वारसा (भाग ७)

आधीच्या भागाची लिंक- वारसा (भाग ६)

तेजस शिवानीला बघत उभा होता. ते पाहून शिवानी म्हणाली-

शिवानी- तेजस…फोन??

तेजस भानावार आला आणि त्याने फोन कानाला लावला.

तेजस- ह…हेलो…

फिरोज- मी रेट नेगोशिएट करायला तयार आहे. उद्या दहा वाजता भेटूया….

तेजस ला काय बोलावं सुचत नव्हत. फिरोजचा हा फोन त्याची नव्या बिझनेसची आयडीया मारून टाकणारा होता. पण त्याने चांगला रेट दिला तर सगळच सोप होणार होत. तेजस कन्फ्युज झाला. समोर शिवानी होती.

तेजस- फ…फिरोज…मी अर्ध्या तासात फोन करतो. जरा मिटिंग मध्ये आहे.

फिरोज- ओके…

तेजस ने फोन ठेवला. शिवानी पुढे येत म्हणाली-

शिवानी- फिरोज म्हणजे तो फूड सप्लायर? त्याचा फोन? काय हव आहे त्याला?

तेजस- तो रेट नेगोशीएट करायला तयार आहे….

शिवानी- मग?

तेजस- तेच तर कळत नाहीये.

शिवानी- मी बोलू का जरा?

तेजस- हो प्लीज…

शिवानी- अस समजू की फिरोज ने आज आत्ताच्या पेक्षाही कमी रेट ने फूड सप्लाय करायची तयारी दाखवली. आपण आपला स्वतःचा सप्लाय चा बिझनेस करायची आयडिया सोडून दिली. आणि उद्या आणखी क्रायसिस झाल्यावर किंवा तू युएसला गेल्यावर त्याने भाव वाढवले आणि आज तुझ्यावर जी परिस्थिती आली आहे ती तुझ्या बाबांवर आली तर तेव्हा त्यांना बिझनेस मांजरेकरच्या माणसाला विकावा लागेल ना? आणी फिरोज अस नक्कीच करू शकतो. त्यामुळे मला वाटत की त्याची नवी ऑफर घेण हे शोर्ट टर्म सोल्युशन असेल. Long term साठी फिरोजवर अवलंबून न राहणे हेच योग्य असेल. बाकी तुझी मर्जी.

शिवानी बोलत होती आणि तेजस ऐकत होता. तीच बोलून झाल्यावर खुश झालेला तेजस पुढे झाला आही तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाला-

तेजस- शिवानी तू किती sorted आहेस यार. परफेक्ट बोलते आहेस. एका मिनिटात सगळ कन्फ्युजन दूर केलस आणि आता मला माझा पाथ क्लियर दिसतोय. Thanks a ton.

शिवानी- thanks फोर the compliment. पण जास्त चान्स नको मारू.

तेजसच्या लक्षात आल की त्याने तिचा हात धरून ठेवला आहे. त्याने पटकन हात सोडला.

तेजस- sorry यार. ते आनंदात…पण खरच thanks.

शिवानी- नुसत्या thanks वर नाही चालणार.

तेजस- मग अजून काय करू?

शिवानी- आपल्या गावात लास्ट वीक मध्ये पिझ्झा पार्लर सुरु झालंय. पिझ्झा treat द्यावी लागेल आज.

तेजस- अच्छा…डिनर डेट…

शिवानी- काहीही काय. Treat आणि डेट मध्ये फरक आहे.

तेजस- अच्छा. मग खुश होत हात धरण्यात आणि चान्स मारण्यात फरक नाहीये का?

शिवानी- hmmm you are right…for a change…

दोघे हसले.

शिवानी- चल मी घरी आईला कळवते.

तेजस- मी पण फोन करतो घरी.

शिवानी फोन लावत बाहेर पडली. तेजस ने घरी फोन लावला.

आता दोघेही विकिज पिझ्झा मध्ये बसले होते. पिझ्झा ऑर्डर करून झाला होता. दोघे गप्पा मारत होते.

शिवानी- तेजस तुझी abition काय आहे लाईफ मध्ये?

तेजस- अमेरिकेत जाऊन बाबा आणि आजोबांची इच्छा पूर्ण करणे.

शिवानी- बास? त्याच्या पलीकडे करियरचा काही गोल?

तेजस- माझा पैसे किंवा पोझिशन असा काही गोल नाहीये. पण हा. जे काही करायचं ते मन लावून, झोकून देऊन करायचं आणि त्यात यश मिळेपर्यंत स्वस्त नाही बसायचं.

