागायच्या आधीच गेली!
तेजस- तस नाहीये…तू उद्यापासून ऑफिसला येऊ शकतेस. तू हुशार आहेस. इतर कामात देखील तुझी मदत होईल.
शिवानी- wow, नोकरी पक्की आहे ना? मग बघ मी मोठ्या सरांना पण पटवेन…
तेजस- “पण” म्हणजे? अजून कोणाला पटवल आहेस तू?
शिवानी- तुला.
तेजस- ए काहीही काय बोलतेस. आपल्यात तस काही नाहीये हा.
शिवानी- ए हेलो…stop getting ideas. मी तुला आपणच पोल्ट्री फूड सप्लाय करायला पटवल ना तसच त्यानाही पटवेन अस म्हणाले.
तेजस- ओह ते होय?
शिवानी- हो. आम्हा बायकांना ती कला अवगद असते. बाय द वे तुझी आई काय म्हणाली ह्या बाबतीत?
तेजस- काही नाही. ती फक्त ऐकत होती.
शिवानी- that’s lovely.
तेजस- म्हणजे?
शिवानी- अजून होप्स आहेत. तुझी आई तुझ्या बाबांना पटवेल.
तेजस- हे काय आहे पटवा पटावी सतत…
शिवानी- wait and watch. उद्या सकाळी कदाचित गुड न्यूज मिळेल.
तेजस- कसली गुड न्यूज? तू मुलगा पाहिलास का?
शिवानी- शट अप.
तेजस- 😊 😊 😊
इथे अविनाश च्या बेडरूम मध्ये त्याला औषधाची गोळी देत राधा म्हणाली-
राधा- काय हो, तेजस म्हणाला तो व्यवसाय खूप कठीण आहे का?
अविनाश- कठीण पेक्षाही नवीन आहे. आपल्याला काहीच अनुभव नाही. त्यात आपल्या असलेल्या व्यवसायात क्रायसिस सुरु असताना नवीन व्यवसाय सुरु करण वेडेपणा ठरेल.
राधा- तुम्ही व्यवसाय सुरु केला तेव्हा तुम्हाला तरी काय माहिती होती? तुम्ही नोकरी करून शिकलात ना?
अविनाश- हो. म्हणून आता फूड सप्लायर कडे नोकरी करू तो व्यवसाय शिकायला?
राधा- तो काळ वेगळा होता. आता नोकरी करायची गरज नाही. सगळी माहिती कॉम्प्युटर वर उपलब्ध असते. तेजस ने सुचवलं आहे म्हणजे त्याने काहीतरी विचार केलाच असेल ना? काहीतरी माहिती नक्की मिळवली असेल. तेजस हुशार आहे. काही महिन्यात तुमचा व्यवसाय व्यवस्थित सांभाळला आहे त्याने. आणि क्रायसिसच म्हणाल तर कदाचित नवीन व्यवसायाची सुरुवात त्या क्रायसिसचा अंत असू शकेल..
अविनाश- पण राधा…
राधा- तेजस नसता तर आज हा व्यवसाय तुमचा असता का? तो विकून टाकलेला असता ना? त्याने थांबून तो वाचवला आहे. मग जी गोष्ट तुमची नाही तिच्या बाबतीत निर्णय का घेता? तेजस तो चालवतो आहे. त्याला घेऊ द्या की निर्णय. कदाचित तो चुकेल. थोड नुकसान होईल. पण त्यातूनही तो शिकेलच ना? आणि समजा त्याचा निर्णय योग्य ठरला तर तो अमेरिकेला गेल्यावर देखील तुमच्यासाठी एक नवीन व्यवसाय सोडून जाईल ना?
अविनाश- तू बरोबर बोलते आहेस राधा. पटल मला. मी हा विचारच केला नव्हता.
इथे तेजस शिवानीशी chat करत होता.
तेजस- पण कसा मुलगा हवा आहे तुला सांगना. परत एकदा विचारतोय.
शिवानी- don’t tell मी की तू विवाह मंडळ सुरु केल आहेस.
तेजस- तू पटवलस तर ते पण सुरु करेन.
शिवानी- कित्ती आज्ञाधारक आहेस ना तू?
तेजस- सांग ना कसा मुलगा हवाय तुला?
शिवानी- हम्म…मला असा मुलगा पाहिजे ज्याला पाहून माझ्या मनात हजारो व्होयलीन वाजू लागतील आणि त्याच वेळी त्याच्याही मनात ती वाजतील.
तेजस- तुझ्या मनात ठीक आहे. पण त्याच्याही मनात ती वाजली हे तुला कस कळणार?
शिवानी- तूच म्हणालास ना की मी हुशार आहे म्हणून? मग हुशार मुलीना बरोब्बर कळत अशी व्होयलीन कोणाच्या मनात वाजत आहेत ते.
तेजस- असा कोणी दिसला आहे का?
शिवानी- हो आहे एक. त्याच्या मनात वाजलेली व्हॉयलीन मला ऐकू आली आहेत.
तेजस- पण तुझ्या मनात ती वाजली की नाही?
शिवानी- हे त्याने ओळखायला हव ना? सगळ मीच सांगितल तर मजा काय राहिली मग?
इतक्यात त्याच्या रूमच्या दारावर टकटक झाली.
तेजस- आई आली बहुतेक. उद्या भेटू ऑफिसला. बाय.
शिवानी- बाय…
तेजस- ये आई…
त्याच्या खोलीचं दार उघडून अविनाश आत आला. तेजस त्याला पाहून उभा राहिला.
