बडी ताकत के साथ… बहोत बडी  जिम्मेदारी भी आती है

मी जेव्हा इंजीनियरिंग करत होतो तेव्हा एकमेकांशी संवाद साधण्याचे स्वस्त आणि मस्त तंत्र होते पोस्ट खाते. काय हवे ते मनात येईल ते कागदावर लिहून आपल्या भावना पोस्टाच्या हवाली केल्या कि आपण मोकळे. पोस्ट मास्तर साहेब ज्यांच्या त्यांच्या भावनांचा हिशोब लावून त्या ज्या त्या पत्त्यावर पोहोचावीत. मग कधीतरी आपल्या पत्राला उत्तर येत असे. त्याच वेळी कॉईन बॉक्स, एस. टी. डी. नामक काळे पिवळे डबे सुद्धा होते. रात्रीच्या वेळी ११ नंतर दर कमी असे म्हणून त्यावेळी फोन करणे हि अशी पद्धत होती. त्यानंतर मग मोबाईल हे प्रकरण आले. अन त्यात एक एक इतक्या सुधारणा म्हणा किंवा भानगडी म्हणा आल्या त्या अजून हि येत आहेतच. साध्या फोनचे कलर फोन आले, मग गाणी वाजवणारे फोन आले, क्यामेरा वाले फोन आले, इंटरनेट वाले फोन आले अन मग सगळं जगच बदलून गेलं. तांत्रिक गोष्टी बदलत गेल्या पण माणूस अन त्याची व्रीत्ती काही बदलली नाही. आजच्या काळात फेसबुक, व्हाट्सअप ह्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी झाल्या आहेत. पण म्हणून आपली वृत्ती किती बदलली? दुर्दैवानी नाही अन उलट ह्या समस्येनी अधिकच उग्र रूप धारण केले आहे.  माझ्या लहानपणी देवाची भीती घालणारी पत्रे यायची. मला अमुक तमूक देवाचा दृष्टांत झाला त्यांनी मला ११ जणांना हे पत्रांनी कळवण्यास सांगितले. ज्यांना असं पत्र आलं आहे त्यांनी अजून ११ जणांना असंच पत्र पाठवायचं (म्हणजे थोडक्यात MLM). ज्यांनी दुर्लक्ष्य केलं त्याचा सत्यानाश झाला वगैरे वगैरे. मोबाईल कंपन्यांनी पोस्टाचे कंबरडे मोडले पण लोक काही सुधारले नाहीत. पत्रांच्या ऐवजी SMS  येणे सुरु झाले. बर ते संपले आता व्हाट्सअप आले तर त्यावरही तेच? किंवा मग अजून काही काही विशेष हे दोन ग्रुप मध्ये पाठवा आणि गम्मत पहा, ब्याटरी फुल होईल, देवाची कृपा होईल, तुमचा दिवस चांगला जाईल … कांदा अन लसुन … एक न दोन.  हातात मोबाईल आलाय पण तो खर्या अर्थानी वापरावा कसा हे कधी कळणार? कुठल्याही व्यक्तीचा तिच्या नकळत फोटो काढ अन टाक व्हाट्सअपवर. त्यावर कसल्याही कमेंट करा. हि कसली करमणूक? कुठे कोणाचा भांडण होतंय … काढ व्हिदिओ अन टाक व्हाट्सअपवर. कुठे चालताना कोणी पडलं … काढ फोटो अन टाक व्हाट्सअपवर. ह्यामध्ये नकळत काढलेल्या फोटोंमध्ये सर्रास पणे स्त्रियांचेच फोटो जास्त असतात. पण त्याही पेक्षा जास्त गंभीर गोष्ट आता घडते ते फोटो मॉर्फिंग. कोणाचा तरी चेहरा अश्लील शरीराला जोड किंवा आहे त्या फोटो मधील स्त्रीचे कपडे मॉर्फिंग करून काढून टाक अन वरती असा मेसेज टाकावा कि हि बाई फोन मध्ये इतकी बिझी आहे कि ट्रेन मध्ये बाथरूम मध्ये तिची सलवार विसरून आली आहे. स्किन कलरची सलवार मॉर्फिंग करून नाहीशी करायला जास्त वेळ लागत नाही पण … पण  कुठल्या सडक्या मनोवृत्तीतून हे जन्माला येतेय? हि अशी कशी इतकी वाईट प्रवृत्ती? हे असे काम करणाऱ्याना त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांची अशी विटंबना झाली तर चालेल का? आपल्या आई, बहिण, मैत्रीण किंवा पत्नीचा फोटो असा व्हाट्सअपवर फिरत राहिला तर आवडेल काय? कुठल्याही अनोळखी स्त्रीचा फोटो व्हाट्सअपवर टाकण्यापूर्वी किंवा आलेला कुठलाही फोटो फॉरवर्ड करण्यापूर्वी स्वतःला हे विचारा कि हि जर माझी बहिण असती तर? समजा आपण तसे फोटो तयार केले नसतील पण तसे फोटो फॉरवर्ड करून आपण वेगळे काय करत आहोत? जितके दोषी तसा फोटो करणारा आहे तितकेच दोषी आपण पण होऊ जर आपण ते फोटो काहीही विचार न करता तसेच पुढे पाठवत राहिलो तर. केवळ नवरात्रीत अनवाणी चालून, किंवा पायी जाऊन कुठल्याशा मंदिरात जाऊन दुर्गेपुढे गुढगे टेकून किंवा लोटांगण घालून, उपवास करून देवी प्रसन्न होणार नाही. तुमच्यासाठी अनोळखी असणाऱ्या असंख्य दुर्गांना तुम्ही कसे वागवता ह्यावर ते अवलंबून आहे. वरील पैकी काहीही न करता येणाऱ्या जाणार्या प्रत्येक स्त्री ला तुम्ही औदार्यानी वागवा मग बघा कशी माता दुर्गा प्रसन्न होते ते. हजारो रुपयांचा स्मार्ट फोन हातात धरून माणूस स्मार्ट होत नाही तर हातात धरलेल्या फोनचा तो कसा उपयोग करतो ह्यावरून त्याचा स्मार्टपणा ठरतो. हे स्मार्ट फोन, इंटरनेट, व्हाट्सअप, फेसबुक हि आजच्या काळात मिळालेली वरदाने किंवा शक्तीच म्हणूयात. पण त्यंचा वापर हा आपण मानवा सारखा करायचा कि दानवासारखा करायचा हे आपण ठरवायला हवे कारण आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत राक्षस कुळात नव्हे. ह्या शक्ती आपल्याला मिळाल्यात खरे पण त्याचा वापर खरच काळजीपूर्व करणे गरजेचं आहे कारण… अक्सर बडी ताकत के साथ … बहोत बडी जिम्मेदारी भी आती है …!!! Image by Jan Vašek from Pixabay 

Read more

दिवाळी २०२० स्पेशल- ८

रण संग्राम                       लेखक- अभिजीत अशोक इनामदार (भाग १) राजा धर्मसेन आपल्या महालातल्या खलबतखान्यात काळजीने येरझार्‍या घालत होता. त्याच्या समोरच

Read more
error: Content is protected !!