शिवानी- हम्म..interesting.

तेजस- आणि तुझी काय आहे ambition?

शिवानी- एक चांगली हाउस वाईफ बनायचं.

तेजस- what? Come on. आय मीन तू इतकी शिकली आहेस, हुशार आहेस…तू खूप काही करू शकतेस? आणि हाउस वाईफ?

शिवानी- माझ्या आईची ती इच्छा आहे. मी चांगला मुलगा पाहून लग्न कराव. चांगला म्हणजे शिकलेला, करियर मध्ये सेटल असलेला असणार. त्याची माझ्याकडून अपेक्षा त्याच घर मी सांभाळाव अशीच असणार. म्हणून माझी पण तीच ambition ठेवली आहे मी.

तेजस- oh come on. सगळी मुलं तशी नसतात.

शिवानी- समज. उद्या तू शिक्षण पूर्ण करून नोकरीत सेटल झालास आणि एखादी फॉरेनर न करता देशी मुलीशी लग्न करून तिला अमेरिकेला घेऊन गेलास तर तू तिला नोकरी करू देशील?

तेजस- मी फॉरीनरशी कधीच लग्न करणार नाही. इथून लग्न करून ज्या मुलीला युएस ला नेईन तिला तीच आयुष्य जागायचं चोईस असेल. मी बायको नेणार आहे. कामवाली नाही.

इतक्यात पिझ्झा आला. शिवानी खाली मान घालून त्यावर चिली फ्लेक्स टाकत पिझ्झा खाऊ लागली. ते पाहून तेजस म्हणाला-

तेजस- काय झाल? एकदम शांत का बसलीस?

शिवानी- काही नाही. जळत होते.

तेजस- जळत होतीस? कोणावर?

शिवानी- तुझ्या होणार्या बायको वर. ती जी असेल तिच्यावर जोरात जळत होते.

तेजस- हम्म…ओके…पण समजा तुझ्या नवर्याने तुला नोकरी करायची किंवा करियर करायची मुभा दिली तर तुला ते करायला आवडेल का?

शिवानी- अर्थात. हे काय विचारण झाल का? I would love that.

तेजस- ओके. हे मी लक्षात ठेवेन.

हे ऐकून शिवानीला ठसका लागला.

शिवानी- लक्षात ठेवेन? म्हणजे?

तेजस- म्हणजे माझा एखादा मित्र असेल ज्याला बायकोने लग्नानंतर करियर केलेलं चालणार असेल तर त्याला तुझ स्थळ सुचवेन.

शिवानी- हम्म…आणी त्याला हे पण सांग की दोन दिवसांच्या ओळखीत मी शिवानी बरोबर फ्लर्ट पण करत होतो.

तेजस- त्यात सांगायचं काय? तो तर मी तुझ लग्न झाल्यावर पण करू शकतो.

शिवानी- हो? माझा नवरा मारेल.

तेजस- तुझ्या नवर्याला चालत असेल तर?

शिवानी- तर मी नवर्याला मारेन.

तेजस- म्हणजे थोडक्यात तुला मी फ्लर्ट केलेलं आवडत नाही.

शिवानी- मी अस कुठे म्हणाले.

तेजस- मग बिचार्या नवऱ्याला का मारणार आहेस?

शिवानी- लग्नानंतर बायकोशी कोणी फ्लर्ट केल तर ऐकून घेणारा नवरा असेल तर बायको त्याला मारेलच ना?

तेजस- म्हणजे लग्न होईपर्यंत फ्लर्ट करायला मला परवानगी आहे तर.

शिवानी ने अचानक दोन्ही कानांवर हात ठेवले.

तेजस- काय झाल?

शिवानी- काही नाही रे. जोरात व्होयलीनचा आवाज येतोय कुठूनतरी.

तेजस- मलाही येतोय. कुठून येतोय काय माहित.

शिवानी- पिझ्झा खा. थंड होतोय. उद्या जायचं आहे ना मोहितेला भेटायला? सकाळी वेळेवर पिक कर मला.

दोघे उद्याच्या मिटिंग बद्दल बोलत पिझ्झा खाऊ लागले.

मांजरेकर आणि फिरोज एका शेडी बार मध्ये बसलेले होते. मांजरेकर बर्यापैकी टाईट होता. त्याच्या डोळ्यात खून उतरला होता.

मांजरेकर- फिरोज कधी भेटणार आहेस त्या तेजसला?