तेजस- बाबा तुम्ही?
अविनाश- हो मी. तेजस तुझ्या प्रपोजलचा मी जरा डिटेल विचार केला आणि मला त्यात मेरीट दिसली. सो गो अहेड. तुला जे योग्य वाटतंय ते कर. I am with you.
हे ऐकून तेजस ने अविनाश ला मिठी मारली.
तेजस- thanks बाबा…
इतक्यात त्याला दारात उभी असलेली आणि मिश्कील हसत असलेली राधा दिसली आणि त्याला शिवानीचे शब्द आठवले “आम्हा बायकांना ती कला अवगद असते.” आणि त्याला हसू आलं. त्याने राधाकडे बघत दोन्ही हात जोडत तिचे आभार मानले. राधा दोन्ही हातांचे अंगठे दाखवत त्याला स्फूर्ती देत होती.
दुसर्या दिवशी सकाळी तेजस पावणे नऊला ऑफिसला आला. काल रात्री रिसर्च करून तयार केलेल्या नोट्सचे प्रिंट आउट त्याने मागवून घेतले. शार्प आठ पन्नासला शिवानी ऑफिसात आली. तेजस ने तिची सगळ्या स्टाफ बरोबर ओळख करून दिली. त्याने काल रात्री अविनाश ने नवीन बिझनेसला परवानगी दिल्याच तिला सांगितल. ते ऐकून शिवानी खुश झाली. इतक्यात त्याच्या रिसर्च चे पेपर्स आले. दोघे ते पेपर्स वाचून चर्चा करू लागले. शिवानीच्या बोलण्यातून तिची हुशारी झळकत होती. ह्या सगळ्या चर्चेत दिवस कधी संपला कळलंच नाही. संध्याकाळी सात वाजता सावंत त्यांना म्हणाले-
सावंत- तेजस बाबा आज घरी जायचं नाहीये का? सात वाजले. आणि शिवानी पहिल्याच दिवशी इतका वेळ काम केलंस तर रोज कराव लागेल.
शिवानी- सावंत काका आपलं हे प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत मी घड्याळ बघणार नाहीये. तसाही वेळ कमी आहे आपल्याकडे.
तेजस- हो काका. तुम्ही इथलं सांभाळा. मी आणि शिवानी पोल्ट्री फूड साठी उद्या काही शेतकर्यांना भेटायला तालुक्याच्या गावाला जाणार आहोत.
सावंत- इथली काळजी नका करू. मी आहे.
तेजस- ग्रेट काका.
सावंत निघून गेले.
तेजस- cool then. As planned आपण उद्या सकाळी सहाला निघूया.
शिवानी- येस. तू मला पिक कर. पहिली मीटिंग मोहिते बरोबर आहे.
तेजस- तो फिरोजचा जुना सप्लायर आहे.
शिवानी- हो. कठीण विषयाचा पेपर आधी सोडवायचा. तो सुटला की सोपे विषय आणखी सोपे होऊन जातात.
तेजस- मेरे और तुम्हारे खयाल कितने मिलते है ना सेनोरिता?
शिवानी- माझ्या जॉब प्रोफ़ाईल मध्ये बॉस च फ्लर्ट सहन करणे लिहिलेलं नाहीये.
तेजस- नाहीये. ते additional responsibility आहे अस समज.
शिवानी- अच्छा. पहिल्याच दिवशी फुल ओन लाईन मारतो आहेस.
तेजस- छे. लाईन वगैरे कसली. मी लाईन तिच्यावरच मारेन जिला पाहून माझ्या मनात व्होयलीन वाजू लागतील.
हे ऐकून शिवानी ने दोन्ही कानांवर हात दाबून धरले. ते पाहून तेजस ने विचारलं-
तेजस- हे काय?
शिवानी- तुझ्या मनात वाजत असलेली हजारो व्होयलीन मला ऐकू येत आहेत.
हे बोलून हळूच लाजलेली शिवानी निघून गेली. कन्फ्युज उभा सलेल्या तेजसला काल रात्रीचा त्यांचा संवाद आठवला.
“शिवानी- हो आहे एक. त्याच्या मनात वाजलेली व्हॉयलीन मला ऐकू आली आहेत.
तेजस- पण तुझ्या मनात ती वाजली की नाही?
शिवानी- हे त्याने ओळखायला हव ना? सगळ मीच सांगितल तर मजा काय राहिली मग?”
तेजस एक्साइट होत स्वतःशी म्हणाला-
तेजस- म्हणजे… म्हणजे शिवानी…
इतक्यात त्याचा फोन वाजला. फोन फिरोज चा होता. त्याने फोन घेतला.
फिरोज- हाय तेजस…मी रेट नेगोशिएट करायला तयार आहे. उद्या दहा वाजता भेटूया.
तेजस आता त्याला काय उत्तर द्यायचं ह्या कान्फुजन मध्ये उभा असतानाच शिवानी परत आली आणि म्हणाली-
शिवानी- अरे माझा स्कार्फ विसरले होते. तो घ्यायला आले आहे.
तेजसच्या हातात फोन होता. त्यात फिरोज हेलो हेलो करत होता पण इथे तेजसला शिवानीच्या मनात वाजत असलेली हजारो व्हॉयलीन जोरजोरात ऐकू येत होती.
क्रमश:
पुढील भागाची लिंक- वारसा (भाग ७)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023