फिरोज- माहित नाही. त्याने फोनच केला नाही.

मांजरेकर- लै दात आहे त्याच्या बुडाला. तो दुसरीकडे जायच्या आधी त्याला गाळ्यात घे. रेट तोडून दे. आणि ऐन वेळी मोका मिळाला की चारा बंद कर. सगळे बर्ड मारायला हवे त्याचे.

फिरोज- पण तो भेटायला तर पायजे ना शेठ.

मांजरेकर- तू फोन लाव भेंचो.

फिरोज ने फोन लावला. त्याच नाव फोनवर पाहून तेजस शिवानीला म्हणाला-

तेजस- फिरोज…

शिवानी- सांगून टाक त्याला तुझा डिसिजन.

तेजस ने फोन घेतला.

तेजस- हेलो…

फिरोज- कधी भेटूया? रेट फिक्स करू.

तेजस- काय फायदा फिरोज? तू contract मध्ये agree केलेला  रेट वाढवलास. तुझ्यावर विश्वास कसा ठेऊ आम्ही?

फिरोज- नवीन contract करू. आहे त्यापेक्षा कमी रेट देतो.

तेजस- काय रे? अचानक इतक प्रेम का दाखवतो आहेस?

फिरोज- मला माझी चूक लक्षात आली म्हणून.

तेजस- अरे नाही. चूक तर आम्हाला लक्षात आली आहे आमची.

फिरोज- म्हणजे?

तेजस- म्हणजे तू फुकट जरी दिलस तरी आम्हाला तुझ्याकडून आता फूड नकोय.

फिरोज- अच्छा? पक्षी भुकेने मरतील.

तेजस- चालेल आम्हाला. ते आम्ही आणि आमचे पक्षी बघून घेऊ. तू परत फोन नको करू…आणि हो तुझ्या बाजूला मांजरेकर असेल तर त्याला सांग की हे गेम जुने झाले. काहीतरी नवीन आयडिया काढ.

फिरोज ने रागात फोन ठेवला आणि तो मांजरेकरला म्हणाला-

फिरोज- शेठ तुमच्या नादी लागून माझ मोठ गिर्हाईक तुटलं. माझ नुकसान कोण भरून देणार?

मांजरेकर- तू थांब रे. सगळ नुकसान भरून देतो. फक्त हा सौदा होऊ दे. ए अजून एक क्वार्टर आण रे…

मांजरेकर ने रागात ऑर्डर सोडली आणि तो तारवटलेल्या डोळ्यांनी बघत  समोरच्या ताटलीत ठेवलेले चिकन लोलीपोप चिवडू लागला.

रात्री तेजस बेडवर पडून फोनमध्ये काहीतरी बघत होता. तेवढ्यात राधा त्याच्या रूम मध्ये आली.

राधा- काय रे काय म्हणतोस? थकला असशील ना?

तेजस ते ऐकून उठून बसला आणि म्हणाला-

तेजस- हाय आई…छे दमायच काय?

राधा- अरे तस नाही. सध्या खूप टेन्शन आहे ना? मला माहित आहे बिझनेस टेन्शन काय असतात ते. तुझ्या बाबांनी सगळा बिझनेस माझ्या समोर तर उभा केला.

राधा बेडवर बसली. तेजस ने तिच्या मांडीवर डोक ठेवलं. राधा त्याच डोक चेपू लागली.

राधा- तेजस एक सांगू का?

तेजस- सांग न आई.

राधा- राजेश मामाचा फोन आला होता.

तेजस- अच्छा? काय म्हणतोय? मजेत ना?

राधा- हो. त्याला तुझ्याशी बोलायचं आहे आणि आशाला पण…

तेजस- (आश्चर्याने) दोघांना बोलायचं आहे? काय?

राधा- तूच बघ आता काय ते. मी फोन लावते.

राधा व्हिडीओ कॉल लावू लागली. तेजस दचकून उठून बसला.

तेजस- ए आई हे काय करते आहेस?

राधा- दिवसा तुला वेळ नसतो आणि तुझ डोक थार्यावर नसत. म्हणून आता लावते आहे फोन.

इतक्यात कॉल लागला. समोर राजेश आणि आशा होते.

राजेश- हाय तेजस…

तेजस- हाय मामा…

अशा राजेश बरोबर होती.

राजेश- काय म्हणतोय बिझनेस?

तेजस- आहे…सुरु आहे…

थोडा वेळ एक awkward pause…मग राजेश बोलला.

राजेश- तेजस तुझी आई बोललीच असेल ना तुझ्याशी?

तेजस- कशाबद्दल?

राजेश- अरुंधती बद्दल.

तेजस- कोण अरुंधती?

राजेश- अरे अस काय करतोस? आमच्या बिल्डींग मधल्या राजवाडेची मुलगी. तू आणि कल्पेश तिच्याशी खेळायचात ना लहानपणी.

तेजस- बर…पण तिचं काय?

आशा- अरे गेल्याच वर्षी राजवाडे काका आणि काकू हिमाचल मध्ये झालेल्या बस अपघातात गेले.

तेजस- ओह…sorry to know that…

आशा- तेच तर ना. आता पोर एकटी आहे बिचारी.

तेजस- sad…

अशा- तेच तर…आता तरुण पोर आई वडिलांविना जरा रिस्की आहे ना…

तेजस- हम्म…

राजेश- तिला एकटी ठेवण बरोबर नाही. म्हणजे आमच लक्ष असत. पण तरीही तिला तीच, हक्कच अस कोणीतरी हव ना?

तेजस- हो बरोबर आहे.

आशा- (खुश होत राजेशला) बघा मी म्हणाले होते ना तेजसला आपल म्हणण पटेल म्हणून.

राजेश- अगदी बरोबर. (तेजसला) मग तेजस आम्ही काय विचार केला की अरुंधती आणि तुझ लग्न लावून दिल तर तिला पण हक्कच घर मिळेल आणि त्य युएस ला जाशील एक वर्षाने तेव्हा तिथे तुझ घर सांभाळायला अरुंधती असेल.

हे ऐकून तेजस shock झाला.

आशा- काय रे गप्प का?

राजेश- गप्प म्हणजे तो काय उड्या मारत म्हणणार आहे का की माझ लग्न लावा म्हणून?

आशा- चला मी देवासमोर साखर ठेवते. ठेऊ ना रे तेजस?

तेजस- पण मामा…

राजेश- पण बीण काही नकोय आता. हे बघ मुलगी दिसायला नक्षत्रासारखी आहे. नाव ठेवायला जागा नाहीये.

राधा- तेजस, मला वाटत तू हा प्रस्ताव स्वीकार कारावास.

तेजस- पण आई…

राधा- एक काम कर. तू अरुंधतीला भेट तर एकदा.

तेजस- आई माझ ऐक…

राधा- प्लीज तेजस…

तेजस निरुत्तर झाला.

राजेश- उद्या संध्याकाळी या मग. आमच्याच घरी बघायचा कार्यक्रम ठेऊ.

राधा- ठीक आहे. उदा साडे सहा पर्यंत येतो आम्ही.

कॉल कट झाला.

राधा- झोप रे बाळा आता शांत.

तेजस- आई हे काय आहे? माझ शिक्षण अजून झाल नाही, आता बिझनेस च टेन्शन आणे आणि हे लग्नाचं काय आहे नवीन? मला अजिबात इच्छा नाहीये. मामा आणि मामी समोर मी नाही बोललो काही. पण प्लीज यार…

राधा- तेजस मी पण ह्यावर विचार केला आणि तुझ्या बाबांनी पण केला. लग्न करायला काहीच हरकत नाहीये. तिला गरज आहे आणि तुलाही आहेच ना? आम्हाला काळजी आहेच की तू उद्या अमेरिकेला गेल्यावर तुझी काळजी कोण घेईल ह्याची. मी फोटो पाहिला आहे. दिसायला सुंदर आहे अरुंधती. मी सांगते म्हणून उद्या तिला बघ. मला खात्री आहे तुला ती आवडेल.

इतक बोलून राधा त्याच्या केसात हात फिरवून निघून गेली. राधाने त्याच्या बेडवर उपडा ठेवलेला अरुंधतीचा फोटो त्याला दिसला. तेजस ने हळूच तो फोटो उचलला. अरुंधती दिसायला खरच छान होती. इतक्या सुंदर मुलीचे आई वडील अचानक अपघातात जावे ह्याच तेजसला वाईट वाटलं. तो फोटोकडे बघत असताना त्याला अचानक त्या फोटोत शिवानी दिसू लागली. काही क्षणात परत अरुंधती दिसली…मग काही क्षण शिवानी…तेजस ने फोटो बाजूला ठेऊन दिवा बंद केला आणि तो बेडवर अडवा झाला. उद्या त्याच्या आयुष्यात येणार एक नवीन वादळ त्याच्या रूमच्या खिडकीवर धडका देत होत.

क्रमश:

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!